सख्खं असं काही नसतं..
वर-वर वाटलं तरी सख्खं असं काही नसतं,
ही जाणीव तेवढी सोडली, तर दुःखं असं काही नसतं..
हसतो आपण हसता हसता, रडतो आपण रडता रडता ,
जीवात जीव ओतत ओतत, उतू जातो डोह पुरता ;
शिडास वादळ भिडतं जेव्हा, आपल्या पायी जळतं तेव्हा,
सारं दिसून मनात त्यांच्या सलंत-बिलंत काही नसतं,
वर-वर वाटलं, तरी सख्खं असं काही नसतं,
ही जाणीव तेवढी सोडली, तर दुःखं असं काही नसतं..
