मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
हितगुज ग्रूप
मालदिवमधली बदलती परिस्थिती
मालदिवजमध्ये अलीकडेच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत Progressive Party of Maldives चे मोहंमद मुईझ्झू विजयी झाले आहेत. मुईझ्झू यांचा कल चीनकडे झुकलेला असल्यामुळं त्यांच्या कार्यकाळात मालदिवजमध्ये चीनचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. निवडीनंतर लगेचच त्यांनी केलेल्या वक्तव्यांवरून ते स्पष्ट होत आहे. मालदिवजमध्ये घडत असलेल्या या घडामोडींमुळं भारताची चिंता वाढणं स्वाभाविक आहे.
जगात कुठेही आणि कधीही!
भारतीय हवाईदलाचा 8 ऑक्टोबरला स्थापना दिवस आहे. स्थापना झाल्यापासून म्हणजे 1932 पासून आजपर्यंतच्या कालखंडात भारतीय हवाईदलानं अनेक किर्तीमान नोंदवले आहेत, अनेक युद्धांमध्ये भारतीय हवाईदलानं शौर्य गाजवलं आहे आणि त्यामध्ये निर्णायक भूमिकाही बजावली आहे. जगभरात कुठंही आलेल्या नैसर्गिक आणि मानवी संकटांवेळी कमीतकमी वेळेत मदत आणि बचावकार्य तसंच मानवीय मदतीतही हवाईदल सतत अग्रेसर राहिलेलं आहे. गेल्या 91 वर्षांमध्ये भारतीय हवाईदलाची वाटचाल सहाय्यक दलाकडून व्यूहात्मक हवाईदलापर्यंत (Strategic Air Force) झालेली आहे.
गणपती घरगुती कार्यक्रम नियोजन - अमेरिका
अजून गणपती यायला २ महिने अवकाश आहे पण नेहमी प्रमाणे माझी अति-उत्साही तयारी जसे कि आरास काय करायची, कुणाकुणाला आमंत्रण द्यायची आणि जेवण किंवा नाश्ता चा बेत काय करायचं अशी एक अतिशय ढोबळ आखणी सुरू होते..
गेल्या काही अनुभावां नंतर या वर्षी थोडं नीट प्लॅन करायचे आहे.. त्यासाठी तुमच्या सल्ले /अनुभव ऐकायला आवडेल
संकेत (कथा)
II श्री II
संकेत
पुर्वाने पुन्हा आपल्या आवडत्या लेखकाचं पुस्तक डोळ्यासमोर धरलं, त्यातल्या लेखात ती गुंगून गेली होती. त्यातलं एक वाक्य... “खरंच असे संकेत आपल्याला मिळतच असतील, पण रोजच्या धकाधकीत ते आपल्याला कळत नसतील हेच खरं, एखादी ज्योत, एखादा प्रकाश आपलं अस्तित्व भासवून देत आपल्या आजुबाजुला वावरतो पण... “
संध्याकाळ
Sports Diplomacy means क्रीडा राजनय
यंदाच्या क्रीडा हंगामाचा शेवट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनं होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून तो देश आपली प्रतिमा उंचावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. या वर्षी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा, बीजिंग हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, महिला क्रिकेट विश्वचषक यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. मात्र चीनमध्ये अजूनही COVID-19 ची स्थिती गंभीर असल्यामुळं सप्टेंबर 2022 मध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा एक वर्ष पुढं ढकलण्यात आली आहे.
*बाप्पा ...*
*बाप्पा ...*
माझ्या मनाचा गाभारा,
त्यात उजळली ज्योत,
सारा सरला अंधार,
बाप्पा तुझाच प्रकाश ...
माझ्या देहाचा पसारा,
रोमारोमात या तूच
देही भरून ऊरला,
तुझा चैतन्य विलास ...
माझ्या बुद्धीचे आकाश,
त्यात विहरतो तूच,
काय माझे आहे बाप्पा ?
सारे तुझेच तुझेच ...
माझ्या कानामध्ये तूच,
माझ्या गळ्यामध्ये तूच,
तालासुरात आरती,
बाप्पा तूच म्हणतोस ...
माझ्या कर्माचा सोबती,
माझ्या धर्माचा सांगाती,
हात पाय बाप्पा तुझे,
आणि तुझीच ही मती ...
श्रीगणेशा
*श्रीगणेशा ...*
उत्सवाने दूर नेला श्रीगणेशा,
मानवाने दूर केला श्रीगणेशा ...
सूर गेला, छंद गेला, नृत्य गेले,
कर्ण कर्कश्शात बुडला श्रीगणेशा ...
मिरवणुक ती, पंथ माझा का हरवला ?
लाख खड्डे बघुन पुसतो श्रीगणेशा ...
खिळखिळी हाडे जिवाचे हाल कसले !
सहन धक्के करित बसला श्रीगणेशा ...
मानवाचे तत्त्व गेले, नीती गेली,
राजकारण बघत बसला श्रीगणेशा ...
धर्म गेला, पंथ गेला, 'जात' आली,
सोवळे नेसून नंगा श्रीगणेशा ...
झिंग तरुणाईस आली जी विदेशी,
मद्य प्याले बघत बसला श्रीगणेशा ....
राष्ट्रपतींचे डबे
भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्यावर डॉ. राजेंद्र प्रसाद सार्वभौम भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यावेळी राष्ट्रपतींसाठी रेल्वेचा खास डबा असावा असा विचार पुढे आला नव्हता. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव विमान प्रवासाऐवजी रेल्वे प्रवास करण्याचा सल्ला त्यांना त्यांच्या डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर स्वातंत्र्यापूर्वी भारताच्या गव्हर्नर-जनरलसाठी तयार केल्या गेलेल्या खास डब्यांचा वापर डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या दौऱ्यासाठी केला जाऊ लागला. ब्रिटिश राजवटीच्या काळात तो डबा भारताच्या गव्हर्नर-जनरलसाठी एकोणिसाव्या शतकात तयार करण्यात आला होता.
Pages
