'जे अ-क्षर असेल, ते टिकणारच!' - मुलाखत - श्री. अरुण साधू / श्री. आल्हाद गोडबोले

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

'महाराष्ट्र फाउंडेशन'तर्फे दिला जाणारा २०१६ सालच्या साहित्य जीवनगौरव पुरस्कार श्री. अरुण साधू यांना दिला गेला. त्यानिमित्त श्री. आल्हाद गोडबोले यांनी घेतलेली श्री. साधू यांची मुलाखत या वर्षीच्या जानेवारी महिन्यातल्या 'साधना'मध्ये प्रकाशित झाली होती.

अरुण साधू यांची ही कदाचित शेवटची मुलाखत असावी.

श्री. अरुण साधू यांना विनम्र आदरांजली.

***

maharashtrafoundation2016PDF-14.jpg

maharashtrafoundation2016PDF-15.jpg

maharashtrafoundation2016PDF-16.jpg

maharashtrafoundation2016PDF-17.jpg

maharashtrafoundation2016PDF-18.jpg

maharashtrafoundation2016PDF-19.jpg

***

ही मुलाखत मायबोली.कॉमवर पुनर्मुदित करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्री. विनोद शिरसाठ (संपादक, 'साधना') व श्री. आल्हाद गोडबोले यांचे मनःपूर्वक आभार.

***
विषय: 
प्रकार: 

इथे मुलाखत टाकल्याबद्दल धन्यवाद चिनूक्स.
स्वत:च्या वाचनाबद्दल किती स्पष्ट आणि सहजपणे सांगितलंय .
वृत्तपत्रे आणि इतर माध्यमांमधून होत असलेल्या मराठीच्या चिरफाडीने मराठी भाषेची दुर्दशा होत चालली आहे हे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराने म्हणावे म्हणजे सोनाराने कान टोचणेच. पण लोकसत्ता, मटा आणि सकाळ ( व इतर सुद्धा) इथे लिहिणार्‍यांना त्याचे काय ? ते आपले इंग्रजी ते मराठी ऑनलाइन ट्रांसलेटर वापरल्यासारखे मथळे आणि म्याटर लिहिणार Sad

अनेक दिवसांनी माबोवर चक्कर मारली. साधूंविषयी काही चांगलं वाचायला मिळेल म्हणूनच. अपेक्षा पूर्ण झाली.
अतिशय ठाम, संयत, मुद्देसूद मुलाखत आहे. फाफटपसारा न करता थोडक्या शब्दांत विचार मांडणारी. त्यांच्या लेखनासारखीच.

सिंहासन, मुंबई दिनांक अगणित वेळा वाचल्या आहेत. मुखवटा एकदाच वाचली आहे पण आवडली होती. तुंबाडच्या खोतांएवढीच प्रभावी वाटली होती. मात्र तुंबाडपेक्षा अधिक विचार करायला भाग पाडणारी आहे. त्यांचे इतर लेखन अधूनमधून वाचले आहे. एकदा आता समग्र साधू बैठक मारून वाचले पाहिजेत हे परत एकदा जाणवले.

चिनूक्स, अनेकानेक धन्यवाद.

वा! आज वाचली मुलाखत. धन्यवाद चिनूक्स.

वृत्तपत्रे आणि इतर माध्यमांमधून होत असलेल्या मराठीच्या चिरफाडीने मराठी भाषेची दुर्दशा होत चालली आहे हे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराने म्हणावे म्हणजे सोनाराने कान टोचणेच. पण लोकसत्ता, मटा आणि सकाळ ( व इतर सुद्धा) इथे लिहिणार्‍यांना त्याचे काय ? ते आपले इंग्रजी ते मराठी ऑनलाइन ट्रांसलेटर वापरल्यासारखे मथळे आणि म्याटर लिहिणार Sad >>> अगदी अगदी.

फार छान मुलाखत.

गेल्या १२-१५ महिन्यांत अरुण टिकेकर, गोविंद तळवलकर व आता अरुण साधू हे दिग्गज संपादक-लेखक आपल्यातून गेले. त्यांच्या लेखनावर आमचे पोषण झाले, त्या तिघांनाही भावपूर्ण आदरांजली.

खूप चांगली मुलाखत . वाचतांना सतत समोर आहेत अस वाटत होत. आता त्यांचं दुसरं मासिक श्राद्ध.
साश्रू नयनांनी विनम्र आदरांजली.