मायबोलीवरचं लेखन व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर सोशल मिडिया वर शेअर करण्याची सोपी सोय

Posted
3 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago
Time to
read
<1’

कालपासून मायबोलीच्या लेखनांखाली तुम्हाला रंगीबेरंगी बटने दिसायला लागली असतील. मायबोलीवरचे लेखन सोशल मिडिया वर शेअर करणे सोपे व्हावे म्हणून ही सोय केली आहे. ही सोय पूर्वी ही (६ महिन्यांपूर्वी) होतीच पण व्हॉट्सअ‍ॅप वर अणि पिंटरेस्टवर शेअर करण्याची सुविधा मायबोलीसाठी नवीन आहे.
व्हॉट्सअ‍ॅपकारांच्या धोरणाप्रमाणे फक्त मोबाईलवरूनच आणि तेही तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप असेल तर शेअर करता येते.
व्हॉट्सअ‍ॅपसोडून इतर सोशल मिडीया वर डेस्क्टॉप किंवा मोबाईल दोन्ही पद्धतीने शेअर करता येईल.

प्रकार: 
शब्दखुणा: 

धन्यवाद एडमिन टीम

खूप छान छान बदल घडवून आणत आहात म्हणून शतशः अभिनंदन

अरे वा!
(डेस्कटॉपवर व्हॉटसअ‍ॅप वेब वापरूनही करता येईल बहुतेक.)

एक नंबर मास्तर !!!
आत्ताच ट्रायल म्हणून माझे शे दोनशे धागे व्हॉटसपवर शेअर करून टाकतो Happy

भारी सोय केलीत.
आत्ताच ट्रायल म्हणून माझे शे दोनशे धागे व्हॉटसपवर शेअर करून टाकतो >>> का बे , व्हॉटसप बंद पाडायचा विचार आहे का ? Proud

हे जे शेअर केलं जाईल इथून आपल्याला कळतं का? म्हणजे एखादे लिखाण अमुक एका ठिकाणी किती जणांनी शेअर केले हे कळू शकते का? निदान आपले लिखाण शेअर झाले असेल तर आपल्याला तरी?