व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व

मुखवटा

Submitted by अक्षय समेळ on 5 October, 2021 - 23:57

दडलेले मनोभाव मुखवट्यापाठी
नाटकी वागणे शोभे चेहऱ्यावरती
किती सोजवळ, किती निरागस
पाही त्याची होते हमखास फसगत

मनात कटुता बोलणे तरी मधुर किती
जवळचे होऊनी वार करी पाठीवरती
ओळखण्यास चुकतो, जीवास मुकतो
जेव्हा मैत्रीच्या पोशाखात वैरी निघतो

तोंडावर वर्षाव स्तुतीसुमनांचा होतो
पाठ वळताच निंदेचा बाझार भरतो
पत ढासळते, प्रतिष्ठा धुळीस मिळते
सामील असतात त्यात आदर करणारे

वाटते कधी टर टर फाडावे हे मुखवटे
झप झप वेशीवर टांगावे त्यांची लकत्तरे
पण आपण सुध्दा कुठे आहोत वेगळे
आरसा दाखवून मन शांतपणे विचारते

डॉक्टर मी काय करू?

Submitted by कीर्ति.चेल्लम्मा on 28 September, 2021 - 02:46

डिस्क्लेमर - मी ना मानसोपचारतज्ञ आहे ना समुपदेशक. मी केवळ एक हौशी लेखक आहे. तेव्हा लिखाणा तृटी असू शकतात नव्हे आहेतच त्या वाचकांनी सांभाळून घ्याव्या. या कथेचा कोणाला फायदा झाला तर कृतार्थ होइन. निदान काही अंशी सजगता यावी अशी आशा करते. मला हा लेख माझ्या खर्‍या नावाने टाकण्यात रस नाही. शर्मिलाताईंचा 'बाधा' (https://www.maayboli.com/node/80183) हा लेख वाचून मला हे स्फुट टाकण्याचा धीर आला. कलोअ.

मुखवटे

Submitted by पाषाणभेद on 20 September, 2021 - 19:23

खरे चेहरे झाकण्या चढवूनी खोटे मुखवटे
खरेच आहे भासवतात मग ते चेहरे खोटे ||१||

मनात कटूता असूनी वाहवा करती
हसूनी खोटे वार करती पाठीवरती ||२||

तोंडदेखला आदर देवूनी स्वागत होई
पाठ वळता निंदा करण्याची करती घाई ||३||

स्वार्थ साधण्या स्तूती करती तोंडभरूनी
कार्यभाग संपला, टिकेची झोड वदनी ||४||

खोटे चेहरे वागवीत खोटे जीवन का जगावे?
मुखवट्याविना खरे चेहरे जगाला दाखवावे ||५||

- पाषाणभेद
२१/०९/२०२१

शब्दखुणा: 

अदूला सातव्या वाढदिवसाचं पत्र: असंख्य प्रश्न आणि अमर्याद स्वप्नं

Submitted by मार्गी on 17 September, 2021 - 04:41

शशक पूर्ण करा - सावली - सामो

Submitted by सामो on 11 September, 2021 - 15:00

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....

रिग्रेशन थेरपीमध्ये मी माझ्या सबकॉन्शसमध्ये डोकावले आहे. माझ्यासारखे दिसणारे हे कोणते भिन्न व्यक्तीमत्व! जंगने याला 'शॅडो पर्सनॅलिटी' म्हटले आहे.

किती खल, मॅनिप्युलेटिव्ह, व्हल्नरेबल, कॉम्प्लेक्स, आकर्षक आहे ही स्त्री. जे मी मला स्वत:ला नाकारले, त्या गुणावगुणांनी माझी सावली बनत गेलेली हीच ती.

आताच मला हे रुमीचे शब्द का आठवतायत - Beyond right and wrong there is a field. I will meet you there.

एल्विस प्रिस्ले - द किंग ऑफ रॉक

Submitted by बाख on 15 August, 2021 - 23:23

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना रॉक स्टार एल्विस प्रिस्ले या नावाने संबोधले. अभिनेते शम्मी कपूर याना हिंदी सिनेमा सृष्टीचे एल्विस प्रिस्ले म्हंटले जायचे.स्कॉट मूरहेड नावाच्या अमेरिकन संगीतकाराने "ही इज माय एल्विस (प्रिस्ले)" असा सुप्रसिद्ध सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांचा गौरव केला.

एल्विस द पेल्विस या जगद्विख्यात नावाने ओळखला जाणारा किंग ऑफ द रॉक एल्विस अरोन प्रिस्ले अमेरिकेत जन्माला आला नसता तर हिंदी सिनेमातील अभिनेता शम्मी कपूर त्याचा पुतण्या राजीव कपूर प्रमाणे केंव्हाच विस्मृतीत गेला असता.

नय्यारा नूर - भारतात जन्मलेली पाकिस्तानी गायिका.

Submitted by बाख on 9 July, 2021 - 08:04

नय्यारा नूर - भारतात जन्मलेली पाकिस्तानी गायिका.

नादिया मुराद - द लास्ट गर्ल

Submitted by स्वेन on 2 July, 2021 - 05:06

अडॉल्फ हिटलरचं मेईन काम्फ, एपीजे अब्दुल कलाम यांचं विंग्ज ऑफ फायर, नेल्सन मंडेला यांचं लाँग वॉक टू फ्रिडम, राकेश मारिया यांचं लेट मी से इट नाऊ, बराक ओबामा यांचं अ प्रॉमिस्ड लॅंड, देव आनंद यांचं रोमान्सींग विथ लाईफ ही अशी आत्मकथनाची पुस्तकं हातात पडल्यावर आपण वाचायला सुरुवात करतो आणि मग ते पुस्तक वाचून संपवल्याशिवाय खाली ठेववत नाहीं.

एका माणूसघाण्याची गोष्ट

Submitted by विद्या भुतकर on 29 June, 2021 - 23:56

एक होता माणूसघाण्या. आता तुम्ही म्हणाल 'शी किती घाण वाटतं माणूसघाण्या म्हणायला.' हो पण मराठीने जरा प्रेमळ शब्द दिले तर मराठी कसली. प्रेमळ हा एकच शब्द प्रेमळ असावा मराठीत. असो. तर मी जरा शॉर्टकट मारून त्याला 'माघा' म्हणते. नाहीतर, सारखं माणूसघाण्या म्हणायलाही लै टाईप करायला लागतं. मी काय सांगत होते? हां, माघाची गोष्ट. तर माघा जन्मला तेव्हा काही माघा नव्हता, किंवा त्याला माहित नव्हतं आपण माघा आहोत ते. त्यामुळे त्याचं शाळा, शिक्षण, कॉलेज वगैरे सर्वांसारखंच झालं. उलट शाळेत 'किती बोलतोस रे तू' म्हणून शिक्षकांच्या तक्रारीही यायच्या.

आप्पा

Submitted by विद्या भुतकर on 27 June, 2021 - 22:28

आज संध्याकाळी चालायला बाहेर पडल्यावर कोपऱ्यावर एक ओळखीचा वास आला. खरंतर मी एका नवीन बांधकाम चालू असलेल्या घरासमोरून जात होते. तिथे तो वास येण्याचं काय कारण असेल? तरीही तो वास माझा माग सोडेना. म्हणून थांबले दोन क्षण तिथेच. किराणामालाच्या दुकानातल्या रद्दीच्या कागदांच्या थप्पीचा वास तो. रद्दीच्या दुकानातला नाही हां. तो वेगळाच असतो. हा वास जरासा ओलसर, जरासा तेलकट,मीठ-साखर आणि त्यात मिसळलेला कागदाच्या थप्पीचा. त्या वासाने मला आप्पाची आठवण आली. आता वयानुसार आप्पाला 'अहो आप्पा' म्हणणं गरजेचं, पण सवय.

Pages

Subscribe to RSS - व्यक्तिमत्व