ही फेसबुक पोस्ट असती तर मी याची सुरूवात "लंडन मधल्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउण्डला सगळेच लाइक करतात. पण त्याच शहरात असलेल्या या ओव्हल ला एक लाइकतरी बनतोच" अशी केली असती. हे लंडनमधेच असलेले ओव्हल क्रिकेट ग्राउण्ड. पूर्वी केनिंग्टन ओव्हल किंवा नुसतेच द ओव्हल म्हणत - आता अधिकृत नाव " "किया ओव्हल". क्रिकेटप्रेमींच्या लंडन ट्रिपमधला टीआरपी लॉर्ड्स खेचून घेते आणि हे तितकेच चांगले मैदान उपेक्षित राहते. मी लॉर्ड्स याआधीच पाहिले आहे, त्याच्या टूरबद्दल काही वर्षांपूर्वी इथे लिहीलेही आहे.
(पूर्वप्रसिद्धी : 'तुषार' दिवाळी अंक)

(पूर्वप्रसिद्धी - 'शिवतेज' दिवाळी अंक २०२४)

‘मार्च’ महिन्यात जन्मलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू
‘मार्च’मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या ‘प्रभावशाली, कल्पक, उत्साही, धाडसी’ असतात असे म्हटले जाते. सध्या चालू असलेल्या मार्च महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकणे नक्कीच रंजक ठरेल.
या वर्षी १२ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’द्वारा वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. त्यानिमित्ताने, ‘सीसीआय’ आणि ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’ यांच्या वादातून आणि विजय मर्चंट यांनी बॅ. शेषराव वानखेडे यांना डिवचल्यामुळे वानखेडे स्टेडियमची स्थापना कशी युद्धपातळीवर झाली याची रंजक कहाणी एव्हाना क्रिकेटरसिकांना मुखोद्गत झाली आहे. वानखेडेवरील पहिला कसोटी सामना २३ ते २८ जानेवारी १९७५ दरम्यान भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला गेला. हा सामना वेस्ट इंडीजने २०१ धावांनी जिंकला.
‘फेब्रुवारी’ मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या ‘सृजनशील, प्रामाणिक, शांत व द्रष्टया’ मानल्या जातात. चालू ‘फेब्रुवारी’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.
‘जानेवारी मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या ‘कल्पक, दृढनिश्चयी व नेतृत्वगुणयुक्त’ मानल्या जातात. चालू ‘जानेवारी महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.
( मुंबईचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दत्ता हिंदळेकर यांच्या निधनाला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण झाली , त्यानिमित्ताने स्मरणांजली )

‘डिसेंबर’ महिन्यात जन्मलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू