कुटुंब

ताई

Submitted by Yogita Maayboli on 23 July, 2019 - 02:09

अशाच एका आठवणीत भेटलीस आम्हाला तू
प्रत्येक अडचणींना पार करताना दिसलीस आम्हाला तू

 कधी मोठी बहीण, कधी मैत्रीण, तर कधी आई होऊन पाठीशी उभी तुझीच सावली
तुझ्या रूपाने जणू काही मिळाली आम्हाला एक नवीन माउली

 तुझे ते गुबरे गाल,कधी हसताना कधी फुगताना  दिसतातआम्हाला
पण त्यात लपलेली अनामिक चिंता लपवताना भासलीस तू

 तुझ्या डोळ्यातला तो तीळ जणू तुला सगळ्यापेक्षा वेगळेकरून गेला
आणि त्याच डोळ्यात लपलेली काळजी तुझ्या अजूनजवळ घेऊन गेला

 मुलांसाठी राबताना नेहमीच आम्हाला दिसलीस तू
पण त्यातही तुझ्यातल्या "मी" ला शोधताना भासलीस तू

शब्दखुणा: 

नव्या घरी नवं राज्य (ग्रीस ८)

Submitted by Arnika on 12 November, 2018 - 07:18

थंडीच्या पहिल्या लाटेबरोबर सिक्याचा हमरस्ता मिटला. गजबजलेलं गाव एका रात्रीत ओसाड झालं किंवा माझी निघायची वेळ जवळ आल्याने मला तसं वाटायला तरी लागलं. भरल्या बॅगेसमोर सिक्याच्या घरचे सगळे घोटाळायला लागले. यासोनासने स्वतः माझ्या बॅगेत बसून बाहेरून चेन लावायचा प्रयत्न करताना हात चेमटून घेतला. तशीही रडारड व्हायचीच होती; यासोनासला एक निमित्त तरी मिळालं.

कुटुंब

Submitted by Asu on 8 August, 2018 - 00:27

कुटुंब

संकटी जे धावत येती
त्यास कुटुंब म्हणती
संकटी जे दूर पळती
त्यांची कशात गणती ?

काटा रुतता एका
वेदना दुसऱ्या होती
एकाचे अश्रू पुसण्या
कुटुंबाचे हात येती

राहून एका सदनी
बोल वेगळे वदनी
ऐशा समूहा जगती
कुटुंब का म्हणती ?

उगाच नाती-गोती
वेंधळीच ही भरती
पक्षीही जगण्यासाठी
वृक्षी बांधती घरटी

जखमा दिल्या ज्यांनी
ते तर परकेच होते
वार झेलण्या परंतु
आपले कुणीच नव्हते

शब्दखुणा: 

स्नूपीने दिलेली मला शेवटची भेट...

Submitted by Vaibhav Gilankar on 10 February, 2018 - 00:50

नमस्कार मायबोलीकर,
मागच्या दिवाळीत दै. दिव्य मराठीच्या मधुरिमा दिवाळी अंकात माझी 'शापित जग' हि लघुकथा प्रकाशित झाली होती. नंतर मग मी ती admins ची परवानगी घेऊन मायबोलीवरही सादर केली.
त्याची लिंक हि आहे: https://www.maayboli.com/node/64611

विषय: 

एक कागद

Submitted by गबाळ्या on 11 December, 2017 - 12:50

एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला
जसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला
एक कागद कस्पटासम ।। धृ ।।

एक बालक हाती घेई,
मायेने मग आकार देई,
बनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला ।। १ ।।

उंच विहरता मन स्वच्छंदी,
हीन भासली भुतल रद्दी,
वाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला ।। २ ।।

वाटे त्यासी उंच उडावे
वादळ वारे यांसी भिडावे
कांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला ।। ३ ।।

इतकी उंची तये गाठली
साद मनीची नभी आटली
ढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला ।। ४ ।।

परगावी राहणाऱ्या प्रियजनांची काळजी

Submitted by सिम्बा on 27 September, 2016 - 09:15

मायबोलीच्या जुन्या धाग्यांचे उत्खनन करताना मधुरिमा यांचा हा धागा सापडला

आई वडिलांची काळजी http://www.maayboli.com/node/2577?page=1

योगयोगाने मी सुद्धा नोकरी साठी आई वडिलांपासून दूर राहतो आहे, माझ्या एकदोन कलीग्स न आलेले अनुभव, अडचणी यांनी एकटे असणारे सिनिअर सिटीझन्स हे समस्या प्रकर्षाने समोर आली.
एकटे आणणाऱ्या सिनिअर सिटीझन्स (सध्या तरी फक्त पुणे शहर) साठी एक service चालू करण्याचा विचार मनात मूळ धरतो आहे.

१) व.ना चा एक वर्ग आहे जो उठून अथश्री सारख्या सोसायटी मध्ये जाऊ शकतो,

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कुटुंब