व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व

प्रतिभा आणि त्यातली करिअर्स

Submitted by केअशु on 7 March, 2021 - 07:44

प्रतिभा म्हणजे मराठीत ज्याला क्रिएटिव्हिटी म्हणतात त्याला भारतात सध्या किती महत्व आहे? पुढे किती असेल?

प्रतिभा नक्की कशाला म्हणावं? मीम्स बनवणं,व्हिडिओ एक नि त्यावर गाणे भलतेच चढवून खसखस पिकवणे यांना प्रतिभा म्हणता येईल का?

क्रिएटिव्हिटी आणि फालतूपणा यांना अोळखण्याच्या खूणा कोणत्या? त्या कालपरत्वे,वयोपरत्वे बदलतात का?

अॅनिमेशन बनवणे किंवा फोटोग्राफी ही प्रतिभा आहे का? की ते तंत्र आहे?

एक प्यार का नगमा है: गीतकार संतोष आनंद यांची ह्रदयस्पर्शी कहाणी

Submitted by अतुल. on 23 February, 2021 - 02:18

एक प्यार का नगमा है... माझं अत्यंत आवडतं गाणं. गाण्याला अजोड उंचीवर नेऊन ठेवणारे लतादीदी आणि मुकेशजी. आणि संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल. पण त्याचे गीतकार कोण, सध्या कुठे आहेत. काही माहित नव्हतं. जगाच्या विमृतीत गेलेला हा गीतकार. या व्यतिरिक्त त्यांनी कितीतरी सुंदर गाणी त्या काळात दिलीत. जसे कि:

मेघा रे मेघा रे...
तेरा साथ है जो मुझे क्या कमी है...
मोहब्बत है क्या चीज...

सर्वोत्तम व्हा, सर्वोत्तम द्या

Submitted by दिनेशG on 19 February, 2021 - 16:03

एक अनोळख्या प्रदेशात भटकता भटकता चौकामध्ये चार रस्ते समोर येतात. तेथील बोर्डावर बाण दाखवून कुठला रस्ता कुठे जातो हे दाखवलेले असते. तुम्ही थोडा वेळ थांबता. गावाचे नाव आणि दिशादर्शक बाण याची सांगड घालता आणि मग पुढे मार्गस्थ होता. जर लिहिलेले अनोळखी भाषेत असेल तर कुणाला तरी कुठला रस्ता घ्यायचा ते विचारता.

शब्दखुणा: 

पुस्तक परिचय - मादाम क्युरी

Submitted by प्राचीन on 4 January, 2021 - 02:45

पुस्तक परिचय - मादाम क्युरी.
मूळ लेखिका - ईव्ह क्युरी
इंग्रजी अनुवाद - व्हिन्सेंट शीऍन
मराठी अनुवाद - अश्विनी भिडे - देशपांडे.
ग्रंथाली प्रकाशन.

सावित्री

Submitted by अनाहुत on 2 January, 2021 - 23:41

गोष्ट तशी फार जूनी ... तिची सुरुवात होते आजपासून १९० वर्षांपूर्वी ... कसा असेल तो काळ ...

प्रस्थापितांविरुद्ध जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा अटळ असतो तो संघर्ष ... कोणत्याही कालखंडात कुणालाही चुकला नाही तो संघर्ष ... आजही आपण आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करतो ... संघर्ष करतो . पण त्या काळी कुणीतरी फक्त स्वतःसाठी नाही तर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी संघर्ष करत होत . कसा होता तो संघर्ष ..

जळू....!

Submitted by ASHOK BHEKE on 22 December, 2020 - 11:03

कुत्र्यांची एक खासियत असते, कुणीही दिसले कि भुंकणे सुरु. एखादा हत्ती दुरून येताना दिसला कि यांचे भू-भू सुरु झालेच समजा. पण जसा-जसा तो हत्ती जवळ येईल. तसतसे कुत्रे भुंकणे सोडून शेपटी टाकून दूर पळून जातात. परवा एक हत्ती रस्त्याने चालला होता. हत्तीवर माहूत बसला होता. त्याचा रुबाब पाहून रस्त्यावरची कुत्री भुंकत होती. साहजिक आहे भुंकणारच. हत्तीसारखं डौलदार चालणे हे त्यांच्या डोळ्यात भरणारे कदाचित असावे. पण अशी किती कुत्री भुंकत असतात, पण हत्तीने कधी मागे वळून बघितले नाही. एखाद्याच्या स्वभावाला औषध नसते ते तंतोतंत खरेच.

गांभीर्य विनोदापेक्षा अधिक फलदायी असते.

Submitted by केअशु on 16 October, 2020 - 02:10

विनोद हे अतिउत्साहाचे फलित आहे.सोप्या शब्दात आनंद, खोडकरपणा यांचा भावनावेग वाढला की विनोदनिर्मिती होते. भारतात याचे प्रमाण जास्त आहे. म्हणूनच टीकटॉकचे सर्वाधिक वापरकर्ते हे भारतात होते. तशाच प्रकारच्या टवाळ अॅप नव्याने भारतात मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत.भारतात वैज्ञानिक/तांत्रिक संशोधनाचे प्रमाण कमी आहे पण विनोदी चित्रपटांची संख्या मात्र भरपूर आहे.भारतातल्या कोणत्याही भाषेत बनणार्‍या सिनेमांमधे विनोदी सिनेमांची संख्या ही लक्षणीय असते. असे का असावे बरे?

शब्दखुणा: 

फटाक्यांची भीती

Submitted by मोरपिस on 4 October, 2020 - 05:20

काही लोकांना उंचावरून पाहण्याची, पाण्याची भीती वाटते पण मला लहानपणापासून फटाके आणि त्यांच्या आवाजाची खूप भीती वाटते. एका महिन्यावर दिवाळी येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या दिवसात तर जीव रडकुंडीला येते आणि. मी या भीतीमधून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दिवाळी किंवा लग्नाच्या वरतींमध्ये सर्वजण फटाके उडवत मजा करत असतात. तर मी दुसऱ्या बाजूला कानाला हेडफोन लावून बसलेली असते. खूप जण या विषयावरून माझी मस्करी करत असतात. जरा कुठे फटाके वाजले की माझ्या काळजात धडधड वाढते. इंटरनेटवर फटाक्यांची भीती नॉर्मल असल्याचे सांगतात पण प्रत्यक्षात मला खूप अपमानास्पद वाटत.

बॉडी लँग्वेज.

Submitted by बिथोवन on 22 September, 2020 - 04:22

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटलमध्ये सुपर ओव्हरमध्ये संपलेला क्रिकेटचा सामना तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात येईल की मार्क्स स्टॉइनिसने मयांकच्या देहबोलीवर कसे बारीक लक्ष ठेवले आणि त्याला चूक करायला भाग पाडले. ३ चेंडूंत केवळ १ धाव आणि सामना जवळजवळ मयंकच्या हातात होता. 'मयंक आता चेंडू केवळ पुश करून एक धाव काढतो की चौकार-षटकाराने सामना संपवतो, हे पाहावे लागेल,' असे समालोचक म्हणाला पण तो फटका मारणार हे नक्की, हे त्याच्या देहबोलीत असणाऱ्या आक्रमणाची लक्षणे दिसत होती त्यावरून कोणीही कयास बांधला असता. पहिला डॉट बॉल गेला.

अदूला सहाव्या वाढदिवसाचं पत्र- औ पाबई!

Submitted by मार्गी on 17 September, 2020 - 23:23

Pages

Subscribe to RSS - व्यक्तिमत्व