व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व

श्री. अतुल पेठे - तेंडुलकरांबद्दल...

Submitted by चिनूक्स on 1 June, 2009 - 10:28

रंगकर्मींच्या अनेक पिढ्या तेंडुलकरांनी वाट सुकर केली, म्हणून दर्जेदार कलाकृती निर्माण करू शकल्या. मराठी रंगभूमीवर नेत्रदीपक कामगिरी करणार्‍या श्री. अतुल पेठे यांनाही तेंडुलकरांनी व त्यांच्या नाटकांनी प्रभावित केलं होतं.

डॉ. शिरीष प्रयाग - तेंडुलकरांचे अखेरचे दिवस

Submitted by चिनूक्स on 26 May, 2009 - 14:11

"'तें' दिवस" या श्री. विजय तेंडुलकरांच्या अखेरच्या पुस्तकाचं प्रकाशन १९ मे रोजी डॉ. शिरीष प्रयाग यांच्या हस्ते पुण्यात झालं. 'मायस्थेनिया ग्रेव्हीस' या आजारानं जर्जर झालेले तेंडुलकर त्यांच्या अखेरच्या दिवसांत डॉ.

प्रकाशवाटा - डॉ. प्रकाश आमटे

Submitted by चिनूक्स on 26 May, 2009 - 02:15

'श्रम ही है श्रीराम हमारा' असं म्हणणार्‍या बाबांनी वरोड्याच्या ओसाड, खडकाळ जमिनीवर 'आनंदवन' उभारलं. कुष्ठरुग्णांना आत्मसन्मान मिळवून दिला. ताठ मानेने जगण्याचं बळ दिलं.

शब्दखुणा: 

श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

Submitted by webmaster on 26 January, 2009 - 22:30

श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याबद्दलचे हितगुज

यापूर्वीचे हितगुज इथे पहा

सलाम आशाताई!!

Submitted by चिनूक्स on 7 September, 2008 - 19:54


asha3.jpg

गेली साठ वर्षं आशाताईंच्या स्वरानं आपल्याला भुरळ घातली आहे.
थेट मनाशी संवाद साधणारा तो आवाज...
अति कोमल. पल्लेदार. लवचिक. आर्त. अवखळ. राजवर्खी. नितळ. आरस्पानी. अद्भुत. मानुष आणि दैवीही...

हा आवाज कधी झेपावत्या प्रमत्त प्रपातांची आठवण करून देतो, तर कधी त्यात तळपत्या समशेरीची फेक असते.
तो कधी उत्तेजित करतो, तर कधी क्लांत मनावर फुंकर घालतो.
धनुष्याचा टणत्कार, शंखांचा उद्घोष असं सारं त्या आवाजात असतं.
हा आवाज पुरतं झपाटून टाकतो. वेड लावतो.

वेल्हाळ माणूस

Submitted by चिनूक्स on 3 September, 2008 - 00:00

veenatai2.jpg

गोनीदांनी लिहिलेल्या 'पडघवली', 'जैत रे जैत', 'मोगरा फुलला', 'पवनाकाठचा धोंडी' इ. कादंबर्‍यांच्या अभिवाचनाचे १९७५ सालापासून सुमारे ५०० कार्यक्रम वीणाताईंनी केले आहेत. वाचिक अभिनयाचा अतिशय सुंदर असा हा आविष्कार असतो.
'परतोनि पाहे' हा वीणाताईंनी लिहिलेला व्यक्तिचित्रसंग्रह. 'वेल्हाळ माणूस' हे या संग्रहातील एक अतिशय हृद्य व्यक्तिचित्र. या लेखाचे वीणाताईंनी केलेले वाचन...

Pages

Subscribe to RSS - व्यक्तिमत्व