एका भटक्या ज्योतिष्याचे भाकित
कॉलेज मधे असताना एका मित्राच्या शेअर मार्केट च्या फर्म मधे बसलो होतो. गर्दी वगैरे नव्हती. तेवढ्यात काळी टोपी, धोतर व कोट घातलेला एक भटका ज्योतिषी तिथे आला. त्याने अल्पावधीतच तिथल्या लोकांवर गारुड घातले. कुंडली पाहून तो ज्योतिष सांगे. मित्राने, त्याच्या भावाने आपापली पत्रिका दाखवून स्वत:ची करमणूक कम उत्सुकता शमवून घेतली. मी तेव्हा नुकतेच व.दा.भटांचे कुंडली तंत्र आणि मंत्र हे पुस्तक वाचून ज्योतिष शिकलो होतो.मला ही वाटले गंमत म्हणुन याला आपली पत्रिका दाखवावी.