कॉलेज मधे असताना एका मित्राच्या शेअर मार्केट च्या फर्म मधे बसलो होतो. गर्दी वगैरे नव्हती. तेवढ्यात काळी टोपी, धोतर व कोट घातलेला एक भटका ज्योतिषी तिथे आला. त्याने अल्पावधीतच तिथल्या लोकांवर गारुड घातले. कुंडली पाहून तो ज्योतिष सांगे. मित्राने, त्याच्या भावाने आपापली पत्रिका दाखवून स्वत:ची करमणूक कम उत्सुकता शमवून घेतली. मी तेव्हा नुकतेच व.दा.भटांचे कुंडली तंत्र आणि मंत्र हे पुस्तक वाचून ज्योतिष शिकलो होतो.मला ही वाटले गंमत म्हणुन याला आपली पत्रिका दाखवावी. मी दाखवल्या नंतर त्याने स्वत:शी मिश्किल हसत माझ्याकडे पाहून तर्जनी नाकाकडे नेउन दोन्ही हाताचे पंजे एकमेकांशी जुळवून स्वत:च्या पोटाकडे नेउन अर्थवर्तुळाकार दिशेने फिरवत माझ्याकडे सूचक पाहिले. मला त्याचा अर्थ समजला. मी त्याला म्हणले की तसे काहीच नाही. तो हॅ हॅ करुन हसला. मी म्हटले खरेच तसे काही नाहीये. मला मुलींशी दोन शब्द बोलता येत नव्हते. इतका मी मुलींना घाबरायचो. आज देखील घाबरतो .त्याविषयी एक स्वतंत्र पोस्ट मी पुर्वी इथे केली आहे.
"कशाला खोट बोलताय राव! आपल ज्योतिष खोट जात नसतय." अशा वल्गना करुन झाल्या. मी ही माझ्या ज्योतिष अभ्यासाची झलक त्याला दाखवली. पण तो ही त्याच्या अभ्यासावर ठाम होता.
" शक्यच नाही. फार तर अजून तसे घडल नसेल ही पण मी खात्रीने सांगतो की तुमची पत्रिकाच सांगतिये की शुक्र मंगळ नवपंचम त्यातून शुक्र नेपच्चून ही तूळ राशीत भाग्यात. तुमच्यावर स्त्रीया फिदा आहेत."
"अहो पण मला साधी मैत्रिण देखील नाही."
"ते मला माहित नाही पण आज जरी तुम्ही म्हणता ते खरे असेल तरी भविष्यात माझे भाकित खोटे ठरणार नाही. माझी आठवण तुम्हाला तेव्हा येईल."
कशाच्या आधारे एवढे ठाम सांगताय? मलाही जाणून घ्यायचे आहे. कुठली पुस्तके तुमच्याकडे आहेत? तुम्ही पुण्यात कुठे उतरला आहात?
मग त्याने मला एक पत्त्त्ता दिला. तो होता वडारवाडीचा. मलाही कंड होताच कुठ्ल्या ग्रंथाच्य आधा्रे एवढे तो ठाम सांगतोय. शिवाय माझे भाकित हे भविष्यात कधी ना कधी खरेच ठरेल अशी खात्री तो कशाच्या आधारे सांगतोय. अजून पर्यंत तरी त्याने अंतस्फूर्ती हा शब्द उच्चारला नव्हता. मला तो बंडल माणूस वाटला तरी उत्सुकता होतीच. मग मी त्याने सांगितलेल्या वडारवाडीच्या पत्त्यावर गेलो. तिथल्या बाईने मला सांगितले की असा कुणी ज्योतिषी आमच्या माहितीत नाही. मग मी आजूबाजूला कुणी आहे का? असे विचारले. तिने सांगितले की आजूबाजूला पण कुणी असा नाहीये. थोडक्यात त्याने मला चूत्या बनवले होते.
मी नंतर मित्राला विचारले तेव्हा त्याने मला सांगितले की राहू केतू एकग्र लिहून एक कुंडली त्याला दिली तर त्याने ती बोगस असल्याने सांगितले. यावरुन त्याचा अभ्यास होता हा निष्कर्ष त्याने मला सांगितले. मग मी मित्राला म्हणले की पुणे आणि मुंबई नकाशात एकाच ठिकाणी दाखवले तर तुला ते बोगस आहे हे समजेल की नाही? तसेच पत्रिकेत असते. राहू केतू हे नेहमी 180 डिग्री अपोजिट असतात. ज्योतिषाने सगळ्यांकडून यथाशक्ती दक्षिणा वसूल केली होतीच. अगदी माझ्याकडून सुद्धा 21 रुपये वसूल केले होते.
अजून तरी ज्योतिषाचे भाकित खरे झाले नाही. इथून पुढे शक्यता जवळ जवळ नाहीच. वैज्ञानिक भाषेत बोलताना शक्यतेच विचार असाच मांडावा लागतो. शून्य शक्यता असे म्हणता येत नाही. पुढचे आयुष्य किती ? त्यातून त्या ज्योतिषाचे भाकित खरे ठरण्याची शक्यता किती? जवळ जवळ नाहीच. पण विज्ञानाच्या भाषेत बोलायचे झाले की आज मी बाप होउ शकतो का? तर त्याचे उत्तर हो असे आहे.
एका भटक्या ज्योतिष्याचे भाकित
Submitted by प्रकाश घाटपांडे on 13 May, 2025 - 09:27
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मजेशीर किस्सा आहे.
मजेशीर किस्सा आहे.
भाग्यात म्हणजे ९ व्या घरात
भाग्यात म्हणजे ९ व्या घरात आहेत का? नवव्या घरात ग्रहं फक्त पूर्वपुण्याईने पडतो/ येतो.
ज्योतिष्याचे हवे
शीर्षकात - 'ज्योतिष्याचे' असे हवे
भाग्यात म्हणजे ९ व्या घरात
भाग्यात म्हणजे ९ व्या घरात आहेत का?>>>> हो भाग्यात शुक्र नेपच्चून युती तुळेत, व मंगळ पंचमात मिथुनेचा व गुरु कुंभेचा लग्नी , वृषभेचा चंद्र चतुर्थात, शनी केतु मकरेचा व्ययात अशा ग्रहसंकुलातील पत्रिका आहे
नेपच्युन ज्या ग्रहाच्या
नेपच्युन ज्या ग्रहाच्या संपर्कात येतो त्याचे शुद्धीकरण करतो. शुक्र प्रेमाचा कारक आहे. शुक्राचे शुद्ध हायर ऑक्टेव्ह म्हणजे डिव्होशन, समर्पण आणि अशरीरी प्रेम. अशरीरी म्हणजे कर्केचे नाही. कर्केचेही प्रेम अगदी निस्वार्थी असते पण ते असते वात्सल्य.
सहसा शुक्र- नेपच्युन युती मधील लोक मृगजळाच्या मागे लागतात. प्रेम ना मिळते ना तहान भागते. यात शारीरीक प्रेम नसून, हायर ऑक्टेव्हवरचे प्रेम आहे. पण याचा अंत अध्यात्माकडे वळण्यात होतो. शेवटी अध्यात्मातच विसावा मिळतो.
प्रघा आपल्या अनुभवाशी किती रेझोनेट होते ते मला माहीत नाही परंतु ही माझी माहीती आहे.
गुरु कुंभेचा = विज्ञानवादी अगदी चिकीत्सक बुद्धीची देण तिथुन आलेली आहे. इतर लोकं फुलपाखरु पाहून अॅडमायर करतात, कुंभ रास जेव्हा फुलपाखरु बघते तेव्हा त्यांना डिसेक्शन आठवते
----------------
व्ययातील शनि मला वाटतं फार कठीण परीक्षा घेतो. एकंदर बरीचं हार्डशिप असते. गोष्टी सहजगत्या मिळत नाहीत. आटोकाट प्रयत्न केल्यानंतर काही थोडं मिळतं.
---------
तरी मला शंका होतीच.
तरी मला शंका होतीच.
कसली शंका बोकलत? मिथुनेत आहे
कसली शंका बोकलत? मिथुनेत आहे का ने-शु तुमचा? का मंगळ किंवा चंद्र आहे मिथुनेचा? काहीतरी मिथुन आहे तुमच्या कुंडलीत.
सामोजी माझ्या कुंडलीबद्दल
सामोजी माझ्या कुंडलीबद्दल सांगा ना काहीतरी.

बोकलत मला कळत नाही.
बोकलत मला कळत नाही.
भरपूर माहिती आहे तुम्हाला
भरपूर माहिती आहे तुम्हाला सांगा ना काहीतरी.
मंगळ उच्चीचा दिसतोय व दिगबलही
मंगळ उच्चीचा दिसतोय व दिगबलही आहे. कारण १० वे घर त्यात मकर. करीअरकरता चांगले.
(१) वृश्चिक रास व आठव्यात चंद्र. आतल्या गाठीचे असाल.
(२)शु मिथुनेचा म्हणुन विनोदाकडे ओढा असावा. शिवाय वाणीचा कारक बुधही वाणीच्या म्हणजे दुसर्या घरात आहे त्यामुळे सुद्धा एकंदरीत थिल्लर वॄत्ती.
सूर्यही उच्चीचा व पहील्या घरात आहे. तब्येत उत्तम रहाणार.
एवढेच येते. आता १ आणि २ परस्पर विरोधी आहे तेव्हा मला इतके सखोल ज्ञान नाही की मग पुढे काय प्राधान्य घेइल वगैरे. असो.
सामोजी पत्रिका अनेक ज्योतिष
सामोजी पत्रिका अनेक ज्योतिष लोकांना दाखवली त्यांनी ज्या चांगल्या गोष्टी सांगितल्या त्या आतापर्यंत काही घडल्या नाहीत पण वाईट गोष्टी सगळ्या बरोबर घडत गेल्या.
बोकलत, एकदा भटक्या व विमुक्त
बोकलत, एकदा भटक्या व विमुक्त ज्योतिषाला दाखवा.
कोणे एके काळी सव्वा प्लेट चिकन, सव्वा पाकिट सिगरेट, सव्वा बाटली बिअर किंवा सव्वा पेग व्हिस्की अशा माफक दक्षिणेवर मित्रमंडळींच्या पत्रिका बनवून देत असे. प्रवचनाला बसावे तसे मंडळी हा पसारा घेउन भविष्यकथन ऐकत असत. त्या अगोदर वातावरण निर्मिती म्हणून भीमसेन जोशींचे अभंग लावले जायचे. एखाद्याच्या पत्रिकेत जर काही प्रतिकूल भाग असेल तर त्याने ज्योतिषाला ( म्हणजे मला) अशाच प्रकारचा व्हिस्की बिअर चिकन चा नैवेद्य दर अमावस्येला अर्पण करावा म्हणजे दुष्ट शक्तींचा नायनाट होईल
अशा नैवेद्यांचे सामूहिक भक्षण होत असल्याने कुणाचीच तक्रार नसे.
सर्वेपि सुखिन: संतु।
धमाल किस्सा.
धमाल किस्सा.
श्रीशैलम् ला एका भटक्या जोतिष्याने मला कुंडली-हात वगैरे न पहाता “हा तुझा शेवटचा जन्म आहे, तू आता पाप-पुण्य काहीही केले तरी तुला पुनर्जन्म नाही” असे एकवाक्यिय भविष्य सांगितले होते.
सोबतच्या सर्वांना यावर्षी कार घेशील, घबाड सापडेल, मूल होईल, दुसरे लग्न होईल असे materialistic भाकित अन् मला डायरेक्ट मोक्ष !! क्यों ? कायकू ? कशाला ?
पुढे एका विख्यात कुंडलीविषारदांनीही बरीच आकडेमोड-अभ्यास करून तसेच काहिसे सांगितले. मग काय, मी सिरियसली घेतो जिंदगी ना मिलेगी दोबारा अन् मजा करतो 😀
>>>>जिंदगी ना मिलेगी दोबारा
>>>>जिंदगी ना मिलेगी दोबारा अन् मजा करतो
हाहाहा हे भारीये.
खूप काही अपेक्षा असणाऱ्याला
खूप काही अपेक्षा असणाऱ्याला "तुझं तसं काही नाही" हे सांगणे ही ज्योतिष सांगणाऱ्याची परीक्षा असते.
शनि रवी एकाच घरात, चौथ्या घरात, शनिची रवीवर ३,७,१० दृष्टी असलेल्या कुंडल्या पातळी खाली आणतात. मग इतर काही ग्रहांचे योगही प्रभाव पाडू शकत नाही.
तरीही नित्यानंद, चिदानंद, सहजानंद करण्यात चंद्राचाच वाटा असतो.
आयुष्याच्या शेवटापर्यंत साथ देणारे, प्रभाव करणारे ग्रह फक्त शनि आणि चंद्र. शारीरिक चिवटपणा आणि मन.
शनि आवडता ग्रहं आहे. त्याचं
शनि आवडता ग्रहं आहे. त्याचे व्यक्तीमत्व आवडते.
अनिंद्य, त्या भटक्या
अनिंद्य, त्या भटक्या ज्योतिषाने चेहरा व अंगलक्षण होरा शास्त्र पाहून सांगितले कि अंतस्फुर्तीच्या आधारे सांगितले?
आयुष्याच्या शेवटापर्यंत साथ
आयुष्याच्या शेवटापर्यंत साथ देणारे, प्रभाव करणारे ग्रह फक्त शनि आणि चंद्र. शारीरिक चिवटपणा आणि मन.>>>>> +१ अगदी थोडक्यात पण उत्तम सार!
.. होरा शास्त्र पाहून
.. होरा शास्त्र पाहून सांगितले कि अंतस्फुर्तीच्या आधारे सांगितले?..
नो आयडिया !
… तरीही नित्यानंद, चिदानंद, सहजानंद करण्यात…
म्हणजे सन्यास घेणे असा अर्थ ? समजले नाही
खूप काही अपेक्षा असणाऱ्याला
खूप काही अपेक्षा असणाऱ्याला "तुझं तसं काही नाही" हे सांगणे ही ज्योतिष सांगणाऱ्याची परीक्षा असते.
>>
साहित्य गद्य पद्य व इतर कलांचा आस्वाद घेताना लिखित शब्द, चितारलेल्या रेषांपलिकडे जाऊन काही अर्थ शोधायचा असतो हे समजण्यासाठी कुठल्या ग्रहाचे बळ लागते?
१. >>>तरीही नित्यानंद,
१. >>>तरीही नित्यानंद, चिदानंद, सहजानंद करण्यात…
म्हणजे सन्यास घेणे असा अर्थ ? समजले नाही>>>
- संन्यास नाही. आहे त्यात आनंद घेणे. लहानपणी आणि म्हातारपणी सूत्रे इतरांच्या हातात असतात तेव्हा जाणवते.
2. >>>साहित्य गद्य पद्य व इतर कलांचा आस्वाद घेताना लिखित शब्द, चितारलेल्या रेषांपलिकडे जाऊन काही अर्थ शोधायचा असतो हे समजण्यासाठी कुठल्या ग्रहाचे बळ लागते?>>..
समजते बऱ्याच लोकांना पण "काही अर्थ शोधायचा" म्हणजे मर्म समजणे हे बुध ग्रहाचे काम आहे.( मग ते क्षेत्र कोणतेही असो..खेळ, अर्थ, लेखन वगैरे). इतर ग्रहांची जोड मिळणे म्हणजे
मान्यता..गुरूचे वजन
सरकारी खुर्ची, पद वगैरे रवि
चिकाटी इतिहास, संशोधनात लागते ती..शनि
लोकांनी डोक्यावर घेणे..चंद्र
साहित्य गद्य पद्य व इतर
साहित्य गद्य पद्य व इतर कलांचा आस्वाद घेताना लिखित शब्द, चितारलेल्या रेषांपलिकडे जाऊन काही अर्थ शोधायचा असतो हे समजण्यासाठी कुठल्या ग्रहाचे बळ लागते? >>>
तुझ्याच कुंडलीत कोणते ग्रह बलवान आहेत ते बघ.
… आहे त्यात आनंद घेणे. …
… आहे त्यात आनंद घेणे. …
ओके. हे जमते मोस्टली. अजूनतरी. 👍
' गुरु-नेप्च्युन' युती
' गुरु-नेप्च्युन' युती वाल्यांना कविता समजते व त्यातून लोकप्रियता मिळते असे नीरीक्षण आहे. लोकप्रियता गुरुचा प्रांत. पण धो धो व अचानक लोकप्रियता नव्हे. तो राहूचा प्रांत.
शरदजी माझे वरचे विश्लेषण बरोबर आहे का हो?
वृश्चिकेतील, शुक्र-नेप्च्यून युती वाले कवितेत "इन्टेन्स रस" घेतात. वृश्चिकेचे सर्वच इन्टेन्स किंवा फोकस्ड असते. नो मिडल ग्राऊंड.
---------------
वॉरन बफे व बिल गेटस दोघांना विचारलेले की यशाचे रहस्य काय? गंमत म्हणजे, दोघांनी एकच उत्तर दिले, 'फोकस' दोघांची चंद्र रास वृश्चिक.
बरोबर आहे विश्लेषण सामो.
बरोबर आहे विश्लेषण सामो.
नेपच्यूनचा शोध अगदी अलिकडच्या.(युरेनस आणि प्लुटोचाही) त्यांना जुन्या नवग्रहांच्या मांडवळीत बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि नेपच्यून हा कल्पनाशक्तीचा कारक दिसत आहे.
राहूचे कारकत्व ( काम) हे त्याच्या भारतीय पौराणिक कथांमधून ठरवले आहे. ते बरोबरच आहे. राहू ग्रह कधीकधी मुसंडी मारतो आणि थोडा यशस्वीही होतो .
'वृश्चिक लग्न' नावाचे पुस्तक व.दा.भट यांनी लिहिले आहे. ( फक्त याच राशीचे का लिहिले हे त्यात सांगितले आहे). मनाचा कारक ग्रह चंद्र या ठिकाणी नवम स्थानाचा मालक. त्यामुळे यांनी ठरवले पक्के (फोकस) तर घडू शकते. मात्र ज्या व्यक्तिंवर हे फोकस करतात त्यांना थांगपत्ता लागत नाही की हे नक्की काय करणार आहेत. ( हे विंचवाच्या हल्ल्यामागचे रहस्य असेल. नांग्यांमध्ये पकडलेले सावज दुर्बल होते पण खरे शस्त्र मागून येते. शेपटीचा डंख शेवटचा असतो.)
ज्योतिष ही चांगली करमणूक आहे.
धन्यवाद
धन्यवाद
सामो खूप माहिती आहे.
सामो खूप माहिती आहे.
एव्हडे सगळे एक्स्पर्ट आहेत पण
एव्हडे सगळे एक्स्पर्ट आहेत पण माझ्या पत्रिकेबद्दल कोणी का बोलत नाही?
राभु शरदजी म्हणतात तसे गं
राभु शरदजी म्हणतात तसे गं गंमत आहे
Pages