आपल्या मनात बरेच वेळा गॅसलाईटींग करणाऱ्या लोकांची एक साचेबद्ध प्रतिमा असते. अमूक अमूक खलनायकाच्या भूमिकेत असलेली व्यक्ती गॅसलाईटींग करते अशी काही उदाहरणे देखील मनात असतात. आपणही तसे करत असू याची आपल्याला कधी कल्पना येत नाही किंबहुना आपण तसे कधी करूच शकत नाही याची खात्री पण काही लोकांना वाटू शकते.
.
गॅसलाईटींग म्हणजे थोडक्यात समोरच्या व्यक्तीला वाटलेल्या भावना नाकारणे किंवा ती व्यक्ती जे म्हणतेय ते झालेलेच नाहीये असे समजून ते ठासून मांडणे कबूल करून घेणे.
.
काही साधारण संवाद पाहुया:
.
मित्रांमधला एक संवाद:
वेळ असेल तर आणि वाचला नसेल तर आधी हा पहिला भाग वाचून आलात तर आवडेल 
मला मिळालेला पहिला नकार ! - प्रस्तावना
_____________________________________________________
-------------------------------------------------------------------------------
हो !! मला मिळालेला नकार ...
लग्नाचाच नकार !!
फार वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा वर्षभरात प्रदर्शित होणार्या सर्व हिंदी चित्रपटांपैकी केवळ एक अथवा फार फार तर दोन चित्रपट पाहणं शक्य होतं, कारण नवे चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच पाहावे लागत आणि आर्थिक दृष्ट्या ते परवडणं शक्य नव्हतं; त्या काळात वर्षभर दूरदर्शन (ज्याला काही लोक कुत्सितपणे दूर्दशा दर्शन असेही म्हणत) नामक राष्ट्रीय प्रक्षेपण वाहिनीवर आठवड्यातून एक या हिशेबाने साधारण पन्नासएक जुने हिंदी चित्रपट पाहिले जात. त्या काळी चित्रपट प्रसारित होण्यापूर्वी निवेदिका थोडक्यात तसे निवेदन करीत असे. या निवेदनात चित्रपटाचे प्रमुख कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार आदींची माहिती सांगितली जात असे.
तुझा नकार कळला,
मोठ्ठाल्या डोळ्यांमधला,
नाकारलेस सहजच,
अनोळखी भाव दाखवून...
हे अपेक्षीत होतंच,
अनपेक्षीत काहीच नाही,
चालायचंच!
पण एकच वाईट वाटतय,
पोच पावती नाही मिळाली.