आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.
अपनी गली मै कुत्ता भी शेर होता है" ही म्हण कसोटी क्रिकेटला फारच लागू पडते. पाहुण्या संघाने सिरीज हरायची आणि मग त्यांना आपल्या देशात बोलावून "घरचा आहेर" देण्याची जुनी परंपरा आहे. भारत-ऑस्ट्रलिया पहिला कसोटी सामना ह्याच परंपरेनुसार चालू झाला. ३६ धावांत सर्वबाद होण्याची नामुष्की ओढवली. कोहली बाळंतपणाच्या रजेवर आणि इतर प्रमुख खेळाडू दुखापतीने उपलब्ध नाहीत; असा "दुष्काळात तेरावा महिना" रहाणे पुढे ओढवला. पाहुण्यांना सराव म्हणून राखीव संघ खेळवतात तसला संघ उरला. केवळ पाऊस आला तरच एखादा सामना ड्रॉ होईल अशी शक्यता निर्माण झाली.
'अरे ओ सांभा, यह रामगढ वाले, अपने बच्चोंको कौनसी चक्की का पीसा आटा खिलाते हैं रे?' - शोले मधे गब्बर सांभा ला विचारतो. ऑस्ट्रेलियन थिंक टँकने शोले बघितला नसेल, पण भारतीय संघाविषयी त्यांना हाच प्रश्न पडला असावा. लहानपणी ती एक जड बुडाची बाहुली पाहिली होती. तिला कितीही खाली पाडा, ती परत वर यायची. जितक्या वेगानं खाली पाडाल तितक्याच वेगानं उसळी मारून वर यायची. ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय संघ त्या उसळून वर येणार्या बाहुलीसारखा वाटला असावा. किंबहूना जितक्या वेळा ऑस्ट्रेलियाने 'बळेचि केला खाली जरि पोत' तितक्या वेळा ही भारतीय संघाच्या अस्मितेची ज्वाळा उफाळून वर आली.
यावर्षीच्या गणेशोत्सवात खेळलेल्या "ओळखा पाहू .... एक गंमतखेळ" या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
त्या प्रतिसादावरुन प्रोत्साहित होवून हा खेळ आपण असाच पुढे चालू ठेवावा अशी एक कल्पना सहज मनात आली.
यातली रंगत कायम ठेवण्यासाठी दर एखाद महिन्याने आपण सर्वानुमते पुढच्या महिन्यासाठीचा विषय ठरवू शकतो.
अर्थात या खेळातली गंमत पूर्णतः आपल्या सगळ्यांच्या सहभागावर अवलंबून आहे.... गणेशोत्सवात दिलेल्या प्रतिसादाइतकाच भरभरुन प्रतिसाद मिळेल ही रास्त अपेक्षा!
जे लोक हा खेळ आधी खेळले नाहीयेत त्यांच्यासाठी थोडक्यात कल्पना देतो
तिसऱ्यांदा नापास! आता मात्र क्लेयरला काय करावे सुचेना. पण त्याच क्षणी तिने केवळ क्रिकेटच्या प्रेमापोटी पुन्हा परीक्षा द्यायचे ठरवलं.
गोलबॉर्न हे आजही वीस-बावीस हजार लोकसंख्येचे ऑस्ट्रेलियन गाव. गोरी, गोबरी, सोनेरी केसांची क्लेयर पॉलसॅक गोलबोर्नमधली एक साधारण हायस्कूलर. अशा लहानशा गावात संधीही काहीश्या मोजक्याच उपलब्ध. क्लेयरला क्रिकेट मनापासून आवडायचे. पण लहान गावात मुलींची टीम नव्हती. मुलांबरोबर खेळण्यात क्लेयर आणि तिच्या दोन-चार क्रिकेटप्रेमी मैत्रिणींना अज्जिबात रस नव्हता. टीव्हीवर मॅच बघणे, कधी क्रिकेटवरची मासिके-पुस्तके वाचणे ह्यावर ती आपली हौस भागवून घेत होती.
ते दिवस अनेकांना आठवत असतील. भारताच्या संघाचा बकरा करण्याच्या ठराविक पद्धती होत्या - परदेशातील विकेट्स, स्पीड, स्विंग, बाउन्स, स्लेजिंग, माइंड गेम्स. विशेषतः परदेशातील दौर्यांमध्ये, पण कधीकधी भारतातही. कधी नुसत्या वेगावर, कधी बाउन्सर्सनी जखमी करून, तर अनेकदा पत्रकार, जुने खेळाडू यांच्यापासून ते संघाचे मॅनेजर, कोच यांच्यापर्यंत अनेकांनी संघाला कमी लेखणारी विधाने करून खेळलेल्या माइंड गेम्स.
आमची क्रिकेट पाहायला सुरुवात 1993 मधली... याच वर्षी भारताने वेस्ट इंडिजला हीरो कप च्या अंतिम सामन्यात हरवलं होतं. त्यानंतर थेट 1996 च्या विश्वचषकात क्रिकेटची आणि आमची गाठ पडली. हा विश्वचषक आहे तसा आठवणीतलाच. श्रीलंकेचा क्रिकेटमधली एक नवी शक्ती म्हणून याच वर्षी उगम झाला. शिवाय केनियाची एन्ट्री ह्याच विश्वचषकातली. उपांत्य सामन्यामध्ये श्रीलंकेकडून झालेली आपली हार कायम लक्षात राहील अशीच होती. भारतीय क्रिकेट विश्वामध्ये सचिन तेंडुलकर नावाचं वादळ घोंगवायला सुरुवात झालेली होती आणि या विश्वचषकाच्या पराभवानंतर खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेट संघ बांधायला सुरुवात झाली.
.... अखेर विराट कोहलीच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवून टेस्ट सिरीज जिंकली.
या सिरीजपूर्वी १९४७ - ४८ सालच्या पहिल्या ऑस्ट्रेलियन टूरपासून तब्बल ११ वेळा भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात टेस्ट सिरीज खेळली. यापैकी १९८० - ८१, १९८५ - ८६ आणि २००३ - ०४ या तीन सिरीज ड्रॉ झाल्या तर ८ वेळा भारताच्या नशिबी पराभव आला. या वेळेस मात्र अखेर आपण ऑस्ट्रेलियाला नमवले.