..

Submitted by रानभुली on 27 August, 2025 - 04:49

..

Group content visibility: 
Use group defaults

खोडद आणि सामाजिक कार्य करणारा माबोकर म्हणलं की मला अवधूत आठवतोय. त्याचा आयडी आता अजिबात आठवत नाही.
हा आणि तो एकच का ते नाही माहीत.
मी भेटलोय तेव्हा वयाच्या 30 च्या आत होतो.
तेव्हाही त्याची एकूणच समज, लोकांच्या अडचणी, नेमके त्याचे सोल्युशन, आणि ते कसे प्राप्त करायचे लोकशाही मार्गाने , आजूबाजूला सुरू असलेले राजकारण, आमदारकी , खासदारकी, रस्त्याचे कंत्राट कोणाकडे, त्यात होत असलेले निकृष्ट काम, नोंद करून त्याची तक्रार करणे, पाठपुरावा करणे वै वै ह्याची जाण अतिशय भारी होती / आहे.
त्याच्या घरचेही सगळे असेच. त्याने गावातीलच असे मित्र गोळा केलेले आणि त्याचे नोकरी सोबत हे काम सुरूच होते.
भेटलो, त्याच्या घरी गेलो होतो, त्याच्या आईबाबांना भेटलो होतो, नंतर त्याने खोदडची दुर्बिण नेवून दाखवली, मग आम्ही एक छोटा नारायणगड ट्रेक केला, आणि तिथून जुन्नरला गेलो होतो त्याच्या सासुरवाडीला, त्याची पत्नी आणि जवळपास 2 महिने वै वय असलेले बाळ ह्यांना भेटायला.
लेख वाचून तो आठवला मला.
त्यांच्या ग्रुपसोबत एक पुरंदर ट्रेक केलेला असेही आठवतंय.
त्याचा लहान भाउ माझ्याच कॉलेजमध्ये शिकलेला ज्युनियर पण वेगळी ब्रांच चा , हा तेव्हा त्याच्या हॉस्टेलला राहून कोल्हापूर फिरून आलेला.
ते ही एक कनेक्शन आमचे जुळले होते.
नंतर नंतर त्याचा माबो वावर कमी झाला.
Mobile माझ्याकडेही नसल्याने आमचा तो संपर्कदेखील नाही राहिला.
भेटायला बोलायला आवडेल.
आम्ही जुन्नर आदिवासी भागात काही काम करतो ह्याविषयी सांगायला आवडेल त्याला.

ओह झकासराव. त्यांना मायबोलीवर सक्रीय व्हायला सांगा प्लीज.
आम्ही पुन्हा जुन्नर ला जाऊ माझी तब्येत थोडी सुधारल्यावर. तेव्हां घरी असतील तर भेट घेऊ.

अरे वाह! अवधूतदादावर धागा
ग्रेट!

धाग्याबद्दल धन्यवाद रानभुली.
तसेच अवधूत खरमाळे (Avadhut kharmale) हे पूर्ण नाव लेखात घ्यावे अशी विनंती.

मलाही ऑर्कुट काळापासून फार आदर आहे त्यांच्याबद्दल. त्यांची प्रामाणिक कळकळ जाणतो.

ऑर्कुट मित्रांच्या व्हॉट्सॲप ग्रूपवर सक्रिय असतात. क्रिकेट ग्रूपवर सुद्धा चर्चा होते. पण तिथे कधी क्रिकेटव्यतिरिक्त लिहीत नाहीत. आपल्या कामाचा मोठेपणा मिरवत प्रचार नाही हे तुम्ही बरोबर लिहिले त्यांच्याबद्दल.

आणि हो, ते आता मायबोलीवर सक्रिय नसले तरी मूकवाचक आहेत. कितपत ते त्यांनाच विचारावे लागेल. पण त्यांच्या बोलण्यात उल्लेख येतो आणि इथल्या एका चांगल्या लेखाची लिंक देखील त्यांनी मागे मला शेअर केलेली.

>>>
जर हा धागा त्यांना दिसला तर त्यांनी साद द्यावी
>>>>
धागा दाखवला. त्यांनी पाहिला.
पण सध्या ते मायबोलीवर सक्रिय नसल्याने आता अचानक रोमातून येऊन इथे प्रतिसाद द्यावे न द्यावे हे मात्र आता त्यांच्यावर सोडूया Happy

ओह ! म्हणजे सगळे ओळखतात तर.

धागा दाखवला याबद्दल आभार. बरोबर आहे अचानक प्रकट होणं अवघडच आहे.
त्यांच्या सवडीने आणि आवडीने होऊ दे.
जे ओळखतात त्यांनी जास्तीची माहिती दिली तर छानच. Happy

रानभुली.
अवधुतचा नंबर माझ्याकडे नाही त्यामुळे हल्ली संपर्क नाही आमचा.
Runmesh कडून घेईन नंबर
( त्याने दिला तर अर्थात )

नमस्कार रानभुली आणि झकासराव!

कौतुक झालं कि दडपण येतं! पण अत्यंत प्रमाणिकपणे सांगतो कि असं एवढं काही करत नाही मी! नोकरी आणि संसार चालू आहे. त्यातुन होईल तसा वेळ इतर काही उपक्रमांसाठी माझ्या आनंदासाठी देत असतो.

गावी काही उपक्रमांमध्ये सहभागी असतो. 'खोडद ग्रामीण विज्ञान केंद्र' नावाचे एक केंद्र गावच्या मुलांना शालेय शिक्षणाला पूरक ठरेल असे उभारले आहे, ग्रामीण विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून ते गेली 10 वर्ष नियमित चालू आहे. वर उल्लेख झालेली शाळेची इमारत मुंबई स्थित एम्पथी फाऊंडेशनने उभारून दिली आहे. त्यासाठी गावाकडून काही ठराविक टक्के निधी अपेक्षित होता. ग्रामस्थ थोडेसे उदासीन होते पण मग आम्ही काही तरुणांनी पुढाकार घेऊन हा तब्बल 20 लाखाचा निधी जमवला होता. बाकीचा निधी एम्पथीने घालून अत्यंत देखणी शाळेची इमारत गावी उभी राहिली. भारतात ग्रामीण व गरिबातील गरीब विद्यार्थ्याला सुद्धा शिक्षणाच्या शहरी दर्जाच्या सुविधा मिळायला हव्यात. इतर सगळ्याच ठिकाणी आपण ठिगळे नाही लावू शकत पण आपापल्या गावापुरता निश्चित थोडाफार बदल करू शकतो.

गावात दोन एक वर्षांपूर्वी विधवा प्रथा निर्मूलनासाठी पुढाकार घेऊन ते काम केले. ग्रामीण भागात अद्यापही अशी दबलेली दुःखे आहेत. आपणच पुरेसे संवेदनशील नाही आहोत असे कधी कधी वाटते. हि प्रथा एका तशा पुढारलेल्या गावात बंद होण्यासाठी 2022 साल उजाडले यातच यातच सर्व काही आले.

वर उल्लेख केलेला अनाथाश्रम मालनताई खडकीला चालवायच्या. त्यावेळी एका ऑर्कुट कम्युनिटीवरून उभारलेली रक्कम लाखात निश्चित नव्हती. (वरच्या रानभुली यांच्या पोस्टमध्ये तपशिलात थोडी चूक झाली असावी). मात्र ऑर्कुटवर असताना त्या कम्युनिटीवर भयंकर जातीय वणवा पेटलेला असायचा. त्यामधून तेथील लोकांना बाहेर काढून अशा कामांसाठी उद्युक्त करण्याचा तो एक यशस्वी प्रयत्न होता. नंतरच्या काळात अशोक देशमानेच्या स्नेहवनच्या कामाशी काही कालावधीसाठी जोडलो गेलो होतो. हा लग्नही न झालेला तरुण मुलगा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी अनाथाश्रम काढण्याचे सांगत गावोगावी फिरत असताना त्याच्यासोबत उभे राहणे गरजेचे वाटले. अशोकने खूपच मोठे काम पुढे आळंदीजवळ उभे केले आहे. नंतरच्या काळात ऑर्कुटवरचाच समविचारी मित्राने यदु पाटीलने पुढाकार घेत काही मित्र जमवून बदलापूर येथे उत्कर्षलाय सुरु केलेय. तिथे जोडलेलो आहे. एकल पालक व पालक नसलेली अनाथ 18 मुले सध्या तिथे राहून शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे तुमच्या आमच्यासारखे नोकऱ्या व संसार करणारेच काही जण मिळून हे उत्कर्षलाय गेली 4-5 वर्ष चालवत आहेत.

या पोस्टमधूनही काही संस्थांची इथे ओळख व्हावी हा उद्देश आहे. मी पुन्हा एकदा प्रामाणिकपणे सांगतो माझ्याकडे काहीही मोठेपण नाहीये. रानभुली यांची माझा संपर्क व्हावा हि तळमळ प्रामाणिक आहे असे वाटले त्या अनुषंगाने वरील माझ्याबद्दल लिखाण झाले.

रानभुली, झकासराव; गेली वर्षभरापेक्षा जास्त कंपनीच्या कामानिमित्ताने लंडन येथे कुटुंबासह आहे त्यामुळे दुर्दैवाने लगेच भेटता येणार नाही. रानभुली तुम्ही खोडदला गेला होतात तर घरी जाऊन यायला हवे होते. मी नाही पण आई वडिलांची भेट झाली असती. गावी घरी जाण्यासाठी अद्यापही 'ओळख आहे' एवढं पुरेसे असते.

'ऋन्मेष' याने हा धागा माझ्या लक्षात आणून दिला त्यासाठी त्याचे आभार! ऑर्कुटवर मी त्या ऍडमिन असलेल्या कम्युनिटीवर याने विलक्षण वात आणला होता. आम्ही काही ऑर्कुटचे चिरकूट अद्याप एका whatsapp ग्रुपवर एकत्र आहोत.

छान पोस्ट अवधूतदादा
तुमच्या या कामाची डिटेल माहिती मलाही नव्हती.

<<<< गावात दोन एक वर्षांपूर्वी विधवा प्रथा निर्मूलनासाठी पुढाकार घेऊन ते काम केले.>>> हे अजून करावे लागते याचे आश्चर्य आणि वाईट वाटले. गावाखेड्यापासून तिथल्या परिस्थितीपासून मी दूरच आहे म्हणजे..

अवधूत दादा , खूप छान लिहीलेत.
पोस्ट केल्यावर मला अन्यत्र माहिती अचूक आहे का असा एक पश्न आला होता. त्यामुळं दडपण येऊन लेख मागे घ्यावा लागला याबद्दल क्षमस्व.
तुमच्याकडून ऑथेंटिक माहिती मिळाली याबद्दल आभारी आहे.

जुन्नर मधेच उशीर झाला होता त्यामुळं येता आलं नाही. पुढच्या वेळी लक्षात ठेवीन. Happy