अनुभव

अगदी आजचा अनुभव . ....

Submitted by मी मी on 14 March, 2013 - 14:23

आईचा निरोप घेऊन निघाले तेव्हा अंधारलेच होते जरा. कालंच पाउस पडून गेलाय वातावरण पण गार झालय छान. मी माझ्याच तंद्रीत वातावरणाची मजा घेत पुढे चाललेले, थोडी भाजी फळे घेऊन डिक्कीत टाकले आणि गाडी वळवली... संध्याकाळची वेळ आणि धंतोली एरिया ....पुढे बघते तर सिग्नलवर लांबच लांब गाड्या उभ्या मग तशीच वळवलेली गाडी सिग्नल च्या आधीच्या गलीतून टाकली.

विषय: 
शब्दखुणा: 

जो पर्यंत संवेदना थकत नाही

Submitted by समीर चव्हाण on 9 March, 2013 - 12:33

मला माहीत नाही मी काय शोधतोय दिवस-रात्र
सगळ्या तृष्णा चाळवणारं नक्की ते आहे तरी काय?
दिवसाच्या प्रकाशात दिसलं नाही की रात्रीच्या अंधारात चकाकलं नाही
माझ्या कवितांच्या सगळ्या वह्या धुंडाळल्या
माझ्या कल्पना-विश्वातल्या सगळ्या स्त्रियांच्या योनी तपासल्या
कुठेच कसे नाही?

मला आठवतं लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत
आईला न जुमानता पळून यायचो घरातून भर उन्हात
कित्येकदा कुणीच नसायचं सोबतीला
पण तरीही उनाडत राह्यचो गल्लीबोळांत तासोन्तास काहीतरी शोधत

वय बदलतं तश्या इच्छाही, शोधही, आणि स्थळंही
पण शोधण्याची खुमखुमी तशीच आणि तेव्हढीच
तेही कशासाठी ते माहीत नसताना
गंमतच आहे

विषय: 
शब्दखुणा: 

लेडीsज (अँड जंटलमन) ऑफ द ज्युरी..

Submitted by लोला on 10 February, 2013 - 19:50

"मला तर इथं क्लॉस्ट्रोफोबिक वाटतंय... "

हाताची घडी घालत, आजूबाजूला उभ्या असलेल्या इतरांकडे आणि मग छताकडे बघत आजीबाई म्हणाल्या.

एक भयाण अनुभव .....(गूढ कथा)

Submitted by मी मी on 1 February, 2013 - 07:11

परवा आलेला एक भयाण असामान्य अनुभव .....
कुठल्याश्या अनोळखी, अजिबात आवाज नसणाऱ्या...बिन छपराच्या, आकर्षक यानात बसून
असंख्य माणूस सदृश मेटालिक कपड्यातली लोक भराभर बाहेर पडलीत ......
आकाशातून उतरणाऱ्या छोट्या गोलाकार वस्तूतून खाली आलेल्या सलाखीने...
उत्खनन सुरु केले.....वाऱ्या पेक्षाही प्रचंड वेगाने जागा खणली जात होती.....
आणि टना पेक्षाही प्रचंड वजनाची माती दूर सारली जात होती.....
मी अजूनही हे सर्व बघते आहे...मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना.....
कुठून आलेत हे सर्व?....कोण आहेत?...आपण पूर्वी यांना कधीच कुठे कसे पहिले नाही ?

शब्दखुणा: 

चमक

Submitted by समीर चव्हाण on 28 January, 2013 - 06:10

फारा दिवसांनी घरी परतल्यानंतर
पाहिलीय मी त्याच्या डोळ्यातली चमक
फार काही उजळणारी

आयुष्यात डोकावलं तर दु:ख, विषाद, खंत भरून असेलही,
पण आनंदही कुठे कमी आहे
माणूस भ्रमाच्या बुडबुड्याप्रमाणे तरंगतोही आणि विरतोही

अस्तित्व नावाची चीज विलक्षण आहे
जो तो तिला गाठीला बांधल्याप्रमाणे वावरतो खरे,
पण मानगुटावर बसल्यावर झटकतोही
ती एक अवदसा की तिचा संगही प्रतारतो आणि असंगही

अस्तित्वाचा सदरा मळकट
काढशील तर होइल फसगत

अप्राप्याचे भूत उरावर बसल्याप्रमाणे माणूस नाचत राहतो
अलिखित जमाखर्चाच्या रेघोट्या ओढीत
हेवेदाव्यांच्या तापलेल्या कढईत मन सोडून द्यायला

विषय: 
शब्दखुणा: 

गाडा

Submitted by समीर चव्हाण on 5 January, 2013 - 00:58

तिला नव्हता वेळ पोरांकडे लक्ष द्यायला
चपात्यांच्या थप्प्याखाली गाडली गेली तिची वर्षे
आहे ते बरे आणि दिवस चालले खरे
सणासुदीला कपडे-लत्ते नाही ना हौस-मौज
उसनवारी पाचवीला पुजलेली
महिनाखेरीची चणचण जणू काही नशिबाने ठेवलेली

वीतभर पोटासाठी कोसभर जळव जीव
लांबलचक राशनच्या रांगेत रहा उभं
चार-आठाण्यासाठी दुकानदाराशी कर घिसघिस
फावल्या वेळेत लावत बस ठिगळांवर ठिगळं
अहोरात्र हात चालूच ठेव
पोरं थकून येतील त्यांना वाढ
नवरा पिऊन येईल त्याला आवर
सवड मिळाल्यास गिळून घे दोन-चार घास
आणि काढत बस सगळ्यांची उष्टी-खरकटी
त्रागा झालाच तर कर आदळ-आपट
तळतळाट झालाच तर उलथव मुडदे, हासड शिव्या

शब्दखुणा: 

सियाचीन ग्लेशीयर.....भाग २ ......आयुष्याची दोरी

Submitted by रणजित चितळे on 25 December, 2012 - 11:39

सियाचीन ग्लेशीयर ...भाग १
.ह्या आधीचे...

.......... एखाद्या खुनी माणसा प्रमाणे किंवा कोणाला मारण्याची सुपारी घेतल्या सारखे सतत तेथे असणाऱ्या जवानांच्या मागे दबा धरून राहून घात करायला तयार असतात जणुकाही. चालताना चुकलात, थोडे वजन जास्त पडले, पाय घसरला, समजले नाही, वाट चुकलात किंवा नशिबाने पाठ फिरवली तर पटकन सावज साधायला तयार...................

क्ष आणि य# इ. इ.

Submitted by आयडू on 25 September, 2012 - 13:47

***
कृपया लक्षात अस द्या -

क्ष आणि य# ! क्ष आणि य ही एक प्रवृत्ती आहे ! क्ष आणि य हे प्रातिनिधिक असून अजून वाद होऊ नयेत, कुणाही लोकांच्या भावना दुखू नयेत ह्या हेतूने शीर्षक बदललं आहे.

***

नव्या घरात शिफ्ट झालो आणि कीज हातात आल्यावर पहातो तो काय... दारात हे एवढे गुंतवळ, तेलाचे डबे बॉक्सेस, खेळणी, पेपर्स फाईल्स इ. इ. कचरा. पूर्ण दोन दिवस लागले नुसता कचरा घराबाहेर काढायला.

घर आवरून रिनोव्हेट करायला काढलं अन् एका रविवारी श्री. क्ष (जुने फ्लॅट ओनर) भर दुपारी दोन वाजता प्रगट झाले. म्हणे - "काही लेटर्स आली आहेत ती घ्यायला आलो"

शब्दखुणा: 

काही गोड तर काही कडू...

Submitted by मोहना on 10 September, 2012 - 08:07

"आय एम एक्स्ट्रिमली ऑफेंडेंड...." तलावाकाठचं घर बघायला आम्ही आत शिरलो आणि विनसीने माझा दंड पकडला. माझी मान आश्चर्याने तिच्याकडे वळली. तिचा रागाने लालेलाल झालेला चेहरा, शरीराला सुटलेली सूक्ष्म थरथर... आपला गुन्हा काय हेच मला कळेना.
"तुझा मुलगा तुमच्या भाषेत बोलतोय."
’ऑ?’ तो केव्हा मराठी बोलत होता याच विचारात गुंतले क्षणभर. एकदम कोडं सुटलं. मी घाईघाईने म्हटलं,

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - अनुभव