बरं वाटतंय का आता?
हो आहे खरी शांतता ..
पाश तुटले का सगळे?
संपल्या का अपेक्षा?
किती ते शब्द मनात जपलेले ..
किती त्या आठवणी खोलवर रुजलेल्या ..
अंकगणिताच्या हिशेबाने कमीच
पण मनात ठाण मांडून बसलेल्या ..
संपलं का मग सगळं ?
इतका सोप्पं होता का?
वेळ सगळं ठीक करते का?
हेचं औषध असतं का?
जाऊ दे झाल बरंच झालं .. त्रासातून मुक्ती . .
नकोच ती तगमग. . अंगाची लाही लाही.
हातात उरलं तर काहीच नाही . .
तसही होतच कुठे कुठल्या काळी . .
रीते हाथ रीते मन. .
स्पर्शून मात्र गेले काहीतरी विलक्षण
पाल्याचे नाव - रिदीत गोड्बोले
वय - ६ वर्षे
चित्राचा विषय - काल्पनीक प्राणी
ज्यांच्या कडे जेन अल्फा मुले आहेत त्यांना हे काय आहे ते सांगायलाच नको. इतरान्साठी - या वयोगटात सध्या इटालियन ब्रेन रॉट ची चलती आहे. एआय वापरुन तयार केलेले हे कॅरेक्टर्स मुलांना आवडतायेत.
त्यापैकी एक म्हणजे त्रालालेलो त्रालाला. हा एक तीन पायांचा शार्क आहे जो नायकी चे शुज घालतो. मला यापुढे जास्त ऐकवलं नाही .
खुप दिवसांनी हातात ब्रश घेतला...

.

नाही, म्हणजे काय लिहायचे या माणसाबद्दल!
एक पिढी की काही पिढ्या बनवल्या!
KBC बघताना दिसणारा तो बघून आपल्या पुढच्या पिढीला कदाचित खरेच वाटणार नाही.
बाकी त्याचा इतिहास करोडो लोकांना पाठ आहे. जंजीर, दीवार, शोले वगैरे!
लुडुबुडू, गुळगुळीत नायकांची सद्दी कशी संपली ते कोणीही सांगू शकतो.
कोणत्या भूमिकेचा विशेष उल्लेख करायचा हा प्रश्नही पडत नाही.
एरवी हिंदी चित्रपट गीते बघताना सहसा सुंदर सुंदर अभिनेत्री भुरळ पाडतात. हा एक मनुष्य असा, की गाणे बघतानासुद्धा त्याच्याचकडे तमाम प्रेक्षक बघायचे.
ना "त्यात" तु
ना "त्यात" मी
नात्यात "आम्ही" ते नाते
ना त्यात "तुझे"
ना त्यात "माझे"
नात्यात "आपले" ते नाते
ना त्यात "हरवणे"
ना त्यात "सापडणे"
नात्यात "सांभाळणे" ते नाते
परवा ऋतुराज यांच्या भांड्याकुंड्यांच्या धाग्यावर माझ्या नवीन मित्राचा हा फोटो टाकला होता:

तिथे हल्ली क्रोशाचा छंद जडल्याचा उल्लेख केला होता. मग वाटलं तो 'पुराव्याने शाबित' करावा.
गेल्या महिन्यात मी एक वर्कशॉप अटेंड केले. रॉक बॅलन्सिंग वर्कशॉप
रॉक बॅलन्सींग म्हणजे एकावर एक दगड रचून साधलेला बॅलन्स. आपण लहानपणी लगोरी खेळलोय ते आठवतय? एक प्रकारचे रॉक बॅलन्सिंगच ते देखील. पण तिथे एक उतरंड होती. आता जो प्रकार शिकायला गेले होते तिथे असा क्रम असायलाच हवा असे बंधन नव्हते.
एका ओळखीच्या व्यक्तीच्या वॉलवर रॉक बॅलन्सिंगचे फोटो बघून उत्सुकता चाळवली आणि हे वर्कशॉप घेणाऱ्या व्यक्तीला शोधून फेसबुक मेसेंजर वरुन सरळ मेसेजच केला आणि मग तिथून त्याच्या व्हॉट्स ॲप ब्रॉडकास्ट गृपवर दाखल झाले.