प्रणित,
सर्वप्रथम सॉरी!,
मी तुझी वही दुसर्याच दिवशी परत करणार होते पण नाही जमलं. कारण नेमके त्याच दिवशी रात्रीचे आम्ही सर्वजण मामांकडे गेलो होतो. हा कार्यक्रम अचानक ठरल्याने कोणालाही सांगण्या-बोलण्याची संधीच मला भेटली नाही. शिवाय माझ्या जवळपास कॉलेजच्या कोणीच मैत्रीणी राहत नसल्याने तुझी वही माझ्याकडेच राहून गेली.
चार-पाच वर्षांपूर्वी मी जय महाराष्ट्र चेनल वर ऐश्वर्या चा बटवा लिहियाची त्यातलं एक लिखाण :
प्रशांतीने आपलं मोजकंच सामान एकत्र केलं. मुलाचा फोटो, त्याने काढलेली एक दोन चित्र, हरीचा आणि तिचा फोटो. फार नव्हतंच. एका तासात तिला सगळं आवरायचं होतं. जेमतेम तीन महिने एकत्र काम केलेल्या सहकार्यांचा निरोप घ्यायचा की नाही हे तिला समजत नव्हतं. त्यांना ठाऊक असेल? काय म्हणतील? प्रश्न, सल्ले आणि सहानुभूती... नकोच. काय कळायचं ते इथून गेल्यावरच कळलेलं बरं. पण ती नक्की का सोडून जाते आहे ते कुणाला ठाऊक असण्याची शक्यता तिला वाटत नव्हती. काय करावं? सामान पाहिलं की सर्वांच्या नजरा वळणारच. तिला रडायला यायला लागलं. डोळ्यातले अश्रू कसेबसे आवरत ती सामान भरत राहिली.
मध्यमवर्गीय लोकांना एखादी वस्तु खरेदी करताना तिचे फायदे आणि तोटे स्वत: जाणून घेतल्या शिवाय करमत नाही. मला एखादी वस्तू घेताना चांगला सल्ला दिला तरी मी माझी पडताळणी करतो आणि वस्तु का चांगली यांची शहानिशा करतो. वस्तुचे विशेष गुण आणि मूल्य आपल्याला अंदाजपत्रकात बसतेय का ह्याची सुद्धा गुण पडताळणी करणे गरजेची असते. अश्या प्रकारे कधी-कधी २ वस्तु पैकी एक खरेदी करताना खुप सावळा गोंधळ उडतो. वस्तुचे एखादे गुण विशेष आपल्या गरजेचे आहे का ऐषाआरामा साठी आहे हे ठरवताना गोंधळ उडतो.
या कथेतून मी अंधश्रधेला बढावा देत नाही किवा कुणाच्या भावनांसोबत खेळत नाही हा एक मला आलेला अनुभव मी कथन करत आहे.
एक आणखी पुस्तकं वाचुन संपवल..नाही संपल म्हणुया..
श्री मिलिंद वाटवे यांच 'आरण्यक'..
खरतर लॅपटॉप बंद करुन ठेवलेला परत उघडला ते लिहिण्यासाठी. पुस्तक संपल्यावर ज्या काही भावना मनात उठतात त्या शिळ्या व्हायला नको म्हणुन लिहायला बसली.
खुप आवडावं, मनात रुतुन बसावं असं हे पुस्तक मला स्वतःला तरी वाटलं नाही पण एक प्रचंड ओढ मात्र जाणवली ते वाचताना..माणुस तल्लीन होऊन जातो तसं काहीसं..
मथुरा सोडून दहा मिनिटे झाली होती. नव्या प्रवाशांना अटेंडंटने नॅपकीनही देऊन झाले होते. मथुऱ्याच्या आधी ऑनबोर्ड हाऊसकिपिंगवाले गाडीची साफसफाई करून गेले होते. त्यांचा प्रमुख आमच्या कंपार्टमेंटमध्ये येऊन एकाकडून फिडबॅक फॉर्म भरून घेऊन गेला होता. त्याचवेळी तिकडे वातानुकूल रसोई यानामध्ये रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झालेली होती. मथुऱ्याच्या आधी सगळ्यांचे चहा-कॉफीच्या कीटसोबत आलेले मसाला शेंगदाणे, व्हेज सँडविच, कचोरी, मातीचूर लाडू आणि फ्रूटी असे सर्व काही खाऊन-पिऊन झालेले होते. जेवणाची वेळ होण्यासाठी अजून थोडा वेळ होता.