अनुभव

ओ कलकत्ता!

Submitted by ज्योति_कामत on 18 September, 2010 - 12:42

गेल्या वर्षी युनियनच्या कॉंफरन्सच्या निमित्ताने कलकत्त्याला गेले होते. बरोबर 2 मैत्रिणी होत्या. वास्को- हावडा एक्सप्रेसने आम्ही कलकत्त्याला पोचलो. महिला वर्गासाठी रहाण्याची उत्तम सोय गुजरात समाजाच्या लॉजमध्ये केली होती. तर कॉन्फरन्स “महाजाति सदन” मध्ये बडा बाजार रस्त्यावर होती. बाजूलाच मेट्रो स्टेशन आहे. सकाळी ते पाहिलं.

गुलमोहर: 

आज्जीच्या कविता -१

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

खूप दिवसांपासून लिहायचं होतं, माझ्या आज्जीबद्दल- बाईंबद्दल.

बाई- माझ्या वडिलांची आई. घरात सगळेच त्यांना बाई म्हणतात. त्यांच नाव तोळाबाई खंदारे. वय ८४ च्या आसपास. अशिक्षित, मराठवाड्यातल्या एका खेड्यात, मराठ्यांच्या घरात उभा जन्म गेला त्यांचा. अतिशय देवभोळ्या आणि साध्या सरळ स्वभावाच्या. खरंतर सगळ्यांना घाबरुनच रहाणार्‍या. महिन्यातले १५-२० दिवस कोणता ना कोणता उपास करत असतात, या वयातही.

प्रकार: 
शब्दखुणा: 

मणिकांचन योग आणि माझ्या कर्माचे भोग!

Submitted by abhipabhi on 19 August, 2010 - 06:51

गुरूपुष्य, अक्षय तृतीया वगैरे मुहूर्तावर सोने खरेदी करायची असते म्हणे.
- मी सर्वपित्री अमावस्येला करतो.
...
चतुर्थीच्या दिवशी गणपतीला, नवरात्रात चतुःशृंगीला जायचं असतं म्हणे.
- मी संध्याकाळी वेळ असेल तेव्हा पर्यटनासाठी म्हणून जातो.
...
संध्याकाळच्या वेळेत तेल, मीठ आणू नये, सोमवारी केस कापू नयेत, म्हणतात.
- मी हटकून त्याच दिवशीचा मुहूर्त धरतो.
...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

साद सह्याद्रीची

Submitted by मेघनाद नाटेकर on 23 May, 2010 - 08:26

ह्या कथानकावर कोण किती विश्वास ठेवेल हे मला माहीत नाही, आणि ठेवावा असा माझा आग्रहही नाही. पण जे काही घडले ते माझ्या साठी नक्कीच अद्भुत होते. निसर्ग मनकवडा असतो का? Man Desires - Universe Conspires हे जे म्हणतात ते कितपत खरे आहे? अनेक प्रश्न आणि उत्तरे मात्र शून्य. इयत्ता ७ वी पासून मी अव्याहत हिंडतो आहे. पण गेली ५ वर्षे म्हणजे सुवर्णकाळ. गड, किल्ले, डोंगर, घाट हे जीवनातले महत्त्वाचे घटक झाले. रोटी, कपडा, मकान प्रमाणेच बॅकपॅकिंग आणि ट्रेक्स ही जीवनातली मूलभूत गरज झाली. जे मित्र भेटले ते ही सर्व असेच. पायाला सतत भिंगरी लागलेली. मग त्यातूनच Private Wilderness ही संकल्पना उदयास आली.

विषय: 

मुलांसाठी खेळणी /गेम्स इत्यादी

Submitted by मेधा on 2 December, 2009 - 12:29

एच ओ आकाराच्या ट्रेन सेटबद्दल माहिती लिहा बरं कोणी तरी - कुठला घ्यावा, कुठे स्वस्त मिळतात, सुरवातीला मिनिमम काय काय भाग असावेत , त्यात हळू हळू भर घालायची असेल तर कुठले भाग घ्यावेत ?

( मॉडेल ट्रेनच्या मापांबद्दल ( गेज व स्केल) बद्दल माहिती इथे आहे
http://en.wikipedia.org/wiki/Rail_transport_modelling_scales

http://en.wikipedia.org/wiki/H0_scale )

विषय: 

थायलंड वासियांचा उद्धटपणा

Submitted by bepositive on 9 July, 2009 - 01:34

आपल्यापैकी बरेच जण थायलंड ला जाऊन आले असतील. तसा हा देश एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे. स्वछ बीचेस, वॉटर स्पोर्टस, हत्ती, आणि पट्टायातील नाईटलाईफ या गोष्टी सर्वश्रुत आहेत. इथे येणार्‍या पर्यटकांमधे भार्तीयांचा भरणा लक्श्णीय आहे. भारतीयांच्या भटकंतीवरच इथला अर्धा पर्यटन व्यवसाय अवलंबून आहे असं म्हट्लं तर वावगं ठरणार नाही.

मी नुकताच माझ्या लग्नानंतर हनीमून ला थायलंड ला गेलो होतो. ६ दिवसांची आमची ही वारी होती. तिथे तसे बरेच चांगलेवाईट अनुभव आले पण हा एक मात्र अगदी शेअर करायलाच पाहिजे असा वाट्ला.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - अनुभव