अनुभव (भयकथा)

Submitted by prasad inamke on 12 May, 2017 - 02:08

या कथेतून मी अंधश्रधेला बढावा देत नाही किवा कुणाच्या भावनांसोबत खेळत नाही हा एक मला आलेला अनुभव मी कथन करत आहे.

मी त्या वेळी अग्री डिप्लोमा साठी गिरवी येथे शिकत होतो. सकाळी 9 वाजता 10-11 किमी सायकल वरून तालुक्याच्या ठिकाणी जायचो. व तेथून बसने कॉलेज वर. 5 वाजता कॉलेज सुटल्यावर 7 वाजेपर्यंत घरी. तसा हा प्रवास रोजचाच.
कॉलेजमध्ये आमचा 7-8 जणांचा ग्रुप होता. आम्ही म्हणजे एकदम आगाऊ कारटी होतो. नेहमी पैजा लावणे व एखाद्याला सर्वांचे बिल भरायला लावणे. असे आमचे उदयोग. तिथल्या सरांना त्रास देणे वगैरे रोजचेच.
एकदा असाच मित्रांबरोबर बसलेलो असताना पैज लागली की बघू कोण आज ऊशीरा पर्यंत कोण थांबतय. सर्वजन थांबले खरे पण हळू हळू एक एक जन काढता पाय घेऊ लागला. मग शेवटी मी आणि अजून तिघे जन उरलो. मग शेवटी आम्ही पण म्हंटलं चला आता निघायला हवे 7 वाजत आले होते.पावसल्याचे दिवस होते व आभाळ ही भरून आले होते.
पूर्ण अंधार पडला होता. मग तेथून मी मित्राच्याच गाडीवर स्टँड पर्यंत आलो सायकल घेतली. व घराकडे निघालो पण पाऊस सुरू झाला होता. पण अजून थांबून जमनार नव्हते. त्यावेळी मोबाइल ही नव्हता माझ्याकडे त्यामुळे घरी सांगण्याचा प्रश्नच नव्हता. घरी येताना रस्त्यात खूप दाट झाडी होती. मी भर पाऊसात सायकल चालवत होतो. मी ज्यावेळी त्या दाट झाडीत आलो व अचानक वीज कडाडली व माझ्यासमोर तीन बायका चालत येताना दिसल्या.रंगाने खूप गोर्याच होत्या त्या एवढ्या रात्रीच्या कुठे गेल्या असतील असा विचार येऊन गेला मनात, पण जस जसे मी जवळ जाऊ लागलो तसे एका बाईने माझ्या थोबाडीत मारण्यासाठि हात उचलला पण मी तो हुकवला व पुढे जाऊन मागे बघण्यासाठी थांबलो तर मागे कुणीच नव्हते. मी खूप घाबरलो होतो. व जास्त वेळ तिथे न थांबता तडक घरी निघून आलो. घरी येईपर्यंत 8:30 वाजले घरी आल्यावर घरच्यांची खूप बोलणी बसली. म्हणून काही सांगितले ही नाही की काय घडले माझ्या सोबत, मग तसच जेवण केल व झोपलो. सकाळी जाग आली ती खूप उशिरा जरा ताप ही वाटत होता अंगात. हळू हळू ताप जास्तच वाढू लागला. मग संध्याकाळी दवाखान्यात वडलांबरोबर गेलो व गोळ्या इंजेक्शन दिले. घरी आलो पण ताप कमी झाला नाही. रात्री लघविसाठी उठलो व बाहेर आलो जरा अंगणाच्या पुढे जाऊन थांबलो तर समोरच्या रानात कोणीतरी उभे असलेले दिसले पण मनात म्हणले की पानी चालू असेल रानात व परत येऊन झोपलो. पण पावसाळ्यात कशाला पाण्याची गरज नसते हे नंतर लक्षात आले. सकाळपर्यंत ताप खूप वाढला होता. वडील तर खूप शिव्या द्यायचचे की कधीच आजारी न पडणारा पोरगा एवढा कस काय आजारी पडला. डॉक्टरांचा ही काही फरक पडत नव्हता. मग शेवटी आई च्या सांगण्यावरून वडील गावातील एका जुन्या जाणकार बाईकडे गेले. ती बाई सर्वांचे सांगायची तसे वडील तिज्याकडे गेले व सांगितले की दोन दिवस आजारी पडलाय मूलगा डॉक्टर कडे पण न्हेलता पण काही फरक पडला नाही. मग त्यांनीच पुढचे सांगितले की याला चिन्ह दिसले होते त्या ठिकाणी त्यासाठी 21 कडधान्याचा पुतळा करून वाहत्या पाण्यात सोडून द्या.
त्यानंतर वडील घरी आले व 21 कडधान्य शोधू लागले व त्याचे पिट करून पुतळा तयार केला व तो फाट्यात सोडून दिला.जसा पुतळा सोडला तस त्यांना पाण्यात एक लहान मुलगा दिसल्याचा भास झाला. व ते तिथून लगेच माघारी फिरले व घरी आले. मग माझा ताप हळू हळू कमी झाला. व मी त्यानंतर बरा झालो. मग त्यानंतर मी कधी जास्त उशिर केला नाही घरी यायला.
असेच अनेक अनुभव मला आले नोकरीला लागल्यानंतरही पण ते पुन्हा कधीतरी.
..............समाप्त........

ही मी लिहलेली पहिलीच कथा किंवा अनुभव आहे. काही चूक झाल्यास माफी असावी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुभव पटला...!!! पण त्यातुन आलेल्या तापावर केलेले उपचार पटले नाही....!!! तुम्ही केलेल्या उपचाराच्या पद्धती मुळे आंध्रश्रध्देला पाठबळ मिळु शकते...!!!

व 21 कडधान्य शोधू लागले व त्याचे पिट करून पुतळा तयार केला व तो फाट्यात सोडून दिला.ज>>> हे काही कळले नाही.

व 21 कडधान्य शोधू लागले व त्याचे पिट करून पुतळा तयार केला व तो फाट्यात सोडून दिला.ज>>> हे काही कळले नाही.
>>
२१ कडधान्याचं पिठ करून त्याचा पुतळा बनवला गं

पहिल वाक्य न लिहीता हा (आणि ह्या सारखे अजुन) अनुभव तुम्हाला "अमानवीय" ह्या धाग्यावर शेअर करता येइल

ही २१ कडधान्य कुठली असेल हा प्रश्न आनी मग फाट्यावर सोडुन दिला ??? फाटा म्हणजे काय ?? ओढा , नदी, विहीर की अजुन काही ????

फाटा म्हणजे एका रस्त्यातून निघणारा दुसरा रस्ता..
उदाहरणार्थ - नाशिक फाटा

आपण नाही का म्हणत विषयाला फाटा फोडू नकोस... म्हण्जे मुद्द भरकटवू नकोस.

आता हे रस्त्याशी रिलेट कर

फाटा म्हणजे काय ?>>> फाटा म्हणजे क्रूत्रीम पद्धतीने पानी शेताला पोहचविण्याचा खूप मोठा पाट

अनुभव पटला...!!! पण त्यातुन आलेल्या तापावर केलेले उपचार पटले नाही....!!! तुम्ही केलेल्या उपचाराच्या पद्धती मुळे आंध्रश्रध्देला पाठबळ मिळु शकते...!!!>>> खर तर मला अजिबात माहित नाहि की मी कशामुळे नक्की बरा झालो पण कदाचित दोन्ही शक्यता तपासून पाहिल्यातर मला वैयक्तीक तरी नंतरचाच उपाय कामी आला असे वाटते. आणि शेवटी 'अदन्यानात सुख' हेच खरे त्यामुळे मी ही कधी याचा खोलात विचार केला नाही.

ओह्ह्ह्ह्ह्ह्ह! पण मग आळेफाटा, नाशिक फाटा असं का म्हणतात त्या त्या जागांना>>>>>
आमच्या येथे तरी आम्ही फाटा हा शब्द यालाच वापरतो व तुम्ही ज्याला फाटा म्हणता त्याला इथे नाका असे संबोधतात.

पहिल वाक्य न लिहीता हा (आणि ह्या सारखे अजुन) अनुभव तुम्हाला "अमानवीय" ह्या धाग्यावर शेअर करता येइल>>>>
शीर्षकात अमानवीय असे लिहले तर चालेल का??

वैद्यकीय विज्ञानाच्या चाकोरीत आपल्याला हे असे उपाय पटत नाही पण जेथे अतिंद्रिय संबधी काही घडते त्याचे उत्तर अश्याच विषयातील जाणकार मंडळी देऊ शकतात. अनेक वेळा ह्यात भोंदुगिरी असते आणि अश्या उपचारांनी आजार बळावून मृत्यू सुद्धा येत असतो. तेव्हा श्वाश्वत सोपा उपाय म्हणजे योग्य तपासणी करून डॉक्टर कडून ओषधे चालूच ठेवणे आणि श्री हनुमंत आणि श्री राम ह्यांची श्रद्धेने उपासना केल्यास नकीच अश्या बाधा दूर होतात. कारण मेडिकल ट्रीटमेंट शरीरावर परिणाम दाखवते पण आपल्या ऑरा आणि मानसिक पटलावर झालेले अश्या अमानवीय शक्तीच्या सान्निध्यात आल्याने झालेले बदल दुरुस्त करण्याचे काम भक्तीने परिपूर्ण होते. श्री प्रसाद ह्यांचे सारखा अनुभव मीसुद्धा ( अनभिज्ञपणातून चुकीची स्पंदने असलेल्या जागेतील वस्तू घरी आणून ) एकदा कोकणात घेतलेला आहे (१०४ च्या पुढे ताप) आणि वर उल्लेखलेल्या आचरणातून पूर्ण बरा झालोय.

पहिल वाक्य न लिहीता हा (आणि ह्या सारखे अजुन) अनुभव तुम्हाला "अमानवीय" ह्या धाग्यावर शेअर करता येइल>>>>

शीर्षकात अमानवीय असे लिहले तर चालेल का??

मला जर अस कोणी रस्त्यात दिसलं असतं आणि परत गायब झाल असतं तर मी तिथेच बेशुध्द वगेरे पडलो असतो. जरी घरी आलो असतो जेवण गेलंच नसतं आणि झोप ही आली नसती.

मग त्यांनीच पुढचे सांगितले की याला चिन्ह दिसले होते त्या ठिकाणी>>>> हे नाही कळले. कसले चिन्ह?
तसेच जाणकार बाईंना चिन्हाबद्दल आपोआपच कळाले कि तुमच्या वडिलांनी सांगितले?

मग त्यांनीच पुढचे सांगितले की याला चिन्ह दिसले होते त्या ठिकाणी>>>> हे नाही कळले. कसले चिन्ह?
तसेच जाणकार बाईंना चिन्हाबद्दल आपोआपच कळाले कि तुमच्या वडिलांनी सांगितले? >>>> मलाही हा प्रश्न पडलाय