पाककला

मायबोलीच्या पाककृती ग्रूपचे अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाले

Submitted by Admin-team on 3 December, 2020 - 23:13

मायबोलीच्या पाककृती ग्रूपचे अँड्रॉईड अ‍ॅप आजच प्रकाशीत झाले.

हे अ‍ॅप फक्त पाककृती विभागापुरते मर्यादित आहे. पण त्याचे फायदे
१. पाककृती बघण्यासाठी लॉगीन करण्याची गरज नाही.
२. पाककृतींशी संबंधित लिंक टिचकेसरशी एकत्र आहेत.
३. जेवायला रोज काय करायचे हे सुचवण्यासाठी सोपी सुविधा आहे. सध्या तिथे, याच ग्रूपमधलेच एक पान आहे. पण ही सुविधा अजून उपयोगी करण्याचे काम सुरु आहे.

विषय: 

मायबोलीकर युट्युबर्सः पारंपारिक कृती विडिओ

Submitted by देवीका on 7 January, 2021 - 21:59

मायबोलीवर बर्‍याच दिवसाने आज आले आणि पाहिले की, मायबोलीवर आपले युट्युबचे काम प्रमोट करु शकतो( हा माझा अजूनही अंदाजच आहे पण दोन लेख पाहिले आणि वाटले की, अश्या प्रमोशनला बंदी नसावी.) जर असलीच तर मी हा लेख काढून टाकेन, अ‍ॅडमिन कृपया मला तसे कळवा.

विषय: 

सिमला मिरची वापरून केलेल्या पाककृती

Submitted by Admin-team on 30 December, 2020 - 17:18
सिमला मिरची वापरून या पाककृती करता येतील.
  1. भरली सिमला मिरची : सिमला मिरची, उकडलेला बटाटा ( नॉनव्हेज चालणार्‍यांनी या ऐवजी जवळा/ कोळंबी/ खिमा वापरला तर बहार येते ), आलं-लसूण्-मिरच्या वाटून, मीठ, दाण्याचे कूट ( नॉनव्हेज मध्ये नको), साखर ( नॉ. न. )
अजून काहीतरी वेगळं करायचा मूड आहे?
विषय: 

बिर्याणी हेट क्लब

Submitted by VB on 25 December, 2020 - 18:54

पार्टी चा भात म्हणजे बिर्याणी असे कितीतरी जणांचे मत असल्याचे लक्षात आले. माझ्या ओळखीच्या दहा पैकी आठ लोकांना बिर्याणी आवडते. अन म्हणून मला बिर्याणी आवडत नाही म्हणून ते नाकही मुरडतात.
पण खरेच माझ्यासारखे कित्येक जण असतील ज्यांना बिर्याणी आवडत नाही. पूर्वी मी कधीतरी खायची बिर्याणी, पण आता बघवतही नाही. तसेही हल्ली चांगली बिर्याणी मिळत सुद्धा नाही आवडायला. बरेचदा तर बिर्याणी च्या नावाखाली भाज्या/चिकन/मटण/कोलंबी नावापुरता घातलेला अन मसाल्याने थबथबलेला भात देतात. तो प्रकार तर अजून भयानक असतो. कदाचित ह्या सगळ्या मुळे असेल पण मला बिर्याणी आता बिलकुल आवडत नाही.

शब्दखुणा: 

टोमॅटो वापरून केलेल्या पाककृती

Submitted by Admin-team on 23 December, 2020 - 20:17
या पहा मायबोलीवरच्या टोमेटो वापरून केलेल्या पाककृती

टोमॅटोची चटणी किंवा भाजी

मराठमोळा 5
विषय: 

भेंडी वापरून केलेल्या पाककृती

Submitted by Admin-team on 23 December, 2020 - 20:07
या पहा मायबोलीवरच्या भेंडी वापरून केलेल्या पाककृती

भेंडी आणि पालकाची भाजी

चिन्नु 13
विषय: 

शेपू वापरून केलेल्या पाककृती

Submitted by Admin-team on 20 December, 2020 - 17:15
या पहा मायबोलीवरच्या शेपू वापरून केलेल्या पाककृती

शेपु चिकन अर्थातच डिल चिकन

अल्पना 7
विषय: 

वांगी वापरून केलेल्या पाककृती

Submitted by Admin-team on 11 December, 2020 - 16:44
वांगी वापरून या पाककृती करता येतील
  1. हिरवी मिरची, वांग, बटाटा, हिंग, जीर मोहरी
  2. मालवणी गरम मसाला, वांग, बटाटा, हिंग, जीर, मोहरी (ह्यात सुकी ओली कोलंबी पण घालतात)
  3. भरलेल वांग - उभा चिरुन बटाटा, चीर पाडलेली वांगी, चीर पाडलेले छोटे कांदे, खोबर - कांदा वाटप, दाण्याच कुट, चिंचेचा कोळ, मालवणी गरम मसाला
  4. भरीत - वांगी भजुन, कच्चा कांदा, खोबर, कोथंबीर, मिरची वरुन लसणाची झणझणीत फोडणी, हव तर दही पण घालता येत
अजून काहीतरी वेगळं करायचा मूड आहे?
विषय: 

गवार वापरून केलेल्या पाककृती

Submitted by Admin-team on 11 December, 2020 - 16:34
गवार वापरून या पाककृती करता येतील
  1. गवारीची गुजराथी पद्धतीची भाजी : गवार, तेल, ओवा, हिंग, हलद, तिखट, मीठ, गूळ, ओलं खोबरं, कोथिंबीर.
  2. गवार-कांदा : गवार, कांदा, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, लसूण-आलं बारी चिरून, कोथिंबीर.
मूळ संकलन : मायबोलीकर अवल.
विषय: 
Subscribe to RSS - पाककला