मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
विचार
पार्टनर
विचारांची 'सायकल'
अवेळी आलेल्या पावसानं चांगलाच जोर धरला होता. बऱ्याच वेळ वाट बघून मी घरापर्यंत भिजत जायची मानसिक तयारी केली. खाली जाऊन सायकलवर टांग टाकली आणि निघालो.
ऑफिसपासून घरापर्यंतचा सायकलचा निवांत प्रवास म्हणजे मनात खूप वेळ वाट बघत बसलेल्या विशिष्ट विचारांना एक हाक असते. दिवसभर ह्या विचारांना पुरेसा वेळ किंवा 'फुरसत' मिळत नाही.
निवांत आणि एकांत क्षणाची वाट बघत बसलेले हे विचार संधी मिळताच डोक्यात तरळू लागतात. त्यातून हेडफोनवर 'ट्रांस' सुरू असेल तर मग ह्या विचारांना अजूनच पोषक वातावरण. हा ट्रान्स 'आतलं' आणि 'बाहेरचं' जग यांच्यातील एक भिंत बनून जातो.
सवय
बहुकोणी व्यक्तिमत्व
मला बरेच दिवस ह्या विषयावर लिहू असं वाटत होत . “ व्यक्तित्व “ ह्या वर आपले काही “ माईंड सेट “ असतात, उदाहरण स्वरूप जर एखादी व्यक्ती धार्मिक प्रवचन करत असेल तर ताबडतोप डोळ्या समोर एक संत येतो, राजकारणी व्यक्ती म्हटलं तर खादी वस्त्रधारी, व्यापारी/ उंच पदावर असेल तर सूट घातलेला. तसच एखादी महिला जर जीन्स- शोर्ट इत्यादी वस्त्रधारी असेल तर “ मॉड “ असं समजलं जातं. तसच एखादी बाई–मनुष्य केसात तेल लाऊन वेणी घातलेतली असेल तर “ मागसलेली’ समजली जाते.
येतील का ते दिवस...?
माझ्या खेड्यात अनेक जाती धर्माची माणसं आहेत. कुंभारवाडा आहे, महारवाडा आहे, मांगवाडा आहे, बागवान मुलाण्याची घरे आहेत. टेकावर न्हाव्याची वस्ती आहे. गावच्या मध्यभागी वीस खणी ब्राह्मणवाडा आहे. परिटांची अनेक घरे आहेत. बोळात लव्हाराची बैठी घरे आहेत. सोबत गुरवांची चार दोन घरेही आहेत. अशा अठरापगड जमाती आहेत. पण आपसात कधी हेवेदावे होत नसत. मारामाऱ्या झालेल्या कधी ऐकीवात न्हवत्या.
येतील का ते दिवस...?
माझ्या खेड्यात अनेक जाती धर्माची माणसं आहेत. कुंभारवाडा आहे, महारवाडा आहे, मांगवाडा आहे, बागवान मुलाण्याची घरे आहेत. टेकावर न्हाव्याची वस्ती आहे. गावच्या मध्यभागी वीस खणी ब्राह्मणवाडा आहे. परिटांची अनेक घरे आहेत. बोळात लव्हाराची बैठी घरे आहेत. सोबत गुरवांची चार दोन घरेही आहेत. अशा अठरापगड जमाती आहेत. पण आपसात कधी हेवेदावे होत नसत. मारामाऱ्या झालेल्या कधी ऐकीवात न्हवत्या.
मायबोली वर्षाविहार आणि मी
माझा मायबोलीवरचा वावर हा १० वर्षापेक्षा अधिक आहे, हळूहळू ती आयुष्याचा अविभाज्य घटक कधी बनली हे मलाही सांगता येणार नाही. इथे नेट वर लिहिताना लोक अतिशय मोकळेपणी बोलतात. पण वर्षाविहाराला येताना त्यांची रोडावलेली संख्या पाहून मला वाईट वाटते. मी ही मधले अनेक ववि मिस केलेत, पण त्यानंतर संयोजन समितीत कधी खेचले गेले कळलंच नाही. फक्त संयोजनाचे काम बदलते,कधी ववी, कधी सांस कधी टिशर्ट. पुण्यातून खंदे असे मयुरेश, योकु, मल्लि आणि मुंबईचे हमखास कलाकार म्हणजे विनय भिडे, घारू, नील, आणि मुग्धा. मुग्धा तर तशी बर्यापैकी नविन असल्यापासूनच माबोच्या वविसंयोजनात दाखल झाली.
आपण त्या दिशेने जाऊ?
मी अमेरिकेत असताना आमच्या विद्यापीठात 'स्टूडंत असोसियेशन' अतिशय सक्रिय होते. तिथल्या प्रमुख विद्यापीठातील तशी संस्कृतीच आहे. आपली 'भारतीय स्टूडंत असोसियेशन' देखील तिथल्या प्रत्येक विद्यापीठात सक्रिय भूमिका बजावत असते. अर्थात ती भूमिका गणतंत्र दिवस, स्वातंत्र्य दिन, गणपती आणि दिवाळी ह्यात अधिक गुंतलेली असते. म्हणजे गुंतू नये असे नाही, पण त्याच्या बाहेर ज्या देशात आपण आलो आहोत त्याबद्दल जाणून घेणे ही इच्छा खूप कमी लोकांच्या मनात असते. नाहीच जवळ-जवळ!
विचार माझे
कधी स्वच्छंद नदीसारखे
कधी गंभीर डोहासारखे
कधी पारदर्शी निर्झरासारखे
कधी अथांग सागरासारखे
कधी नवीन पालवीसारखे
कधी शिशिरातील वृक्षांसारखे
कधी तेजस्वी सूर्यासारखे
कधी मिट्ट काळोखासारखे
कधी वाळूच्या कणाएवढे
कधी अनंत आकाशाएवढे
कधी मायेची उब देणारे
कधी आधारस्तंभासारखे
कधी अगदी माझ्यासारखे
कधी मलाच परके करणारे
कधी मनात गर्दी करणारे
कधी मला एकटे सोडणारे
कधी शब्दांनी अलंकारिलेले
कधी निराकार जाणीवेसारखे
कधी होतील अर्पण समिधेसारखे
तादात्म्य ईश्वराशी पावणारे?
Pages
