स्पेस एक्स, टेस्ला मोटर्स आणि मस्क :
मंगळ ग्रहावर जर पहिला मानव कोणी नेईल तर असा विश्वास वाटतोय ते काम स्पेसएक्स (SpaceX) च करेल...
मी अगदी सुरवाती पासुन मस्क साहेब व ते करत असलेल्या कामचा फॅन आहे...
त्यांच्या पेपाल च्या स्थापने पासुन ते SpaceX पर्यंत चा प्रवास मला तरी थक्क करतो..
राम गडकरी यांनी शंभर वर्षापूर्वी लिहिलेला राजसन्यास नाटकातील काही मजकूर वादग्रस्त असूनही केवळ त्यांच्या इतर लिखाणामुळे त्यांची थोरवी कमी होत नाही. पुतळा पाडणे हे निषेधार्हच. धिक्कार करायचाच असेल तर केवळ त्या ठराविक लिखाणाचाच व्हायला हवा. मंजूर.
२. नोव्हे. १९८९ ते १९९३ ची सुरूवात
नोव्हेंबर १९८९ मधल्या पाक विरूद्धच्या सामन्यापासून ते १९९३ च्या इंग्लंडविरूद्धच्या भारतातील सिरीज चा हा काळ. सचिन बद्दल आधी ऐकलेले व हाईप झालेली त्याची इमेज ही प्रत्यक्षात तितकीच, किंबहुना जास्तच भारी आहे असे सर्वांच्या लक्षात आले.
सचिन तेंडुलकर च्या कारकीर्दीतील विविध फेजेस बद्दल अनेकदा सोशल नेटवर्क्स वर चर्चा होत असे, अजूनही होते. सुमारे २३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमधे त्याचा खेळ, त्याच्या भोवतालची टीम, प्रतिस्पर्धी कसे बदलत गेले, त्याचे यश-अपयश, खेळाबद्दलचा अॅप्रोच याबद्दल सलग माहिती एकत्र करावी असे अनेक दिवसांपासून वाटत होते. हाच प्रयत्न येथे करत आहे.
सध्या, सर्वदूर बातम्यांमधे, मिडियामधे मुंबईजवळ उभारल्या जाणार असलेल्या शिवस्मारकाबाबत बरेच वाचायला बघायला मिळते आहे. उद्याच त्या स्मारकाचे भूमिपूजन/पायाभरणी आहे.
न्युज मिडियामध्ये, प्रस्तावित शिवस्मारकातील छत्रपत्री शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे छोटेखानी मॉडेल (प्रतिरूप) बघण्यात आले.
या प्रतिरूपाप्रमाणे, शिवराय बसलेले दाखविलेल्या अश्वाचे पुढील दोनही पाय हवेत उचललेले (झेप टाकण्याच्या अविर्भावात) दाखविले आहेत.
देवतांच्या मूर्ति बसविण्याव्यतिरिक्त "व्यक्तिचा पुतळा /मूर्ति" करुन बसवण्याची पद्धत भारतात पूर्वी कधीच नव्हती.
बऱ्याच दिवसांनंतर पुणे-मुंबई प्रवासाचा योग आला. अर्थातच प्रवासाच्या काही दिवस आधीच ‘१२१२६ अप प्रगती एक्सप्रेस’चे आरक्षण करून ठेवले होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्या गाडीच्या वेळेच्या किमान दोन-तीन तास आधी स्टेशन गाठण्याचा इरादा याहीवेळी होता. पण पुण्यात उपनगरात राहणाऱ्या सामान्य नागरिकांना दिवसातले काही विशिष्ट तास सोडले, तर तसे करणे कठीणच. घरापासून स्टेशनपर्यंत जाण्या-येण्यासाठी बस किंवा रिक्षासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विसंबून असलेल्यांची अशी स्थिती असते. पुणे वाढले आहे आणि नुसते विस्तारतच आहे.
मी मायबोली वर मल्टीपल इंटेलिजन्स वर मागे लिहले आहे. http://www.maayboli.com/node/39215 मल्टीपल इंटेलिजन्स चा वापर आजवर फक्त लर्निंग स्टाईल च्या शोधासाठी होत होता. याच छोटस उदाहरण द्यायच झाल तर समजा आपल्या मुलाचा निसर्ग विषयक बुध्यांक जास्त आहे. अश्यावेळी तो निसर्गात जास्त रमतो असे समजले. आपल्याला त्याला गणीत शिकवायचे आहे तर ३ फुलपाखरे अधिक २ फुलपाखरे बरोबर पाच फुलपाखरे असे चित्रमय शिक्षण केले तर अश्या मुलाला शिकणे सोपे होते.
आपल्याला कोळी म्हटले की घराच्या खोलीत कोपऱ्यात केलेले त्याचे छोटे जाळे किंवा खिडकीच्या तावदानावरून उड्या मारणारा कोळी एवढेच ज्ञान असते. कधी कधी त्याचे जाळे किती मजबूत आणि उपयोगी असते यावर एखादा लेख आपण वाचलेला असतो. घरातल्या गृहीणींना तर “काय मेले कोळीष्टके करून ठेवतात, सारखी सारखी साफ करावी लागतात” असेच वाटत असते. पण स्पायडरमॅन चित्रपटामुळे कोळी आपल्याकडे मुलांमधे भलतेच "पॉप्युलर" झाले आहेत. पण नवलाची गोष्ट अशी की आपल्या भारतात हजारो जातीचे वेगवेगळे छोटे मोठे कोळी आढळतात.
सतत वाचन आणि जंगलातल्या भेटींमुळे पक्षीनिरीक्षणात थोडाफार तरबेज झालो आणि महाराष्ट्र वन खात्यासाठी भिमाशंकर येथे प्रथम वन्य गणनेसाठी त्यांना मदत केली. त्याच वर्षी ताडोबा येथेसुद्धा वाघांची गणना होणार होती त्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी आम्ही गेलो. त्या वेळी महाराष्ट्रात मेळघाट हे एकमेव व्याघ्र प्रकल्प होता आणि ताडोबाचे व्याघ्र प्रकल्प होण्यासाठी त्याचे नाव सुचवले गेले होते. यासाठी अतिशय कसून वाघांची गणना करायची होती. यावेळी आम्ही चालत चालत ताडोबाच्या जंगलात वाघांच्या ठशांचा मागोवा घेत होतो. कित्येक किलोमीटर वणवण केल्यावरसुद्धा त्याचा काही ठावठिकाणा लागत नव्हता.
डिसेंबर / जानेवारी महिना आला की आपल्याकडे थंडीचा मोसम सुरू होतो. सध्या मुंबईत जरी थोडीशी थंडी जाणवत असली तरी ती नाशिक, नागपूरच्या मानाने ती नाममात्र आहे. अर्थात उत्तर भारतातल्या थंडीशी आपण या थंडीशी तुलनाच करू शकत नाही. एक गोष्ट मात्र नक्की की जंगलात थंडीचे प्रमाण शहरातल्या थंडीपेक्षा जास्त असते. या काळात धुक्यामुळे आणि थंडीमुळे पक्षी, प्राणी अगदी कमी दिसतात. जंगलात फुलपाखरे आणि इतर किटकही अगदी कमी प्रमाणात दिसतात. यामुळे सकाळी जंगलात कुठलीच हालचाल जाणवत नाही.