मुंबईपासच्या प्रस्तावित शिवस्मारकातील पुतळ्यातील घोड्याच्या पावलांच्या ठेवणीविषयी

Submitted by limbutimbu on 24 December, 2016 - 04:45

सध्या, सर्वदूर बातम्यांमधे, मिडियामधे मुंबईजवळ उभारल्या जाणार असलेल्या शिवस्मारकाबाबत बरेच वाचायला बघायला मिळते आहे. उद्याच त्या स्मारकाचे भूमिपूजन/पायाभरणी आहे.
न्युज मिडियामध्ये, प्रस्तावित शिवस्मारकातील छत्रपत्री शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे छोटेखानी मॉडेल (प्रतिरूप) बघण्यात आले.
या प्रतिरूपाप्रमाणे, शिवराय बसलेले दाखविलेल्या अश्वाचे पुढील दोनही पाय हवेत उचललेले (झेप टाकण्याच्या अविर्भावात) दाखविले आहेत.
देवतांच्या मूर्ति बसविण्याव्यतिरिक्त "व्यक्तिचा पुतळा /मूर्ति" करुन बसवण्याची पद्धत भारतात पूर्वी कधीच नव्हती.
मात्र युरोपमध्ये पूर्वापार याबाबत प्रगती होती व पुतळा कसा असावा याचे नियमही बनविले गेले आहेत.
तेच नियम इकडेही वापरणे अनुचित ठरणार नाही.
मात्र.......
माझ्या अल्प माहितीनुसार, या (अलिखित) नियमांनुसार जो राजा, युद्धात युद्ध करताना मृत्युमुखी पडला नाहीये, व जो मृत्युसमयी सार्वभौम राजा होता, त्याचा अश्वारुढ पुतळा उभा करायचे असल्यास घोड्याचा केवळ एक पाय उचललेला दाखवणे आवश्यक मानले जाते.
याचे उलट, जो राजा, युद्धात युद्धभूमिवर मृत्युमुखी पडला असेल, केवळ अशांचे बाबतीतच घोड्याचे पुढील दोनही पाय हवेत उचललेले दाखवितात.
याव्यतिरिक्त, मृत्युसमयी, वा दरम्यानचे काळात राजा वर सत्ताहीन होण्याची पाळी आलेली असेल, तर घोडा चारही पायांवर उभा दाखविला जातो. हा नियम मात्र तपासुन घ्यायला हवा. मला खात्री नाहीये.

तर मुद्दा असा की इतका सारा खर्च करुन शिवस्मारक उभारले जाते तर त्यातिल घोड्याचे पायांची रचना जगन्मान्य मूर्तिशास्त्राप्रमाणे होणे मला तरी आवश्यक वाटते.

जाणकारांना विनंती आहे कि त्यांनी या पाश्चात्य मूर्तिशास्त्रातिल पुतळ्यातील घोड्याच्या पायांच्या अवस्थेविषयीच्या नियमांबात अधिक माहिती/लिंक वगैरे द्यावी.
वरील नियम मला पुसटसे आठवते आहे, त्यानुसार, एका दिवाळी अंकात (बहुधा किर्लोस्कर) श्री करमरकर यांनी गेल्या शतकात बनविलेल्या शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याबाबत लेख होता, त्यात ही माहिती देखिल होती. हा पुतळा पुण्यात शिवाजी प्रिपरेटरी हायस्कुल, कोर्टाच्या मागे/मॉडर्न कॅफे समोर बसविलेला आहे.
मात्र मला अधिक संदर्भ जुळविता आलेले नाहीत.

या शास्त्रानुसार, खरे तर पुण्यातील बालगंधर्वपासच्या झाशीच्या राणिचा जो पुतळा दाखविला आहे, त्याचे दोनही पाय हवेत फेकलेले दाखवायला हवे होते. पण तिथे घोड्याचा एकच पाय उचललेला दाखविला आहे.
तर डांगे चौक (हिंजवडी ते चिंचवड) येथे कॉर्नरला एक बाग आहे, त्यातिल शिवरायांचा पुतळा असाच घोड्याचे दोनही पाय हवेत फेकलेल्या अवस्थेत आहे.
वरील दोनहि पुतळे संकेतानुसार चुक आहेत.

हां, आता असले संकेत मानायचेच नाहीत असे काही ठरविले असल्यास मग बोलणे खुंटले.

*****************************
पद्म यांनी दिलेली लिंक व माहिती पुढे देत आहे

पद्म | 24 December, 2016 - 15:39
https://en.wikipedia.org/wiki/Equestrian_statue

इथे आत्ताच वाचलं,

Hoof-position symbolism

In the United States and the United Kingdom, an urban legend states that if the horse is rearing (both front legs in the air), the rider died in battle; one front leg up means the rider was wounded in battle or died of battle wounds; and if all four hooves are on the ground, the rider died outside battle. For example, Richard the Lionheart is memorialised, mounted passant, outside the Palace of Westminster by Carlo Marochetti; the former died 11 days after his wound, sustained in siege, turned septic.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाश्चात्त्य ते जगन्मान्य ह्या मनोभूमिकेतून बाहेर यायची गरज आहे. घोड्याचे दोन्ही पाय वर असणे शूरता, निडरतेचे चिन्ह मानले जाते. आपल्या चित्रपटांमधे, कलांमधे घोडे असे उभारलेले वीरश्री, वीररस दाखवण्यासाठी चितारले जातात. आपल्या लोकांनी पुतळा उभारतांना भारतीय मानसिकतेप्रमाणे विचार करणे योग्य आहे. पाश्चात्त्य विचार पश्चिमेत ठिक.

>>>> आपल्या चित्रपटांमधे, कलांमधे घोडे असे उभारलेले वीरश्री, वीररस दाखवण्यासाठी चितारले जातात. <<<< Lol
नशिब, तुम्ही त्या "अतिमहान" अशा मकबुल फिदा हुसेन नामक चित्रकाराने रंगविलेले/दाखविलेले "घोडे" संदर्भाकरता घ्या असे म्हणले नाहीये.... Proud याबद्दल तुमचे धन्यवाद

बरोबर आहे

Limbutimbu - me dekhil he wachle ahe. Ani kolhapur la Gagangiri maharaj yanacha putala ahe, tyat hi ghodyache donhi paay hawet ahet.

https://en.wikipedia.org/wiki/Equestrian_statue

इथे आत्ताच वाचलं,

Hoof-position symbolism

In the United States and the United Kingdom, an urban legend states that if the horse is rearing (both front legs in the air), the rider died in battle; one front leg up means the rider was wounded in battle or died of battle wounds; and if all four hooves are on the ground, the rider died outside battle. For example, Richard the Lionheart is memorialised, mounted passant, outside the Palace of Westminster by Carlo Marochetti; the former died 11 days after his wound, sustained in siege, turned septic.

In the United States, the rule is especially held to apply to equestrian statues commemorating the American Civil War and the Battle of Gettysburg,[6] but there are at least nine instances where the rule does not hold for Gettysburg equestrian statues. One such statue was erected in 1998 in Gettysburg National Military Park, and is of James Longstreet, who is featured on his horse with one foot raised, even though Longstreet was not wounded in battle. This is not a traditional statue, as it does not place him on a pedestal. One writer claims that any correlation between the positioning of hooves in a statue and the manner in which a Gettysburg soldier died is a coincidence.[7] There is no proper evidence that these hoof positions are right, but people believe it to be. It is true in some instances but false too in others.

पण हे नियम US & UK मध्ये आहेत असंही म्हटलंय......
भारतात पण हेच नियम लागू करावेत याचं काही ठोस कारण नाहीये......

लिंबुजी तुम्ही मुर्ती बनवाल तेंव्हा घोड्याचे मागील दोन्ही पाय वर हवेत दाखवा. म्हणजे त्या हुसेनचा पुरेपूर बदला घेता येईल.

जानवी कानाला लावायचेही नियम होते.. उपासाला काय खावे याचेही नियम होते.. फोर व्हीलरला ड्रायव्हर कुठे असावा याचेही नियम भिन्न भिन्न देशात भिन्न भिन्न आहेत.

उगाच घोड्ञावरुन वाद कशाला?

घोडा हे आउट्डेटेड वेहिकल आहे... त्याच्यावरुन आता खडाजंगी कशाला?>>>>
सध्याच्या देशातील परिस्थितीमुळे घोडा परत दळणवळणाच साधन म्हणून वापरात येईल अशी शंका आली असावी त्यांना.

रायगड वर दिव्याचे पैसे भरायला सरकार कडे पैसे नाहीत. आणि इथे ३६०० कोटी पाण्यात टाकणार. हे स्मारक म्हणजे फक्त समुद्रात नवीन जमीन निर्माण करून नंतर तिचा मेवा खाणे हे आहे. जसे कि स्मारक पर्यंत जलवाहतूक - दे कोणा गुज्जुला ठेका. तो ठेवेल काही लोक पगारावर. स्मारकावर खाणे , पिणे, इतर वस्तू , अगदी कपडे, खेळणी पण . तिथली हॉटेल . सर्व काही वेगवेगळ्या राजकीय नेते आणि बाबू ना वाटप होणार.
मुंबई मध्ये आज जमिनीला सोन्या पेक्षा जास्त भाव आहे . स्मारकाचे निमित्त करून सरकार समुद्रात नवीन जमीन निर्माण करत आहे खाबुगिरी करायला. परत मराठा समाज पण खुश . एका दगडात दोन पक्षी .

कॉन्गी/कम्युनिस्टांना उशीरा जाग येते हे खरेच आहे...... वरातीमागुन घोड नाचवतात.... Proud
आता वरील विषयास धरुन येवढ कोलित मिळतय हातात, तरी वापरायला समजत नाही..... Wink

बाकी लाल्यांच्या निष्ठेबद्दल शंका नको, नियम पाश्चात्य/अमेरिकन आहेत म्हणले की लाले त्यांना विरोध करणारच, अन म्हणून मग वरिल प्रकरण त्यांच्या पोथीनिष्ठते मधे बसत नाही Lol

>>> एका दगडात दोन पक्षी . <<<< ते समदे समदे खर आहे असे समजुन चालुया.....
पण २०१४ आधी कॉन्गींनी "एक दगड मारुन दोन पक्षी मारायची" संधी हातचि घालवली हे सिद्ध होते आहे, नै का? Wink नुस्तेच प्रस्ताव ठेवत बसले, कृति नाहीच, अन कृति का नाही? तर त्यावेळेस लगेच इलेक्शना येणार, तर मग योजनेत आपला हिस्सा कसा मिळणार याची भ्रांत, म्हणून खेकड्याप्रमाणे आपापसातच तंगड्या खेचत एक दगड मारुन दोन पक्षी मारायची संधी घालवली ती घालवलीच... Biggrin

लिंबू, हे घोड्यांच्या पायाबद्दल मी वाचले होते. कोल्हापूरातले सर्व पुतळे याच नियमानुसार बनवले आहेत...

पण माझा एकंदरीतच, अशा स्मारकाला विरोध आहे. खर्च तर आहेच पण शिवरायांनी जिथे खरे शौर्य गाजवले ते गडकिल्ले मात्र दूर्लक्षित आहेत. आणखी काही वर्षांनी तिथे दगडांशिवाय काही नसेल. केवळ रायगड तरी जसा होता तसा बांधून काढला असता, तरी खुप होते.

आणि हे स्मारक, शिवरायांच्या भक्तीपेक्षा, राजकारणी हेतूने बांधले जातेय. मुंबईत छत्रपति शिवाजी टर्मिनस आहे ( त्याला मराठीत सी.एस.टी. आणि हिंदीत छ.शि.ट. म्हणतात ) छत्रपति शिवाजी इन्टरनॅशनल टर्मिनस आहे ( हे नाव कुठल्याच विमान कंपनीच्या उद्घोषकाला नीट उच्चारता येत नाही. ) शिवाजी पार्क आहे ( त्याला शिवतीर्थ पण म्हणतात ) ... आता हे आणखी. पण त्यांनी घालून दिलेले आदर्श मात्र पायदळी तूडवले जाताहेत.

न्यू झीलंड मधे, ताजमहालाची प्रतिकृती बांधण्याचा प्रस्ताव होता. तिथल्या सरकारने लोकांची मते मागवली. तर लोकांचे मत असे पडले, कि ताजमहाल एकमेव असावा आणि जर सरकारकडे एवढे पैसे जास्त असतील, तर भारतातील अनाथ मूलांना मदत करावी.

आंतरजालावर कोणत्याही चर्चा-वादात pillow fight with strangers प्रतिसाद देणे एका विशिष्ट वर्गाची रूढ पद्धत झाली आहे.

पैशाची शुद्ध नासाडी आहे. महाराजांबद्दलचं प्रेम दाखवायचंच असेल तर त्यांचे प्रतापी गड नीट राखा म्हणावं. ती महाराजांची खरी निशाणी आहे. हे असलं बेगडी स्मारक काय गरजेचं?

तस कस मामी, किल्ले चांगले ठेवण्यात मार्जीन नाहीच शिवाय मिडीया मायलेज पण नाही. उद्या हे स्मारक बघून झाल्यावर एखाद्या चौकस परदेशी प्रवाशाने विचारले तुमच्या राजाची राजधानी बघू म्हणल्यावर त्याला पडझड झालेल्या किल्ल्यावर न्यायचे काय प्लॅन करणार आहेत देव जाणे.

या पडक्या किल्ल्यांचं जनतेनं का कौतुक बाळगायचं ? राजामहाराजांच्या धडधाकट वाड्यातुन त्यांच्या वारसानी फाइव स्टार हॉटेलं काढलेली आहेत आणि ज्याला फारशी कमर्शियल व्याल्यु नाही ते मात्र सार्वजनिक / पुरातत्व वगैरेच्या अंडर आहे.

पडक्या किल्ल्यांचेच महत्व आहे काका, वारसांबद्दल तर बोलूच नका, केवळ आडनाव लावतात म्हणून वारस म्हणायचे, ते उद्यन राजे वारस आहेत याचा विचार करूनच कसेसे होत

चेंबुर
गैरसमज आहे तुमचा. किल्ल्यापर्यंत रस्ता नेऊन व्यावसायिक उपयोग करणे केंव्हाच सुरू झालायं. माझा तार त्या स्मारकाला विरोधच आहे पण किल्ल्यावर जाण्यासाठी कुठल्याही सोयीसुविधा नकोत आशा मतापर्यंत आलोय. कारण माथेरान, महाबळेश्वर, सिंहगड सारख्या गिरीस्थानांवर जे खरकटे पर्यटक येतात त्यांचे वर्तन पाहून असेच वाटते.

व्यावसायिक उपयोगाला माझा विरोध नाही ... ते त्यांच्या स्वतःच्या खिशातून पैसा घालुन त्यांच्या मर्जीने किल्ले चढतात. त्यानी घाण करु नये, अन केलीच तर सरकारने निस्तरावे.

पण भावनिक आव्हान करुन जनतेला पैसा व वेळ द्यायला आवाहने करणारे भंपक लोक मला आवडत नाहीत.

आमच्या आजोबांचं गावचं घरही कधीमधी गळतं. ते शाकारायला कुठल्या राजांचे / सरदारांचे वंशज त्यावर चढतात का ? मग ह्यांच्या खापरपणजोबांची दगड धोंडं ह्यानी नको का सांभाळायला ? भर रस्त्यावरल्या सुबक ऐतिहासिक वास्तूत वारसांची हॉटेल .... आणि पडक्या किल्ल्याना मात्र लोकानी गोंजारत बसायचं !
.
लोकं अगदी डोळे भरुन भरुन जुन्या किल्ल्यांबद्दल बोलत असतात , मला तर हसूच येतं .. सकाळी आठला दार उघडणार .. संध्याकाळी सहाला बंद.. दिवसा जायचं म्हटलं तरी डोंगरावर सात आठ किलोमीटर चढून जायचं .. सतरा वेळा कुणीतरी शिपाई चौकश्या करणार .. ... मग हे सगळं ह्यांच्या स्वतःच्या रक्षणाला होतं की आमच्या खापरपणजोबाच्या ?

आता कुठे पाश्चिमात्य का भारतीय वाद घालता? भाषेत इंग्रजी, त्यांच्याप्रमाणे पोषाख, सगळे काही आताशा आंतरराष्ट्रीय झाले आहे. सगळीकडेच.
त्यातून हां, हां, आता असले संकेत मानायचेच नाहीत असे काही ठरविले असल्यास मग बोलणे खुंटले.
तर तसेच ठरवलेले दिसते सगळीकडेच. मग बोलणे खुंटले.

तो ठेवेल काही लोक पगारावर. स्मारकावर खाणे , पिणे, इतर वस्तू , अगदी कपडे, खेळणी पण .

आणि मग तिथेहि लोक घाण करतीलच. कागदाचे बोळे, उरले सुरले खाणे, कागदी पेले, पुतळ्यावर किंवा पायथ्यावर आपले नाव लिहीणे वगैरे उच्च भारतीय परंपरा निष्ठेने पाळल्या जातील. नि मग सरकारने स्वच्छ करावे अशी बोंब.

बाकीचे सगळे उचलले पाश्चिमात्यांचे पण स्वच्छतेच्या बाबतीत भारतीय परंपरेचे निष्ठेने पालन!

लिंबूटिंबू, तुम्ही पुतळ्यावरून एव्हढी चर्चा करता मग तो हिंदी बाजीराव मस्तानी सिनेमा बघाल तर आठ दिवस बेशुद्ध पडाल!! Happy

काय पण डान्स आहे बाजीरावाचा, वाSSट लावली? कसची इतिहासाची?
Happy

स्मारकाला तसा विरोध नाही. नाहीच बांधायचे तर मग कोणाचेच नको. ईतरांचे बांधले जातात तर मग महाराजांचा का नको?

गडकिल्य्यांचे संवर्धन यातून मिळणार्‍या उत्पन्नातूनही करता येऊ शकते. पण ते करायची ईच्छा असली पाहिजे. मुळातच ईच्छा नसेल तर हे स्मारक न बांधल्याने तरी ते होणार आहे का? नाही ना? मग त्या कारणसाठी स्मारकाला विरोध करण्यात अर्थ काय?

महाराजांच्या नावाचे राजकारण केले जातेय ते तर आपली स्पेशालिटी आहे. त्याचा का वेगळा बाऊ करायचा.

मुंबईत बांधला जात आहे याचा एक मुंबईकर म्हणून आनंदच आहे. शहराची एक शान वाढेल.

फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की समुद्रात भर टाकत आहेत त्याचा फटका तर बसणार नाही ना. अजून एक २६ जुलै झेलायचा नाहीये.

घोड्याच्या पायाबाबत जे भन्नाट दिसेल त्याला आपली पसंती.

महाराज फार मोठे आहेत. पण आपल्या भ्रष्ट सिस्टीमने त्यांचा योग्य मान सन्मान आदर राहील असे वागावे ही अपेक्षा मी ठेवत नाही. कारण ती त्यांची पात्रताच नाही.

फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की समुद्रात भर टाकत आहेत त्याचा फटका तर बसणार नाही ना. अजून एक २६ जुलै झेलायचा नाहीये
>>
समुद्रात टाकण्यात येणार्या भरावामुळे भरती ओहोटीच्या प्रवाहात बदल होतील, ज्याचा धोका गिरगाव चौपाटीला होऊ शकतो.
वरळी सी लिंकसाठी जो भराव टाकला, त्याने दादर चौपाटीची काय अवस्था झाली आहे ते माहिती असेलच.

स्मारकाला तसा विरोध नाही. नाहीच बांधायचे तर मग कोणाचेच नको. ईतरांचे बांधले जातात तर मग महाराजांचा का नको? + 1 एकदम बरोबर...

Pages