वृत्तपत्र
शब्दकोडे
आजच्या रविवार सकाळ (२ जुलै २०२३) मधील शब्दचक्र. बहुतेक सगळे शब्दकोडे अवघड वाटते. कुमार १ आणि इतर वाचकांचा प्रतिसाद मिळाला तर सोपे जाईल. धन्यवाद.
रविवार सकाळ मधील शब्दचक्र
वर्तमानपत्रात मराठी शब्दकोडे असते तसे online काही आहे का?
वर्तमानपत्रातील मराठी शब्दकोडे सोडवायला मजा येते. पण तो हातात घ्यायला वेळ मिळत नाही. online असे काही आहे का?
Fm Radio एक मित्र
असावा सगळ्यांकडे एक असा मित्र तुम्हाला पुर्ण न्युज पेपर मधून एक तरी funny न्युज काढून खूप हसवणारा,कोरोणाची लक्षण दाखवुन तुम्हाला घाबरवणारा ,असावा सगळ्यांकडे एक असा मित्र unknown नंबर वरुन कौल करून आपली फिरकी घेणारा, बिना ब्रेकच्या सायकल वर बसवून आपल्याला हवेत उडवणारा,नेहमी Fm Fadio बनुन आपल्याला थोडातरी पकवणारा, असावा सगळ्यांकडे एक असा मित्र, पुर्ण जग जरी आपल्या विरोधात असलं तरी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारा आपल्याला नेहमीच सावलीसारखी साथ देणारा,
कुबेराचे चौर्यकर्म
लोकसत्तात एक लेख आला होता, कोविडोस्कोप ह्या सदरात.
नंतर समोर आलं की जो लेख स्वतः च्या नावावर खपवला होता तो तर शब्दशः फक्त भाषांतर करुन टाकला होता. (परवानगी न घेता)
बराच गाजावाजा होउन पण कुबेरने चकार शब्दही काढला नाही की माफी मागितली नाही, बहुतेक तो लेख गुप्चुप काढुन टाकला आहे.
ह्या काही लिंक्स,
अती जुने वर्तमानपत्र आंतरजालावर कसे शोधता येईल?
लोकमत , सकाळ, सामना, मटा किंवा लोकसत्ता...
कोणतेही दैनिक असो...
पण काही वर्षांनपूर्वीच्या दिनांकाचे शोधता येईल का?
सर्वसाधारणपणे सर्व मुख्य दैनिके स्वतःच्या वेबसाईटवर २-४ आठवडे डिजिटल कॉपी उपलब्ध करतात, परंतु काही महिने अथवा वर्ष जुने पत्रक पाहायचे असल्यास...त्यांच्या कार्यालयात जान्यावाचून इतर काही उपाय?
वाचकांचा पत्रव्यवहार अर्थात जनमानस
आपण सर्वजण इथे वाचन आणि लेखन करण्यासाठी जमतो. अनेक विषयांवर चर्चा होतात, रंगतात, वादविवाद अन काथ्याकूटही होतो. या माध्यमाव्यतिरिक्तही आपण इतर वाचन करतो. रोजचे वृत्तपत्र वाचन हा आपल्या दिनक्रमाचा एक भाग असतो. त्यावरून एक नजर फिरवल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. आज जरी इ-माध्यम प्रस्थापित झालेले असले तरी आपल्यातील बऱ्याच जणांना एखादे तरी छापील वृत्तपत्र वाचायला आवडते. जेव्हा आपण ते चाळू लागतो तेव्हा त्याच्या पानांमध्ये आपल्याला विविध विषयांची विभागणी केलेली दिसते. मग आपल्या आवडीनुसार आपण हव्या त्या पानावर रेंगाळतो.
भारतात जगण्यासाठी सर्वात सुंदर शहर पुणे!
सांज अमेरिका
भारतात असताना सांज लोकसत्तातल्या सासूने सुनेचा छळ करायला वापरलेल्या नामी क्लुप्त्या, गावकर्यांनी हिंसक जनावरांना हुसकवायला लावलेला फास आणि त्यात चुकुन अडकलेले उंदीर छाप बातम्या वाचायला जाम मजा यायची.
देश बदलला तरी असल्या गमतीशीर बातम्या रोज कानावर पडतातच. तर अमेरिकेतल्या ट्रिविअल, मजेशिर, विअर्ड बातम्या शेअर करायला हा धागा.
अमेरिका लिहिलं असलं आणि अमेरिकेतील आयुष्यात धागा असला तरी तुमच्या देशातल्या, वाचनातल्या बातम्यांचं स्वागतच आहे!