परत एकदा लिफाफे करण्याची उर्मी आली. मध्ये दिवाळीसाठी केले तेव्हा फोटो स्टेटस वर टाकले. तर बऱ्याच जणांनी लिफाफ्यासाठी विचारलं. आणि एक मैत्रिण बजाजभवन मध्ये प्रदर्शन लावणार आहे साड्यांचे तर तिथे ठेव म्हणाली. म्हंटलं बघू तर जमतय का, तर चक्क 117 लिफाफे झाले करून दोन दिवसात.
1) 
2) हे पण

नवरात्रीनिमित्त घरच्या बागेतल्या फुला-पानांपासून रचलेल्या देवीच्या रचना
कलाकार : माझी आई
मातर्नमामि कमले कमलायताक्षि
श्रीविष्णुहृत्कमल वासिनि विश्वमातः ।
क्षीरोदजे कमलकोमल गर्भ गौरि
लक्ष्मी ! प्रसीद सततं नमतां शरण्ये ।।१।।
दिवाळी साठी खास रंगीत आणि सोनेरी, चंदेरी क्रोशे टीलाईट होल्डर.. मेटल वाटी आणि व्हाईट वॅक्स कँडल/गुलाब कँडल सहित उपलब्ध.. यात रेडिमेड लाईट्सही ठेवता येतात. मेटल वाटी काढता येते त्यामुळे सुशोभित वाटी सारखा उपयोग ही करता येतो. दिवाळी व्यतिरिक्त इतरवेळी देवासमोर सुका नैवेद्य किंवा फुलं ठेवायला उपयोग होतो. शिवाय हळदीकुंकू वाण म्हणून ही देता येतं. पूर्णपणे एकसंध आणि हाताने वीणलेले आहेत.
https://www.facebook.com/saarascrafts
वडिलांच्या 80 व्या वाढदिवसाला कार्ड केलं होतं. फोटो अत्ता सापडले. ( 75 व्या वाढदिसाचं मोठं होतं बरेच पानी, ते मागे दिसतय)
1) 
2) आतला मजकूर : Enjoy life @AT
आम्ही चार बहिणी MADS

गणेशोत्सवाच्या निमित्ताने माझ्या आईने फुलांच्या सहाय्याने केलेली गणपतीची रेखाटने.
सर्व पाने फुले फळे भाज्या घरातल्या बागेतील आहेत.

--

--
ही दुसरी एंट्री:
थँक्स गिव्हिन्ग ला अजून महिना भर अवकाश असला तरी धन्यवाद म्हणायला सारेच मुहूर्त शुभच आहेत. तर गणे शोत्स वाच्या निमित्ताने.
मा. अॅडमिन, वेमा, श्री. अजय, आणि सर्व डेव्हलपर आणि मेंटेनन्स टीम ला मना पासून धन्यवाद. आम्हाला मराठीतून व्यक्त व्हायला एक छान्शी जागा दिल्याबद्दल व ती अखंड चालू ठेवल्या बद्दल - इट टेक्स अ लॉट यु नो.- तर त्याची सामान्या माबोकरांक्डून नोंद व धन्यवाद.
डिझाइन स्केचपेन बॉक्स मध्ये आलेले आहे. मी रंगवले आहे.
तुम्ही आहात म्हणून आम्ही इथे आहोत.
आज शेवटच्या दिवशी एंट्री टाकत आहे.
1)अजून एक भेट कार्ड दिलं तर चालेल का माहिती नाही, पण देते एन्ट्री

2)

3)
