माझी जंगल भटकंती !!!
Submitted by ygurjar on 3 November, 2016 - 13:43
सतत वाचन आणि जंगलातल्या भेटींमुळे पक्षीनिरीक्षणात थोडाफार तरबेज झालो आणि महाराष्ट्र वन खात्यासाठी भिमाशंकर येथे प्रथम वन्य गणनेसाठी त्यांना मदत केली. त्याच वर्षी ताडोबा येथेसुद्धा वाघांची गणना होणार होती त्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी आम्ही गेलो. त्या वेळी महाराष्ट्रात मेळघाट हे एकमेव व्याघ्र प्रकल्प होता आणि ताडोबाचे व्याघ्र प्रकल्प होण्यासाठी त्याचे नाव सुचवले गेले होते. यासाठी अतिशय कसून वाघांची गणना करायची होती. यावेळी आम्ही चालत चालत ताडोबाच्या जंगलात वाघांच्या ठशांचा मागोवा घेत होतो. कित्येक किलोमीटर वणवण केल्यावरसुद्धा त्याचा काही ठावठिकाणा लागत नव्हता.
विषय:
शब्दखुणा: