८ ऑक्टोबर. भारतीय हवाई दलाचा स्थापना दिवस. याच दिवशी १९३२ मध्ये अवघ्या ४ वेस्टलँड वापिटी विमाने आणि ५ वैमानिकांसह भारतीय हवाई दलाने रॉयल एअर फोर्सचे सहाय्यक दल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतरच्या काळात भारतीय हवाई दलाने विविध संकटांच्यावेळी महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. भारत प्रजासत्ताक झाल्यावर रॉयल इंडियन एअर फोर्सचे इंडियन एअर फोर्स झाले.
आपल्याच हातून आपल्याच चुकीने आपल्या पत्नीला गमावून बसलेल्या आणि काळाच्या तडाख्याने पुन्हा तिच्याच शोधात निघालेल्या एका पतीची मनस्वी गाथा ...रेड लाईट एरियातील नरकाहून वाईट जिणं जगणारया एका अभागी स्त्रीची व्यथा .....
‘प्रथम’ विषयी -
२६ सेंटिमीटर लांबी रुंदी आणि उंची असलेला आणि ९.८ किलोग्रॅम वजन असलेला एक घन म्हणजे ‘प्रथम हा उपग्रह’.त्याला ३ अँटीना पण जोडलेले आहेत. त्याचे कार्य फॅराडे च्या सिध्दान्तावर वातावरणातल्या ‘इओनोस्फिअर‘ थरामधल्या इलेकट्रोन्स घनतेचे मोजमाप करणे’ असे आहे. या माहितीचा उपयोग करून जि पी एस
( ग्लोबल पोझीशनिंग सिस्टीम GPS ) द्वारा उपलब्ध होणारी माहिती अधिक अचूक आणि दोषविरहित स्वरूपात मिळू शकेल. २६ सप्टेंबरला सतीश धवन स्पेस सेंटर , श्रीहरीकोटा येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण होऊन उपग्रह भारताच्या सेवेत रुजू होतोय.
गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात अतिशय दुर्दैवी आणि भयानक घटना घडली. एका १२ वर्षाच्या मुलीवर ३ जणांनी बलात्कार केला. मला त्यातील पूर्ण बातमी बघायला मिळाली नाही बाकी कुठेही. पण मिळालेल्या माहितीप्रमाणे, ती मुलगी रात्री लहान बहिणीला घेऊन बाहेर शु करायला गेली असताना हे सर्व झालं. बहीण बिचारी घाबरून पळून गेली. आणि हे तिघे मुलीला घेऊन फरार झाले. पुढे सोसायटी मध्ये हेही कळले की, मुलीला आमच्या सोसायटीतील एकजण भेटायला जाऊन आल्या आणि त्यांनाही ती अतिशय घाबरललेली दिसली. त्या मुलीला, तिच्या घरच्यांना आपण कुठल्या प्रकारची मदत करू शकतो यावर बोलणेही झाले.
परवा हॉस्पिटलमध्ये गेले होते. निघायच्या वेळेला घड्याळ पाहिले आणि लक्षात आले ते एकदम 'राईट टाईम' होते. तसे घर सोडले की बाकी ठिकाणी घड्याळे योग्य वेळच दाखवतात. पण घरात प्रत्येक घड्याळ ५-१० मिनिटे पुढे करून ठेवायची सवय लागली आहे. त्यामुळे कुठेही घड्याळ पाहिले की ते योग्य वेळ सांगतच असेल अशी सवयच राहिली नाहीये. तरी त्यातल्या त्यात आजकाल मोबाईल वर कॅर्रीएर कडून येणारी वेळ जी दिसते तीच योग्य आहे असे समजून चालते. निदान आपण चुकलो तर आपल्यासोबत बाकी फोन वापरणाऱ्या लोकांचेही घड्याळ चुकीचे असेल. 
What a day ....69 yrs back both India and Pakistan got independence
Indians have become CEOs of Google, Microsoft, Pepsico, Jaguar, Land Rover and
Pakistani have become heads of Taliban, Al-Qaeda, Jammat U Dawa, Hijbul Mujahideen
What a contrast......
Adding a line to this joke ...
India reached Mars and
Pakistan still trying to enter India
सुंदर संकल्पना आणि मांडणी असलेल्या राष्ट्रपती भवन संग्रहालयाच्या दुसऱ्या टप्प्याचे २५ जुलै २०१६ ला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. श्री. प्रणब मुखर्जी यांच्या राष्ट्रपतिपदाचा ४ वर्षांचा कार्यकाळ आज पूर्ण झाला आहे. त्या निमित्ताने राष्ट्रपती भवन संग्रहालयाचा विस्तारित टप्पा खुला करण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी मी माझा वाढदिवस राष्ट्रपती भवनाला भेट देऊन साजरा करायचा निर्णय घेतला होता. मग सगळे नियोजन करून वाढदिवशीच राष्ट्रपती भवन आणि तेथील संग्रहालय आवर्जून पाहिले होते. खास तेवढ्यासाठीच तर दिल्लीला गेलो होतो.
गेल्या वर्षी नोकरी शोधत असताना एक वेगळाच अनुभव आला. इंटरव्ह्यूला गेले तर तिथे ज्यांनी इंटरव्ह्यू घेतला ते मॅनेजर पाकिस्तानी होते. इंटरव्ह्यू छान झाला. अर्थात सर्व बोलणं इंग्लिश मधेच होत होतं आणि तेही अमेरिकेत त्यामुळे तसा विचार करायचं काही कारण नव्हतंच. सर्व बोलणी झाल्यावर मला त्यांनी एक प्रश्न विचारला,"तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना की आमचं ऑफशोअर चं ऑफिस पाकिस्तान मध्ये आहे?" खरंतर भारतीयांनी जगात आय टी मध्ये इतकं नाव मिळवलं आहे (चांगलं आणि वाईट दोन्हीही) की पाकिस्तान वगैरे मध्ये ऑफशोअर म्हणल्यावर मला जरा हसूच आलं. कधी असा विचारच केला नव्हता. अर्थात मला काय इथे बसूनच काम करायचं होतं.
आज हा लेख लोकप्रभामध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यातील टंकनाच्या चुका दुरुस्त करून इथे देत आहे. मूळ लेख http://www.loksatta.com/vishesha-news/dr-r-c-dhere-1267274/ इथे वाचता येईल
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
त्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा शाळासमुह समुद्र बघायला जातोय. बहुतांश जणांचा समुद्र एव्हाना बघून झालाय तरीही पुन्हा बघणार आहोत. कारण फुल्ल टू धिंगाणा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी डोंगराच्या वेळी आणि नुकतेच हिलस्टेशनवर केले होते. यण्दा हा मान चक्क समुद्राने पटकावला आहे. पण एक गोची आहे. धिंगाणा डान्स करायला पोषक अशी जागा समुद्राजवळ नाही. म्हणून मग समुद्राला भरती आली की दंगा करायचा प्लॅन आहे. पण धिंगाणा करायला ब्रांडेड हॉटेल भाड्याने घेणे आले. किती वेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मायबोलीकरांना त्रास देणार. म्हणून यंदा सरळ आमच्या नंदीबैलाला विचारले.