तंत्रज्ञान

बुलेट ट्रेन ची गरज आणि आम्ही !

Submitted by रमेश भिडे on 4 December, 2019 - 10:57

२००९ साली औरंगाबाद आणि जालन्याचे काही उद्योजक चीन भेटीला गेले होते. त्यात मी देखील होतो. बीजिंग शांघाय गुनझावच इन्फ्रास्ट्रक्चर बघून आमचे डोळे अक्षरशः फाटले होते.

चंद्रयान २

Submitted by मी मधुरा on 7 September, 2019 - 02:09

तुटला आहे संपर्क;
जिद्द नाही अजून.....
एव्हड्या तेव्हड्या गोष्टीने
जाणार नाही खचून!

सहभागी प्रत्येक यशात
मग आज कुठे वेगळे?
प्रयोगातून नवीन शिकू
एकत्र मिळून सगळे

मंगळ असो, चंद्र असो,
हिंमत ठेवा शाबूत
प्रयत्नांती तुमच्या
विश्वही येईल काबूत

©मधुरा

प्रतिसाद टाइप करता येत नाही

Submitted by तृप्ती मेहता - ... on 2 August, 2019 - 01:46

मी प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत आहे पण जेव्हा सेव्ह करते तेव्हा एरर दाखवतंय. काय करू ?

व्हाईट नॉईज काय आहे भाऊ? रात्रपाळी आणि झोप यासाठी उपयोगी.

Submitted by पाषाणभेद on 25 June, 2019 - 19:07

मित्रांनो,

आपणापैकी बरेच जण नाईट शिप्ट करत असतील. नाईट शिप्टमुळे दिवसा आपल्याला झोपणे क्रमपाप्त, आवश्यक आहे. परंतु घरातील व्यक्ती, आजूबाजूचे लोकं हे सुद्धा आपल्याबरोबर नाईट शिप्ट करतात का? तर नाही.

मराठीतील चांगले टेक ब्लॉग्स कोणते?

Submitted by तुषार भांबरे on 4 May, 2019 - 02:06

मराठीतून नियमित अपडेट होणारे चांगले टेक ब्लॉग्स कोणते आहेत?

मला माहित असलेले काही ब्लॉग्स खाली देत आहे...

माझा स्वतःचा ब्लॉग : https://www.onlinetushar.com/

टेकवार्ता: https://www.techvarta.com/

मराठीटेक: https://www.marathitech.in/

तुमच्या माहितीतील ब्लॉग्स कमेंट करा...

हायब्रीड वाहने

Submitted by शक्तीवान on 3 May, 2019 - 12:35

बऱ्याच वर्षांपासून काही वैज्ञानिक कल्पना माझ्या डोक्यात घोळत आहेत. त्यातील पहिला किडा.

सौर उर्जा

Submitted by दक्षिणा on 1 April, 2019 - 13:00

परवा आमच्या सोसायटीची जनरल मिटिंग झाली. ज्यात काही मुद्दे प्रामुख्याने चर्चिले गेले त्यात सौर उर्जा वापरून सोसायटीसाठीची वीज निर्मिती करणे.
आमची सोसायटी (एकूण) खूप मोठी आहे. सोळा इमारती आहेत. पण प्रत्येक इमारतीची सोसायटी स्वतंत्र आहे. आमच्या एकट्या इमारतीत एकूण ८६ फ्लॅट आहेत. तर त्याबद्दल.
कुणी असा प्रकल्प जवळून पाहिला आहे, अभ्यासला आहे तर मला खालिल माहिती मिळू शकेल का?

चांगल्या स्पिडचे नवीन इंटरनेट कनेक्शन कुठले घ्यावे?

Submitted by मेधावि on 4 February, 2019 - 19:14

पुण्यात, कोथरुडात, स्काईपद्वारे (व्यवस्थित, सलग, वारंवार डिस्कनेक्ट न होता, कमीत कमी लॅग असावा) संभाषण करणे (आठवड्यातून एक किंवा दोन तास) ही गरज आहे.
BSNL च्या सेवेला कंटाळून काही महिन्यांपूर्वीच त्यांची सर्विस बंद केलीये व आता एअरटेल व आयड्याच्या डेटा पॅकवर बाकी सर्व कामकाज व करमणूक उत्तम चालू आहे. पण स्काईपसाठी मात्र त्यात अडचण येते आहे. संभाषणात लॅग येणे, वारंवार डिस्कनेक्ट होणे असं वरचेवर होतं.

हॅथवे हे एक दुसरं ऑप्शन आहे पण ते भिंतीला भोक पाडून केबल आत आणतात आणि नुकतेच इंटीरिअरचे काम केलेले असल्यामुळे परत ठोकठोक, लोंबणार्या वायरी नको वाटतात.

Pages

Subscribe to RSS - तंत्रज्ञान