भेटणे न व्हावे
भेटणे न व्हावे बोलणे न व्हावे
तुटावेत हे एकदाच धागे
किती आडवळणे घ्यावीत आता
नको मीलना नको धाऊ वेगे
उगा तार सप्तकातूनी होय गाणे
तयाने कुठे का मैफिल रंगे
क्षिती लोकलज्जे पुढे प्रिती काये?
तिचा जीव जाण्यापरी संपवू गे
कुणा काय वाटे नको व्यर्थ चिंता
'सुटलो आता' हा उरे शब्द मागे
© निखिल मोडक