इंद्रधनु

कोसळत्या धारा,पाऊस वारा

Submitted by Meghvalli on 10 August, 2025 - 03:03

कोसळत्या धारा,पाऊस वारा,
घाली थैमान मनात,
भिजुन साऱ्या,आठवणी आल्या,
घेऊन झोका मनात.

इंद्रधनुचे रंग,अंबराचा संग,
नाचला मोर बनात,
थेंब थेंब मोती,भिजवती माती,
टीप टीप लकेर कानात.

दरवळला मंद, मातीचा गंध,
सळसळले रोमांच अंगणात,
खळखळते झरे, नागमोडी सारे,
वाहती डोंगरदऱ्यात.

मंगळवार, ५/८/२५ , ५:२७ PM
अजय सरदेसाई -मेघ

कितीक

Submitted by sachinkakade on 25 April, 2012 - 03:51

कितीक तु, कितीक मी, कितीकशा अश्या कथा
कल कि शाम थी यही, अब आज 'शाम' लापता..॥

खोजता चला चलु, तो यह परछाई क्यो जले ?
तरी बरे...,तु ठेवलीस ही नभावरी निळी फ़ुले...॥

ए आठवते का रुसताना, तुझेही व्हायचे असे ?
तब जलती थी खामोशी, अब चलती भी दुरसे..॥

तभी से मुंतिजर सूर, इन बेलिबास शाखं पर
भर पाचोळा गुण-गुण दिलीस तू हाक जर...॥

तशी अजुन बांधीलच या वा-याला ’ती’ शपथ
तु मिले न भी मिले तो करे चांदसे दस्तखत...॥

तु नही तो ये आसमां तेरी ये शाम लिख चला
तुझ्याशिवाय लिहिणेही, अजुन चालते तुला?...॥

होती तनहाई सिंदुरी, उसकी भी क्या खता
कितीक तु, कितीक मी, कितीकशा अश्या कथा...॥

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Subscribe to RSS - इंद्रधनु