स्वप्न

चूक तर माझीच आहे

Submitted by विनोद इखणकर - श... on 13 December, 2020 - 12:32

प्रत्येक माणसां कडून काही तरी चूक होत असते,त्याच विषयाला हात घालून मी एक कविता लिहिली आहे.मी तुमच्यापुढे सादर करतो,पण आवडल्यास भरपूर दाद द्या हि विनंती आहे.
कवितेचे शीर्षक आहे *"चूक तर माझीच आहे"*

*चूक तर माझीच आहे*
जीवापाड प्रेम करण्याची
आयुष्यातून दूर गेल्यावरही
परतीची वाट बघण्याची

*चूक तर माझीच आहे*
घेतले वचन जन्मोजन्मी साथ राहण्याचे
एक जन्म पण न राहिलो साथ
उरले ते फक्त स्वप्न बघण्याचे

शब्दखुणा: 

छोटीसी आशा

Submitted by किल्ली on 25 September, 2020 - 12:10

माझी ना, खूप दिवसांपासूनची तमन्ना(हो, तमन्नाच!) आहे. मस्त निवांत दिवस असावा. कसलीही घाई, गडबड, गोंधळ नसावा. सकाळी ११-१२ वाजेपर्यन्त जाग आली तरी लोळत पडून राहावे. मग धांगडधिंगा वाली आधी, नंतर रोमँटिक गाणी लावून माहोल बनवावा. ही गाणी ऐकतच आन्हिकं उरकावी. एक तासभर अंघोळ करावी. महत्वाचं म्हणजे मी घरात एकटी असावी. कांदेपोहे करण्याचा सुद्धा कंटाळा आलेला असावा. मग loose loose comfy कपडे (जे लोकांच्या लेखी जुना -पुराना कळकट, बळकट असतात. एरवी मी घातले तर काय मेलं दरिद्री लक्षण असे तु. क. येतात) अंगावर असूनसुद्धा कसलीही तमा न बाळगता खाली टपरीवर जाऊन इडली सांबार, पोहे वगैरे ऐवज चापावा.

विषय: 
शब्दखुणा: 

इतिहास छाटला होता

Submitted by तो मी नव्हेच on 20 August, 2020 - 08:15

हर एक कोपरा तिथला शोधून पाहीला होता
न जाणे कुठला कचरा काळजात भरला होता

किती उपसला तरीही तळ मला गवसेना
कसला हा डोही माझ्या गाळ साचला होता

कसा चालला श्वास, मी काय हुंगले होते
प्रत्येक भिताडावरती धूर साचला होता

लोक निंदती म्हणूनी कोणी स्वप्न मारले होते
पण हात कसा माझाही लाल माखला होता

ना दिसे मलाही काही जी झापड भाळी धरली
धरणारा हात ही माझा पण अंधार माजला होता

हे कुणी कायदे केले अन् ते कुणी वायदे केले
माझा कसा परस्पर त्यांनी निकाल लावला होता

वसंत पालवीत आहे

Submitted by तो मी नव्हेच on 27 July, 2020 - 08:23

ग्रीश्म जाळे जरी अन शिशिर गोठवीत आहे;
तुझी याद येता वसंत पालवीत आहे

तुझे स्वप्न उराशी मी कवटाळूनी बसतो;
तुला मिठीत घेण्या ते खुणवीत आहे

किती श्वास झाले मी न मोजदाद केली;
तुझा गंध हरेक श्वास फुलवीत आहे

न माळतो कुणीही रक्त-जास्वंद मोगऱ्याशी;
परि हात माझा तुझ्यात गुम्फवीत आहे

हाच खेळ चाले केवळ माझिया मनाचा;
तुझे अस्तित्व सदैव भासवीत आहे

तू नाहीस मृगजळ जरी जाणतो मी;
हीं तुझी ओढ़ अनंत चालवीत आहे

तुझी वाट बघता मी दररोज येथे;
काल्पनीक चातकाला जगवीत आहे

त्या स्वप्नांना..

Submitted by मन्या ऽ on 14 May, 2020 - 16:35

त्या स्वप्नांना..

काय करु? समजत नाही..
मनास माझ्या मी
कसा आवर घालु?
हे मज आता उमजत नाही..
झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी जागवाया जात नाही..

स्वप्न आहेत ती
काही श्रावणातल्या पावसाची
तर काही बहरलेल्या वसंताची..
झोपी गेलेल्या
स्वप्नांना
मी आता जागवाया जात नाही..

स्वप्न आहेत ती
घोटभर चहाची
अन् भरपुर गप्पांची..
झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी जागवाया जात नाही..

शब्दखुणा: 

अधूरे स्वप्न

Submitted by पारिजातका on 5 May, 2020 - 16:14

निघालो होतो जग जिंकाया
पण स्वप्न ते अधूरेच राहिले होते
दावेल वाट विजयाची असे
सारथी तरी कोठे राहिले होते

दांभिकतेने भरलेल्या जगाने
अस्तित्वच माझे पुसले होते
विनवीत होतो ज्या दगडाला त्यात
देवत्व तरी कोठे उरले होते

ऊन सावलीच्या खेळात या
डाव सारे निसटत होते
जिंकाया साथ देणारे
हात तरी कोठे उरले होते

भूतकाळातील जखमांचे
व्रण काही जात नव्हते
वेदना शमतील असे
मलम तरी कोठे उरले होते

मायेने गोंजारणारे
स्वर निःशब्द झाले होते
जीवन मैफिल रंगवणारे
सूर निरागस कोठे राहिले होते

प्रांत/गाव: 

स्वप्न - २

Submitted by 1987 on 20 December, 2019 - 03:06

घरी येऊन फ्रेश झाली. आई नेहेमी प्रमाणे जेवणाला लागलेली. मोबईल वर एक मूवी डाउनलोड करून ठेवलेला. बिछान्यात आडवी होऊन तो बघायला लागली. डोळा कधी लागला ते कळलंच नाही.
एक छान अनुभवाचा आनंद ती घेत होती. शांत किनारा. समोर वाहणारी नदी. वाहणाऱ्या पाण्याचा एकसारखा आवाज. भोवतालच्या झाडांमधून येणारे पक्षांचे आवाज. जणूकाही सगळं तिच्याशी बोलत होते. हि तीच शांतता होती जिला ती आजवर शोधत होती. एक वेगळ्याच विश्वात ती पोहोचली होती. स्वतःला पूर्ण विसरून.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

स्वप्न - 1

Submitted by 1987 on 18 December, 2019 - 08:38

गोष्ट आहे एका मुलीची. स्वप्नात रमणाऱ्या मुलीची. मेघनाची.
नुकतीच तेहतीशी नुकतीच पूर्ण केलेली. शिडशिडीत बांधा त्यामुळे तिशीची पण दिसायची नाही. दिसायला सुंदर. रंगाने गोरी आणी मनाने निर्मळ.
घरची परिस्थिती बेताची. वडील लवकर गेले. भाऊ मोठा पण घरची जबाबदारी घेणं त्याला काही जमलं नाही. आई नेहेमी घरकामात मग्न. मग काय मेघनाबाई झाल्या झाशीच्या राणी. अगदी सहजपणे घर सांभाळून घेतलं. आलेल्या कोणत्याही परिस्थितीला तोंड कसं द्यायचं ते आयुष्य जगता जगताच शिकली. कोणी जवळच मोठ नाही की कुणी मित्र मैत्रीण नाही. जे जमलं जे पटलं ते केल.

विषय: 
शब्दखुणा: 

दगडोबाच्या मुलीचे स्वप्न..

Submitted by Happyanand on 9 November, 2019 - 10:23

मेघांचे कमंडलू लवंडले आणि कोरडी ठीक्कुर पडलेली काळी माती जराशी ओलवली.
पावसाचे ते काही थेंब अंगणात खाट टाकून झोपलेल्या दगडोबा च्या ही अंगावर पडले आणि त्याला जाग आली. तो तडक उठला नी झपाझप पावले टाकीत तांब्याच्या माळाकडे जाऊ लागला. पहाटे चे तीन वाजले होते. मागून त्याच्या कारभारणी ने आवाज दिला," आव धनी अाव कुठं निघालास इतक्या रातीचं?".
मागे वळुन दगडोबा यावढच बोलला की.." आलोच तांब्याच्या माळावरून"..

साकव

Submitted by मन्या ऽ on 2 September, 2019 - 16:47

साकव

स्वप्न माझे आज
मी उराशी घट्ट बांधले
सत्य आणि स्वप्नामध्ये
साकव बांधु लागले

सत्यात आहेत वेदना
स्वप्नात आहेत संवेदना
संवेदनांना जवळ करु पाहते
सत्य अन् स्वप्नांमध्ये
साकव बांधु लागले

स्वप्न आहेत पैलतिरी
भावनांच्या पुराने
साकव तुटू पाहतोय
तुटला जरी साकव
तरी नव्याने बांधेल मी

भुतकाळाला सोडुन मागे
पुढे जाऊ पाहते
भुतातले ते कंगोरे
पायी बेड्या अडकवते
त्या बेड्या तोडु पाहते

Pages

Subscribe to RSS - स्वप्न