भारतात जवळपास सर्वच ठीकाणी भटक्या जनावरांचा प्रश्न जटील होत चालला आहे.कुत्रे,गाय हे प्राणी विशेष करुन आढळतात.अनेकदा भटक्या कुत्र्यांना रेबिज होऊन ते पिसाळातात,लहान मुलांवर हल्ला करुन त्यांना जखमी केल्याच्या बातम्या आपण वाचतच असतो.पण प्राणी त्यांच्या नैसर्गीक प्रेरणेने वागत असतात.त्यामुळे प्राण्यांना दोष देऊन उपयोग नाही.
थोडीशी गैरसोय ( http://www.maayboli.com/node/60794) या धाग्याने 2000 पोस्ट चा टप्पा पार केला आहे
कृपया आता तिकडे प्रतिसाद देऊ नयेत.
,
चलनबंदी होऊन आज 40 दिवस होऊन गेले तरी गैरसोय कमी होण्याची नाव नाही,
पुणे मुंबई शहरात स्थिती थोडीशी सुधारली आहे, (पण थोडीशीच, मला स्वत:ला गेल्या 40 दिवसात फक्त एकदा तीन 500 च्या नोटा पाहायला मिळाला आहेत, मात्र तेव्हाच थोडया प्रयत्नांत 2000 चे सुट्टे मिळून जातात असा अनुभव आहे)
ग्रामीण, निमशहरी भागात अजूनही परिस्थिती पूर्व पदावर आली नाही आहे.
राज्य या रघुनाथाचे कळीकाळाशी नातुडे
बहुबृष्टी अनावृष्टी या जगी ना कधी घडे
एका प्रसिद्ध कवींनी रामराज्याचे हे असे वर्णन केलेले आहे.
त्यावेळेप्रमाणे अर्थात राज्यावर येणारी परकीय आक्रमण सोडल्यास इतर संकटे ही ओला दुष्काळ - सुका दुष्काळ हीच असावीत.
त्यावेळीही सामन्य लोक यावेळी माझे शेत पिकणार नाही, माझे खाण्यापिण्याचे वांधे होतील असा विचार करत असतील.
मात्र अर्थशास्त्रज्ञ, सेवादाते, व्यापारी आणि राज्यकर्ते एका वर्षाच्या पावसाचे चार महिने हे असे गेलेत याचा पुढिल वर्षावर, उद्योगधंद्यावर, परकीय व्यापारावर आणि एकंदरच राज्याच्या आर्थिकस्थितीवर काय परिणाम होईल याचा विचार करत असणार.
मध्यंतरी जिओच्या जाहीरातीत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी दिसल्याने वाद उद्भवला होता. मी मोदी भक्त नाही की द्वेषी नाही, (हे हल्ली आवर्जून सांगावेच लागते) पण मलाही ते खटकले होते. मात्र त्यानंतर पुढे क्लीअर झाले होते की मोदींचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय वापरण्यात आला होता. पुढे कायद्यानुसार काय ती कारवाई होईलच असे समजून मी तो विषय डोक्यातून तेव्हाच काढून टाकला होता. किंबहुना मोदींच्या जागी जिओच्या जाहीरातीत शाहरूख खान आल्याने आनंदच झाला होता.
आजच (२८ नोव्हेंबर २०१६) महाराष्ट्रातील बहुतांश नगरपालिकांच्या निवडणूकांचे निकाल जाहीर झाले. मायबोलीवर सर्व भागातील जनता वावरत असते. महानगरांमधील लोक प्राधान्याने असले तरी इतर गावांमधीलही लोक असतातच. आणि बरेच लोक जे महानगरांमध्ये राहतात त्यांना त्यांच्या मूळ गावात काय चालू आहे याची हालहवाल माहिती असतेच.
आजचा सुविचार काय ठरलाय हे जसे शाळेच्या बोर्डावर लिहिले असते,
आजचा मेनू काय बनलाय हे जसे हॉटेलाच्या पाटीवर दाखवले असते,
आजचा सोन्याचा भाव किती वाढलाय हे जसे वर्तमानपत्रात छापले असते,
आजच्या तापमानाचा पारा किती चढलाय हे जसे बातम्यांत सांगितले जाते,
तसेच आजच्यासाठी सरकारने आणि बॅंकेने आपल्या पैश्याची उलाढाल करायला काय नवीन नियम काढलाय हे रोजच्या रोज ईथे अपडेटूया.
धागा काढण्यास कारण की, आज आता संध्याकाळी गर्लफ्रेंडच्या जोडीने एका एटीएमच्या बाहेर लाईनमध्ये उभा होतो. तब्बल पाऊण तास!
भारतात सध्या जे चालू आहे आणि गेल्या काही वर्षात जे काही झाले आहे त्याच्यामागे असलेली स्ट्रॅटेजी युरीने त्याच्या ३० वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये मांडली आहे. त्यामुळे त्याने सांगितलेल्या मुद्द्यांना खूप महत्व आहे.
त्याने काय सांगितलं आहे ह्याधी युरी बेझमेनोव बद्दल थोडसं:
युरी हा रशियाच्या गुप्तहेर संघटनेचा म्हणजेच 'केजीबी'चा सदस्य. त्याचा जन्म १९३९साली मॉस्कोमध्ये झाला. त्याचे वडील रशियन सैन्यात होते, त्यामुळे कम्युनिस्ट छळवादी राजवटीत सामान्य जनतेपेक्षा युरीचं बालपण चांगलं गेलं.
कॉलेजात असताना राजकारण आणि भारत ह्या दोन गोष्टींचा त्याने विशेष अभ्यास केला.
अमेरिकेच्या निवडणुकीत हिलरी ताई हरल्याच दुख आणि ट्रम्प भाऊ जिंकल्याच दुख केलिफ़ोर्निया मध्ये तर विचारूच नका, काल रात्री पासून नेट वर आणि सोशल मिडिया वर लोकांच्या प्रतिक्रिया [ दुखी ] वाचून मन जड झालं.
राजकारण हा माझा फारसा प्रांत नाही, पण एक सुशिक्षित अमेरिकन नागरिक न्हणून योग्य व्यक्तीची निवड, हे मात्र नक्कीच समजू शकते.
आधुनिक शब्दकोशातून:
ट्र्म्पणे!
क्रियापद.
अर्थ:
१. बोलताना आय (I) व माय (My) ह्याच्याशिवाय दुसरे काही न बोलणे.
२. दुस-याविषयी बोललेच तर त्याची किंवा तिची आयमाय काढतच बोलणे.
३. सार्वजनिक नळावरील भांडणात एखाद्याने ‘ठेव तर कळशी पुढे… मग तुझं काय करीन सांगता येणार नाही!’ असे म्हणावे, त्याच चालीवर जागतिक दहशतवादाशी लढायला अत्यंत संदिग्ध व दिशाहीन बोलणे. वैतागून कुणी विचारलेच ‘म्हणजे नक्की काय कराल?’ तर ‘ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो!’ असे लाडीक उत्तर देणे.
(अर्थछटा: मूलतत्ववाद्यांशी लढायला स्वत: ‘मूल’तत्ववादी होऊन पोरकट उपाय सुचवणे)