बँकींग

अन्वीचा निर्णय

Submitted by च्रप्स on 22 November, 2025 - 18:08

अन्वी, एक सांग ना… तू त्या पहिल्या मुलाला का सोडलंस? तो किती चांगला होता! चांगलं कुटुंब, स्वतःचं घर, स्थिर नोकरी… आणि तुला खूप रिस्पेक्ट देणारा. मग असं काय झालं?”

अन्वी काही क्षण शांत बसली.
“हो शनाया… तो खूपच चांगला होता... स्वभाव एकदम शांत आणि काळजी घेणारा. खरं तर माझ्यासाठी परफेक्ट.. आई बाबाना देखील खूप आवडायचा”

शानाया अजूनच गोंधळली.
“मग त्याला सोडून त्या दुसऱ्या मुलाकडे कशी गेलीस? त्याच्यात काय खास?”

शब्दखुणा: 

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बँकिंग

Submitted by गुरुदिनि on 6 July, 2025 - 07:30

(पूर्वप्रसिद्धी 'शुभम' दिवाळी अंक २०२४)

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) अर्थात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ही गोष्ट अलीकडच्या वर्षांत आपल्या तंत्रज्ञानाधिष्ठित जगण्याचा महत्त्वाचा भाग बनली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे उद्योगांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारे तंत्रज्ञान मानले जाते आणि बँकांनी सर्वात आधी हे तंत्रज्ञान त्यांच्या सेवांमध्ये समाविष्ट करण्यास सुरवात केली आहे. अलिकडची आकडेवारी दर्शविते की बँकिंग क्षेत्र सेवा, कार्यक्षमता आणि उत्पादकता सुधारण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी ‘AI’ चा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहे.

विषय: 

ऋणानुबंध

Submitted by अनंत s on 14 March, 2025 - 05:13

सुंदर ते ध्यान उभे सामोरी
गालातच हसते नजर माझ्यावरी

नाकात नथ कानात बाळी
हसता गालात पडली गालावर खळी

हातात कंगन पायात पैंजण
मोहक रूप बघता वाढले हृदयाचे स्पंदन

मोकळ्या केसांतून आली गालावर एक छटा
तिला कानामागे घेण्याचा कितीही आटापिटा

वाऱ्याची झुळूक येता दरवळला सुगंध
विसरलो मी स्वतःला आणि झालो तुझ्यात दंग

शब्दखुणा: 

पॅन कार्ड / आधार लिन्किन्ग , एन आर आय अकाउंट साठी

Submitted by sneha1 on 4 June, 2024 - 22:33

मधे बॅन्केची इमेल आली की NRI यांनी भारताच्या इन्कम टॅक्स खात्यामधे आपले status NRI म्हणून अपडेट करायचे आहे, आणि NRI असल्यामुळे आपल्याकडे आधार कार्ड नाही त्याच्यामुळे आधार / पॅन लिन्किन्ग यापासून exempt करायला पण सांगितले आहे. कसे करायचे ते पण सांगितले आहे.
कोणी केले आहे का हे? काही अनुभव कोणाला?
धन्यवाद!

भारताची ‘यूपीआय’ क्रांती

Submitted by गुरुदिनि on 5 February, 2024 - 04:47

पूर्वप्रसिद्धी :- "साहित्य परिषद"(नाशिक) दिवाळी अंक २०२३

विषय: 

डिजिटल पेमेंटस आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास

Submitted by गुरुदिनि on 3 February, 2024 - 06:15

( पूर्वप्रसिद्धी - 'ठळक बातम्या' दिवाळी अंक २०२३ )

८ नोव्हेंबर २०१६ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या सर्व नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या नोटाबंदीच्या धोरणाचा अनेकांच्या मते देशाच्या अर्थव्यवस्थेवर भला-बुरा असा लक्षणीय परिणाम झाला, पण यामुळे भारतातील डिजिटल पेमेंटच्या वाढीलाही वेग आला. या धोरणात्मक कारवाईमुळे भारतात डिजिटल इकोसिस्टमचा आक्रमक प्रचार आणि अवलंब झाला. नोटाबंदीच्या आधी, डिजिटल पेमेंटस् भारतातील सर्व व्यवहारांपैकी केवळ १०% होते, परंतु त्यानंतरच्या वर्षांत ही संख्या २०% पेक्षा जास्त झाली आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

देशा-विदेशात येणारे अफरा तफरी चे अनुभव

Submitted by aashu29 on 23 January, 2024 - 01:38

विश्वास संपादन करून फसवणुक झालेल्या केसेस आपण इथे पाहिल्यात-
https://www.maayboli.com/node/65613

ह्या धाग्यात तशी कुठली ही विश्वासाची जमवणुक नाही, पण धमकी/घायकुती ला येऊन किंवा कन्फ्युज करून केल्या गेलेल्या काही स्कॅम्स बद्दल लिहायचा विचार आहे. माझ्या मित्र/नातेवाईक मंडळींचे काही अनुभव सिंगापुरातले तर काही भारतातले आहेत.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - बँकींग