सम दुखी

Submitted by kokatay on 9 November, 2016 - 14:32

अमेरिकेच्या निवडणुकीत हिलरी ताई हरल्याच दुख आणि ट्रम्प भाऊ जिंकल्याच दुख केलिफ़ोर्निया मध्ये तर विचारूच नका, काल रात्री पासून नेट वर आणि सोशल मिडिया वर लोकांच्या प्रतिक्रिया [ दुखी ] वाचून मन जड झालं.
राजकारण हा माझा फारसा प्रांत नाही, पण एक सुशिक्षित अमेरिकन नागरिक न्हणून योग्य व्यक्तीची निवड, हे मात्र नक्कीच समजू शकते.
अगदी रामायण , महाभारत मध्ये जरी डोकावलं तर आपल्याला आढळत कि सत्य आणि चांगलं नेहमी जिंकतच पण एक सीमित कालावधी साठी 'वाईट ' हे राज्य करतच. तर सध्या आपण सगळेच शांत पणे आगे कूच करूयात आणि संत तुकारामांनी जे सांगितले आहे त्याच मनन करू म्हणजे खरच जे जे होईल ते ते पाहण्याची शक्ती मिळेल.

आले देवाचीच्या मना तेथे कोणाचे चालेना ||
तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे ||

Group content visibility: 
Public - accessible to all site users