भारतात जवळपास सर्वच ठीकाणी भटक्या जनावरांचा प्रश्न जटील होत चालला आहे.कुत्रे,गाय हे प्राणी विशेष करुन आढळतात.अनेकदा भटक्या कुत्र्यांना रेबिज होऊन ते पिसाळातात,लहान मुलांवर हल्ला करुन त्यांना जखमी केल्याच्या बातम्या आपण वाचतच असतो.पण प्राणी त्यांच्या नैसर्गीक प्रेरणेने वागत असतात.त्यामुळे प्राण्यांना दोष देऊन उपयोग नाही.
हा विषय डोक्यात यायचे कारण म्हणजे आजचा अनुभव,एक अस्थिपंजर झालेलं कुत्र्याचं पिलू इकडे तिकडे सैरावैरा पळत होतं ,दिसेल त्या गोष्टीचा वास घेत होतं,अन्नाच्या शोधासाठी.बहुधा आईपासून दूरावलेलं.त्या केविलवाण्या जिवाची अन्नासाठी चाललेली धडपड मला बघवली नाही.संवेदनशील मन हेलावलं.मि घरातून थोडे दूध आणि पोळी घेऊन आलो व त्याच्यापुढे ठेवले.ते खाण्याचही त्राण त्याच्या अंगात न्हवते.कसेबसे थोडे खाऊन तो जीव निघून गेला.मग विचार करत राहिलो की या भटक्या जनावरांची ही परवड का? माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी यांचे नैसर्गीक स्त्रोत हिसकावून घेतले.परिणामतः अनेक जीवांवर वाईट हालाकीत जगण्याची वेळ आली.
माणुस स्वार्थी आहे हे मान्य.पण या भटक्या जीवांचे हाल बघवत नाहीत.लोक गाईने दूध द्यायचे बंद एले की तिला सोडून देतात,कुत्रा पिसाळला की सोडून देतात कुठेही.
यावर मला एक उपाय सुचला ,तो मांडतो.भटक्या जनावरांसाठी शासनाने निवारा उपलब्ध करुन द्यावा.या ठीकाणी या प्राण्यांचे प्रथम निर्बिजीकरण करावे.या प्राण्यांना पुरेसे अन्न व औषधोपचार द्यावेत.ज्यांना कुत्रा किंवा इतर प्राणी ॲडॉप्ट करायचेत त्यांना ते देऊ करावेत.
आज महासत्ता होऊ घातलेल्या आपल्या देशात भटक्या जीवांसाठी कोणतीच योजना नाही ,हे आपल्याला शोभणारे नाही.वाघ,सिंह या सारख्या लुप्त होऊ घातलेल्या प्राण्यासाठीच योजना आहेत,व जनतेत त्याबद्दल अवेरनेस आहे.
तर या भटक्या जीवांकडे शासनाचे लक्ष जावे याकरता मला ऑनलाईन पिटीशन तयार करायचे आहे.ते कसे करावे,?कुणी असे पिटीशन तयार केले असेल तर त्याची लिंक द्यावी. हे पीटीशन शेअर व साईन करुन शासनाकडे स्ट्रे ॲनिमल वेल्फेअरची मागणी करता येइल.धन्यवाद.
भटक्या प्राण्यांचा वाली कोण???
Submitted by सिंथेटिक जिनियस on 22 December, 2016 - 05:09
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Tumcha online dating cha
Tumcha online dating cha dhaga hota na? Tyala kay zala?
ऑनलाईन कोणी भेटले नाही म्हणुन
ऑनलाईन कोणी भेटले नाही म्हणुन ते भटक्या प्राण्यांकडे वळले
भटक्या प्राण्यांनी साथ सोडली,
भटक्या प्राण्यांनी साथ सोडली, तर वृक्ष आहेतच(बिचारे पळू पण नाही शकणार)
ऑनलाईन कोणी भेटले नाही म्हणुन
ऑनलाईन कोणी भेटले नाही म्हणुन ते भटक्या प्राण्यांकडे वळले
खरंच किती रिकामा वेळ आहे
खरंच किती रिकामा वेळ आहे तुमच्याकडे असे धागे काढायला..
खरंय. भटके प्राणी म्हणजे
खरंय. भटके प्राणी म्हणजे छळवाद असतो. रात्री बाहेरून कुठून आलो तर आपल्यालाच आपल्या घरी जायची भिती वाटते. बरेचदा मग ईकडे तिकडे भटकून घरी जावे लागते. स्वत:च एखादा भटका प्राणी असल्यासारखे वाटते.
पण मला वाटते सरकारने भटक्या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याऐवजी मोफत मांसाहार योजना सुरू केली पाहिजे. पकडा, मारा, शिजवा, आणि स्वस्त दरात वाटप करा. पाळीव प्राणी खाण्यापेक्षा भटके प्राणी खाणे केव्हाही चांगले. आमच्यासारख्या मांसाहाराला भुकेलेल्यांना अन्न मिळेल आणि त्यांनाही आमच्या पोटात निवारा मिळेल.
किंबहुना भटक्या प्राण्यांबाबत शिकारीचे नियम शिथिल केले तर चायनीज गाडीवालेच तुटून पडतील. चिकन चॉव चॉव सारखे मटण भॉव भॉव अर्ध्या किंमतीत मिळाले तर कोणाला नाही आवडणार. आमच्याईथे तर ईतका सुळसुळाट आहे की मला ऑफिसला कधी डबा न्यायची गरज पडणार नाही
Tu kutri shijaun khanar ahes?
Tu kutri shijaun khanar ahes? Loka dua detil tula
अड्डा
अड्डा
भटक्या प्राण्यांनी साथ सोडली,
भटक्या प्राण्यांनी साथ सोडली, तर वृक्ष आहेतच(बिचारे पळू पण नाही शकणार
सारखं सारखं त्याच झाडाला कशाला ?
सारखं सारखं त्याच झाडाला
सारखं सारखं त्याच झाडाला कशाला ?>>>:हहगलो:
पकडा, मारा, शिजवा, आणि स्वस्त
पकडा, मारा, शिजवा, आणि स्वस्त दरात वाटप करा. >>>
भटके प्राणी प्रकारात फक्त कुत्रे मांजरे येतात बाकी सर्वांचे मालक असतात डुकरांचे सुद्धा
खाट्या गाई म्हशी कुणी रस्त्यावर सोडत नाहीत आणि सोडले तरी खाटीक सोडत नाहीत.
पण मला वाटते सरकारने भटक्या
पण मला वाटते सरकारने भटक्या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याऐवजी मोफत मांसाहार योजना सुरू केली पाहिजे. पकडा, मारा, शिजवा, आणि स्वस्त दरात वाटप करा. पाळीव प्राणी खाण्यापेक्षा भटके प्राणी खाणे केव्हाही चांगले. आमच्यासारख्या मांसाहाराला भुकेलेल्यांना अन्न मिळेल आणि त्यांनाही आमच्या पोटात निवारा मिळेल.
किंबहुना भटक्या प्राण्यांबाबत शिकारीचे नियम शिथिल केले तर चायनीज गाडीवालेच तुटून पडतील. चिकन चॉव चॉव सारखे मटण भॉव भॉव अर्ध्या किंमतीत मिळाले तर कोणाला नाही आवडणार. आमच्याईथे तर ईतका सुळसुळाट आहे की मला ऑफिसला कधी डबा न्यायची गरज पडणार नाही >>>>>>>>> चायनीज गाडीवाले भटके प्राणी वापरतसुद्धा असतील. कोणी सांगावे!!!!
वाली मिळाला तरी सुग्रीव कोण
वाली मिळाला तरी सुग्रीव कोण असाही धागा येउ शकेल
"पकडा, मारा, शिजवा, आणि
"पकडा, मारा, शिजवा, आणि स्वस्त दरात वाटप करा. पाळीव प्राणी खाण्यापेक्षा भटके प्राणी खाणे केव्हाही चांगले. " - ते हॉट डॉग वेगळं आणी हे डॉग्ज वेगळे.
भटके प्राणी प्रकारात फक्त
भटके प्राणी प्रकारात फक्त कुत्रे मांजरे येतात बाकी सर्वांचे मालक असतात डुकरांचे सुद्धा >>>>
घुशींना विसरलात.
तसेच कावळे कबूतरे यांचाही कोणी मालक नसतो.
झालंच तर मिड नाईट स्नॅक्स म्हणूना वटवाघळे.. त्यांना मारून खाल्ले म्हणून कोणी पिशाच्च येऊन धरणार नाही..
आणि हो, मुळात कुत्र्या मांजरींची संख्याही काही कमी नसते.
Tu kutri shijaun khanar ahes?
Tu kutri shijaun khanar ahes? >>>> मग काय कच्चे खाऊ?? माझे फकत काळीजच सिंहाचे आहे.. आतडे नाही
फेरफटका, त्या हॉट डॉगची आठवण
फेरफटका,
त्या हॉट डॉगची आठवण काढू नका. फार मिस करतो. असले भारी मिळायचे आमच्या ईथे..
मुंबईत कुठे चांगले हॉट डॉग मिळतात कोणी सांगू शकेल का या धाग्यावर, धागा न भरकटवता, प्लीज प्लीज प्लीज..
माझे फकत काळीजच सिंहाचे आहे..
माझे फकत काळीजच सिंहाचे आहे.. आतडे नाही >>
"पकडा, मारा, शिजवा, आणि
"पकडा, मारा, शिजवा, आणि स्वस्त दरात वाटप करा. पाळीव प्राणी खाण्यापेक्षा भटके प्राणी खाणे केव्हाही चांगले. >>>
ईईई अगदी कसेतरीच झाले हे वाचुन...
कोणी असा विचारही कसे करु शकते
ॠ -
खा बाबा तु हा असला हॉट डॉगच खा
आपली मानसिकता कोंबड्या
आपली मानसिकता कोंबड्या बकर्या कापून खाण्यापुरतीच सेट झाली आहे. त्या पलीकडे वेगळ्या प्राण्याचे मांस पाहिले तरी आपल्याला विचार करवत नाही. गंमत म्हणजे आपण खाऊनही न बघता त्यांची चव अमुकतमुकच असेल असे ठरवतो. म्हणजे ईई ती कुत्री मांजरी कशी दिसतात, त्यांना खायची कल्पनाही करवत नाही. प्रत्यक्षात कोंबड्या बकर्यांनाही आपण काही कुशीत घेऊन झोपत नाही. फक्त आपण त्यांना खातो, हा विचार डोक्यात असल्याने त्यांना बघून तोंडाला पाणी सुटते ईतकेच.
प्रत्यक्षात हे जीव खाण्याव्यतिरीक्त आपल्या कुठल्याही कामाला येत नाहीत. ना आपल्या घराचे रक्षण करतात ना शेत नांगरून देतात, ना लहान मुलांना यांच्यासोबत खेळायला फारशी मजा येते. म्हणूनही आपण यांना खाऊन टाकतो. याऊलट कुत्री मांजरी आपण पाळतो ते त्यांच्याशी खेळतोही म्हणून त्यात भावनिक गुंतवणूक असते. त्यांना कापून खायचे कसे हा विचार जड जातो. एखाद्या कुत्रे पाळणार्या व्यक्तीसाठी कुत्रा मारून खाणे हे काय ते चाईल्ड केनाबिलिजम पेक्षा कमी नसावे. अर्थात ते देखील आपल्या जागी बरोबर असतात. पण ईतरांनी एकदा कुत्रे खायला सुरुवात तर करा. जरा टेस्टबडस डेवलप होऊ द्या कुत्र्याच्या मटणासाठी. बघा मग कसे रस्त्याने येणार्या जाणार्या कुत्र्याला बघून तुमच्याही तोंडाला लाळ सुटेल. एकदा का त्या कुत्र्यांनाही तुमच्या श्वासाच्या वा अंगाच्या वासावरून समजले की हा कुत्रा खाणारा माणूस आहे तर तुम्हाला पाहताच ते घाबरून धूम ठोकतील..
सिंथेटिक जिनियस | 22
सिंथेटिक जिनियस | 22 December, 2016 - 15:39
.........................
यावर मला एक उपाय सुचला ,तो मांडतो.भटक्या जनावरांसाठी शासनाने निवारा उपलब्ध करुन द्यावा.या ठीकाणी या प्राण्यांचे प्रथम निर्बिजीकरण करावे.या प्राण्यांना पुरेसे अन्न व औषधोपचार द्यावेत >>>
>>>>>>>>>>>>>>
याला किती पैसे खर्च होतील याचा हिशोब केलेला आहे का?
सध्या शासनाकढे एवढे अतीरिक्त पैसे आहेत का ? ( इथे उत्तर देताना सध्याच्या बजेटचा नीट अभ्यास आपेक्षीत आहे..थातुर मातुर उत्तर..उ.द. आहेत खुप पैसे.. वगैरे नाही..)
एकीकढे शासन कर वाढवायचा म्हणुन वेगवेगळे उपाय करत (कॅशलेस इकॉनॉमी इ..इ ज्यने इनफोरमल इकॉनॉमी टॅक्स ब्रॅकेट मधे यायला मदत होइल) तेव्हा आपणच गळे काढायचे..आणि वरुन शासनाने हे करावे ते करावे अस म्हणायच ??
कितपत योग्य आहे हे...
अहो, भारतात सर्व शासनाने
अहो, भारतात सर्व शासनाने किंवा दुसर्या कुणितरी करावे अशी अपेक्षा असते.
इथल्या सारखे कुणि खाजगी रीत्या स्वतःच अॅनिमल शेल्टर काढून, लोकांना स्वतःचे किंवा देणगीतून मिळालेले पैसे देऊन नोकरीला ठेवून, प्राण्यांसाठी रहायला जागा, त्यांची काळजी घ्यायला डॉक्टर वगैरे सर्व करतात. उगाच सरकारवर अवलंबून रहात नाहीत. ही खरी भूतदया.
भारतात काय फुक्कट आमची संस्कृति उच्च म्हणायचे, भूतदया, उदारपणा, प्रामाणिकपणा, शौर्य, सर्व काही सरकारने किंवा इतरांनी करायचे. आम्ही लाच खाणार, फसवणार, कायदे मोडणार नि उलट सरकारच्या नावाने बोंब मारणार!
ही भारतीय लोकशाही. लोकांनी आपणहून कुठलीहि काहीहि जबाबदारी घ्यायची नाही! सगळे सरकारने करायचे तर लोकशाही कशाला?
अंगाच्या वासावरून समजले की हा
अंगाच्या वासावरून समजले की हा कुत्रा खाणारा माणूस आहे तर तुम्हाला पाहताच ते घाबरून धूम ठोकतील..>>>
असे असेल तर मग झुरळं, पाली, विंचू, उंदिर, ढेकणं ह्यांच्या साठी पण टेस्टबड डेवलप कर! लोकं म्हणतील उंदरांचा बंदोबस्त, पालीचा बंदोबस्त, ढेकणांचा बंदोबस्त , एक दिवस ह्यांना चापाण्याला घरी बोलवा!! ठोकलीच धूम ह्या सगळ्या प्राण्यांनी घरा बाहेर....
आणि अश्या सकल प्राणीआहारी लोकांच्याघरी.. मस्त बरण्यात उंदराचे लोणचे, ढेकणाची चटणी, पालचिली, झुरळफ्राय असले अफलातून बेत! अजुन बरेच प्राणी आहेत काय काय बनवता येईल.
पाककला विभागात एकधागाच काढ ना मस्तय आयडिया!
माझे फकत काळीजच सिंहाचे आहे..
माझे फकत काळीजच सिंहाचे आहे.. आतडे नाही>>
पण असे खरोखर झालेच आहाराबाबत,
पण असे खरोखर झालेच आहाराबाबत, तर तिकडे "शेतकरी आंदोलने सुरु" होतिल ना.... लाले लोक पुढाकार घेतिलच, की त्यांच्या व्यवसायावर पाय आणला म्हणून.... मग त्याचे काय करायचे?
त्यांना लग्गेच "आंदोलनाला" निमित्त मिळून सगळ्या किड्यामकोड्यांचा पुळका येईल.... 
भले हे लाले लोक तिकडे चायनामधे काहीही किडेमकोडे, हालते जीव खात असतील, इकडे देशात मात्र भारिच साळसूद पणा दाखवितात
कृष्णा, अहो पण एखाद्या
कृष्णा, अहो पण एखाद्या व्यक्तीच्या अंगाच्या वासावरून हा आपल्याला खाणारा आहे हे ओळखायची कला कौशल्य त्या प्राण्यांमध्येही हवे ना. कुत्र्यांची घाणेंद्रिय भारी असतात म्हणून तसे म्हटले. उंदीर झुरळांची असतीलच असे नाही. आपली तरी कुठे असतात. उद्या तुमच्या शेजारी एखादी नरभक्षक व्यक्ती येऊन बसली तर तुम्हाला समजेल का हा आताच एक माणूसमुंडी खाऊन आलाय वगैरे..
कुत्र्यांची घाणेंद्रिय भारी
कुत्र्यांची घाणेंद्रिय भारी असतात म्हणून तसे म्हटले. उंदीर झुरळांची असतीलच असे नाही. >>>
ऋ, प्रत्येकाला काही ना काही ज्ञान असतेच संकटाची जाणीव करुन देणारे!
कुत्र्याला वासाचे असेल, कुणाला स्पर्शाचे असेल! कुणाला दृष्टीचे असेल अधिक तर कुणाला अजून कश्याचे.. मी ह्यातील तज्ञ नाही.
अगदी तुझ्याच शब्दात सांगायचे तर तुझ्याकडे नुसते बघून किंवा तुझ्या नुसत्या स्पर्शाने तुझे गफ्रे ओळखत असेल तुझा आज मुड कसा आहे!
पकडा, मारा, शिजवा, आणि स्वस्त
पकडा, मारा, शिजवा, आणि स्वस्त दरात वाटप करा. पाळीव प्राणी खाण्यापेक्षा भटके प्राणी खाणे केव्हाही चांगले. >>:खोखो:
कुत्र्याचे मटण ईशान्य भारतात (मिझोराम, नागालँड आणि मणिपूर) खाल्ले जाते.
https://en.wikipedia.org/wiki/Dog_meat#India
चायनात कुत्रा, गाढव, झुरळं,
चायनात कुत्रा, गाढव, झुरळं, साप, मुंग्या सगळंच खातात.
म्हणजे काही दिवसांनी चाइल्ड कॅनेबलिसम पण सुरु होइलंस वाटतंय.
चाईल्ड काय? अहो अंडी खातातच
चाईल्ड काय? अहो अंडी खातातच की आजही. ते तर चाइल्डच्याही आधीचं
Pages