राफा
जंगलाची राणी!
बिंब प्रतिबिंब
घ्यावी भरारी का डोळयात साठवावा पाऊस?
घ्यावी भरारी का डोळयात साठवावा पाऊस?
डिजिटल पेंटीग
(संपूर्णपणे 'काढलेले' चित्र. म्हणजे Reference Photo होता पण एकही pixel copy paste वगैरे नाही )
संवाद - अफाट आणि अतर्क्य
सलीम-जावेद विषयी लेख लिहिल्यावर आलेल्या उस्फूर्त आणि अप्रतिम प्रतिसादानंतर अजून झटक्यात लिहावे वाटले..
गप्पांचे एक्स्टेंडेड सेशन दारात निरोप घेताना व्हावे तसे!
ऑलरेडी पावरबाज संवादांचे तुम्हीही फ्यान असाल तर सोन्याहून पिवळे. जर उल्लेख केलेला चित्रपटच पाहिलेला नसेल तर उर्वरित लेख वाचायचे बंद करून आधी चित्रपट पाहून आनंद लुटावा ही विशेष विनंती… लेख वाचण्याचे प्रि-रिक्विझिट म्हणून नव्हे… तर एका चित्रपटप्रेमीने दुस-या चित्रपटप्रेमीला केलेला प्रेमळ आग्रह म्हणून (जेणेकरुन एका उत्तम चित्रपटाचा तुम्ही आनंद लुटू शकाल)
अब रोज रोज तो आदमी जीत नहीं सकता ना...
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट.
‘व्हिडीओ फिल्म मॅगझिन’ ही कल्पना तेव्हा नवीन होती. अशा पहिल्या वहिल्या मॅगझिनच्या (‘लहरें’) एका ‘अंकात’ फिल्म इंडस्ट्रीतल्या एका सुप्रसिद्ध जोडगोळीतला सुप्रसिद्ध एक कुणी मुलाखत देत होता...
त्या एकाच्या नेहमी बरोबर असणारा दुसरा मात्र ह्या मुलाखतीच्या वेळेस हजर नव्हता. ह्याचे कारण आता सर्वांनाच माहीत झाले होते. त्या दोघांची जोडी फुटली होती. एक प्रदीर्घ आणि अत्यंत यशस्वी अशी भागीदारी संपुष्टात आली होती.
तो ‘एक’ म्हणजे सलीम खान होता. ‘सलीम-जावेद’ मधला सलीम!
भरारी
डिजिटल पेंटींग - ग्लास
GIMP वापरून काढलेले अजून एक डिजिटल चित्र. संपूर्ण कोर्या कागदावर (बॅकग्राऊंडवर) सुरुवात करून काढलेले चित्र.
डिजिटल पेंटींग - समुद्र किनारा
(संगणकावर केलेले Traditional Art असे म्हणता येईल कारण सर्व काही हाताने (म्हणजे स्टाईलसने) काढलेले आहे. Built-in 'इफेक्ट्स' जसे की lighting वापरलेले नाहीत)
'ट्रम्पणे' म्हणजे काय रे भाऊ? ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो!
आधुनिक शब्दकोशातून:
ट्र्म्पणे!
क्रियापद.
अर्थ:
१. बोलताना आय (I) व माय (My) ह्याच्याशिवाय दुसरे काही न बोलणे.
२. दुस-याविषयी बोललेच तर त्याची किंवा तिची आयमाय काढतच बोलणे.
३. सार्वजनिक नळावरील भांडणात एखाद्याने ‘ठेव तर कळशी पुढे… मग तुझं काय करीन सांगता येणार नाही!’ असे म्हणावे, त्याच चालीवर जागतिक दहशतवादाशी लढायला अत्यंत संदिग्ध व दिशाहीन बोलणे. वैतागून कुणी विचारलेच ‘म्हणजे नक्की काय कराल?’ तर ‘ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो!’ असे लाडीक उत्तर देणे.
(अर्थछटा: मूलतत्ववाद्यांशी लढायला स्वत: ‘मूल’तत्ववादी होऊन पोरकट उपाय सुचवणे)