तडका - चौकशी
चौकशी
ज्यांनी केले घोटाळे
त्यांचे होतील वाटोळे
फक्त सक्सेस व्हावे
ते चौकशीचे वेटोळे
परंतु चौकशी मध्ये
लाचखोरी ना घुसावी
म्हणूनच तर चौकशीत
पारदर्शकता असावी
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
चौकशी
ज्यांनी केले घोटाळे
त्यांचे होतील वाटोळे
फक्त सक्सेस व्हावे
ते चौकशीचे वेटोळे
परंतु चौकशी मध्ये
लाचखोरी ना घुसावी
म्हणूनच तर चौकशीत
पारदर्शकता असावी
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
राजकीय आशिर्वाद
राजकीय आशिर्वादाने
माणसं बळावले जातात
छोटे-छोटे कार्यकर्तेही
श्रीमंतीत लोळावले जातात
या आशिर्नादाचा विस्मय
जनतेलाही कळला पाहिजे
थोडासा राजकीय आशिर्वाद
सामान्यांनाही मिळला पाहिजे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
राजकीय सोंडेशी
मनातील भावना
तावाने मांडतात
राजकीय सोयरे
आपसात भांडतात
येईल तो मांडीशी तर
जाणारा तोफे तोंडेशी
हे प्रसंग सर्रास मिळतील
इथे राजकीय सोंडेशी
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
‘रेड फ्लॅग’ युद्धसराव हे जगातील सर्वांत कठीण हवाई युद्धसराव मानले जातात. दरवर्षी अमेरिकेत नेवाडा राज्यातील नेलिस आणि अलास्का राज्यातील आईल्सन येथील हवाईतळांवर हे सराव चार टप्प्यात आयोजित केले जातात. यंदा अलास्कामध्ये पार पडलेल्या सरावांमध्ये भारतीय हवाईदलाने आजवरच्या सर्वांत मोठ्या पथकासह सहभाग घेतला होता.
सिस्टम
कोण कसा गुततो आणि
कोण कसा सुटतो आहे
सामान्यांचं पाहून जीणं
कंठ आता दाटतो आहे
ज्याच्या हाती सिस्टम
तोच इथला दादा आहे
पण राबवताना सिस्टम
सिस्टमवरतीच गदा आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
नाव न घेताही
अहो नाव न घेताही
खुप काही करता येतं
मनामध्ये हेरता येतं
कटू बिज पेरता येतं
जबर निशाणा साधून
टोमणंही मारता येतं
शब्दांना शस्र करून
काळीजही चिरता येतं
टिकांमध्ये घेरता येतं
आरोपांत पुरता येतं
अहो नाव न घेताही
खुप काही करता येतं
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
डीग्रीच्या डगरी
कुणी म्हणतात भक्कम
कुणी म्हणतात ढासळतील
मोदींच्या डिग्रीच्या डगरी
खोटे पणात कोसळतील
ओरिजनल डिग्री असेल तर
मोदी विश्वासात मिसळू शकतात
मात्र बनावट डिग्रीच्या डगरी
या कधीही कोसळू शकतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
गुडगाव, नोयडा ला वस्तीला असलेला हा राक्षस आता पुण्यात ही अवतरला आहे. संदर्भासाठी ही बातमी वाचा http://epaper5.esakal.com/7May2016/Normal/PuneCity/page5.htm . पुण्यातील कर्वे रोड सारख्या गजबजलेल्या रस्त्यावर एका कुटुंबाला मारहाण कर्ण्यात आली. कुटुंबा मध्ये नवरा, बायको आणि मुलाच समावेश आहे. ह्या कुटुंबा सोबत असलेल्या दांपत्याला पण मारहाण करण्यात आली. मारहाणीच कारण 'रोड रेज'.
'सैनिक समाचार' हे संरक्षण मंत्रालयाकडून प्रकाशित होणारे पाक्षिक प्रकाशन आहे. आज शंभर वर्षे पूर्ण होऊन गेलेले हे पाक्षिक इंग्रजीबरोबरच १२ भारतीय भाषांमधून नियमित प्रकाशित होत आहे. भारतीय लष्कराच्या चारही दलांमध्ये (भूदल, नौदल, हवाईदल आणि तटरक्षक दल) होणाऱ्या विविध घडामोडींचा गोषवारा त्यातून प्रकाशित होत असतो. अर्थातच संरक्षणासारखा संवेदनशील विषय असल्याने अत्यंत गोपनीय, गोपनीय, संवेदनशील अशा विविध वर्गांमधील बाबी त्यात प्रकाशित केल्या जात नसतात. पण जी काही सामग्री प्रकाशित होत असते, तीही या विषयात रस असणाऱ्याच्या पसंतीला उतरू शकते.