ओनली शाहरूख खान कॅन सेव्ह बॉलीवूड!
गेले वर्षभर नऊ महिने हेच ऐकतोय.
२ मार्च २०२२ ला पठाण चित्रपटाची रीलीज डेट सांगणारा विडिओ यूट्यूबवर रीलीज झाला आणि बघता बघता दहापंधरा मिलिअन व्यू त्या डेट अनाऊन्समेंट सोहळ्याला पडले.
पुढे कधीतरी त्याचा टीजर आला, ट्रेलर आला. त्यातले बहुचर्चित बिकीनीधारी दिपिकाचे गाणे आले. दरवेळी तितकीच घमासान चर्चा झडू लागली.
हल्ली एक बॉयकॉट ट्रेंड म्हणून काही सुरू झालेय. मी स्वतः कधी त्या वादात पडलो नाही, वा त्या नादात माझ्यातला चित्रपटप्रेमी मरू दिला नाही. पण तिथल्या रडारवरही शाहरूखचा पठाण आला आणि चर्चेचा भडका ऊडू लागला.
हो,
शाहरूख खान भारतीय महिलांना आवडतो.
आणि हे मी म्हणत नाहीये......
तर सर्व्हेचा निकालच तसा आहे.
त्याच निकालावर आधारीत हा सुंदर लेख आज सकाळीच त्याच्या वाढदिवसानिमित्त वाचण्यात आला.
https://www.bbc.com/marathi/india-59472935
या लेखाला केवळ शाहरूखच्या चाहत्या महिलांनीच नाही तर भारतातल्या प्रत्येक पुरुषाने वाचावे आणि यावर विचार करावा अशी मनापासून ईच्छा म्हणून हा लिखाणप्रपंच !
-------------------------------------------------
पठाण - शाहरूख खान
हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था
यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था
अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !
तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..
(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )
और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है
और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये
जल्द ही मिलते है.....
२०१४ लोकसभा निवडणूकांपासून भक्त हा शब्द फार प्रचलित झाला आहे. प्रत्येक राजकीय नेत्याच्या समर्थकांना भक्त असे संबोधले जाते. अर्थात, त्यांचे वागणेही तसेच असते. का ही ही झाले तरी आपल्याच नेत्याची तळी उचलायची. स्वत:च्या मनाला पटो न पटो प्रत्येक राजकीय खेळीचे समर्थन एके समर्थनच करत राहायचे.
पण त्यामुळे एक गोची झाली आहे. ईतर कलाकार खेळाडू यांचे जे चाहते असतात, नव्हे कट्टर चाहते असतात, त्यांच्यावरही भक्ताचा शिक्का मारला जातो.
शाहरूखचा चित्रपट चालो न चालो. पण त्याच्या नवीन चित्रपटाच्या ट्रेलरवर लोकं नेहमीच तुटून पडतात.
ईदच्या मुहुर्तावर त्याने आपल्या आगामी चित्रपट झिरोचा टीजर रीलीज केला आणि चोवीस तासांच्या आत दोन करोडपेक्षा जास्त लोकांनी तो बघायचा विक्रम केला.
जर तुम्ही त्या दोन करोड लोकांमध्ये नसाल तर तुमच्यासाठी खाली लिंक देतो.
टीजर यूट्यूब ट्रेंडींगमध्ये फूटबॉल वर्ल्डकपला दुसर्या क्रमांकावर सारत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. ही भारतीय चित्रपटप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे _/\_
सचिनने श्रीलंकेविरुद्ध मारलेल्या शतकापेक्षा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मारलेल्या शतकाचे आपल्याला किंचित जास्त कौतुक असते. आणि झिम्बाब्वे वा बांग्लादेशसोबत मारलेले शतक तर गिणतीतही नसते. कारण प्रतिस्पर्धी जितका तुल्यबळ, तितकी त्याला मात देण्यातली मजा भारी असते.
आपल्याला नेहमीच सेलिब्रेटी आणि सुपर्रस्टारची चमकधमक दिसते, त्यांना मिळणारा मानमरातब पैसा दिसतो. मात्र तो त्यांनी मेहनतीने, सचोटीने, आणि आपल्या अंगी असलेल्या कलागुणांनी कमावला असतो हे दिसत नाही. अर्थात सारेच लोकं असा विचार करत नसतील, काहींना याची जाण असेलही.
मात्र या देशात सेलिब्रेटी असणे हे त्रासदायक सुद्धा ठरू शकते जेव्हा तुमची एखादी शिंक सुद्धा न्यूज बनते, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ होत तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाते, आणि त्यातून न्यूज शोधली जाते, न मिळाल्यास बनवली जाते.
सेन्सॉर बोर्डाचे डोके ठिकाणावर आहे का?
ही बातमी वाचा, तुम्हीही हेच बोलाल.
बनिये का दिमाग और मियाभाई की डेअरींग!
शाहरूख की एक्टींग और किंग खान का स्टारडम - फिल्म "रईस"
रईस उलटे वाचले की सईर असे वाचले जाते. सई कोण हे सांगायची गरज नाही आणि र रुन्मेषचा हे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण बस्स तेव्हाच हा चित्रपट बघायचे नक्की झाले होते 