परवा कोल्हापूरहून येताना सातारा पुणे हायवेवर भोरजवळ एका हाॅटेलची जाहिरात पाहण्यात आली आणि ती पाहून हसावं का रडावं हे कळतचं नव्हत.. जाहिरात साधारण अशी होती -
हाॅटेल ओमकार
महाराजा मिसळ.
निखारा मिसळ.
दही मिसळ.
सुखी भेळ. ......
आणि बाजूच्या कोपर्यात मोठा वर असलेला दिशादर्शक बाण आणि त्याखाली लिहलेलं..
क्लिन टाॅयलेट
सारेगम कारवॉ ची ताजी जाहिरात पाहिलीत? मला आवडली!!
अगदी भिडणारी वाटली...
अश्या दर्जेदार जाहिराती हल्ली दुर्मिळ होत चालल्यात आणी अगदीच सुमार जाहिरातींचा अगदी सुक्काळ झालाय. एकदातरी जरूर बघण्यासारखी...
'रंगरसिया' रंगीबेरंगी शू पॉलिशः फक्त रंग नव्हे मूड देखिल.
काय सिनेमा किंवा नाटक पाहताना पुढल्या खुर्चीवर उंच माणूस आल्याने तुमचा रसभंग होतो?
काय ग्रुप फोटोत तुमचे डोके शेजारच्या दोन खांद्यांच्या मध्ये दबल्याने तुम्हाला चेहरा हसरा ठेवता येत नाही?
काय उंच फळीवर ठेवलेली वस्तू काढायला, तुम्हाला कोणालातरी सांगावं लागतं ?
काय वर्गात पहिल्या बाकावर बसावे लागल्याने तुम्ही अभ्यासेतर उपक्रमांत मागे पडता?
यातल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर 'हो' असेल, तर आम्ही घेऊन आलो आहोत, तुमच्या या सर्व समस्यांवर खात्रीचा उपाय.
मध्यंतरी जिओच्या जाहीरातीत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी दिसल्याने वाद उद्भवला होता. मी मोदी भक्त नाही की द्वेषी नाही, (हे हल्ली आवर्जून सांगावेच लागते) पण मलाही ते खटकले होते. मात्र त्यानंतर पुढे क्लीअर झाले होते की मोदींचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय वापरण्यात आला होता. पुढे कायद्यानुसार काय ती कारवाई होईलच असे समजून मी तो विषय डोक्यातून तेव्हाच काढून टाकला होता. किंबहुना मोदींच्या जागी जिओच्या जाहीरातीत शाहरूख खान आल्याने आनंदच झाला होता.
मायबोलीवर एकच जाहिरात सध्या वारंवार दिसत आहे. काय प्रकार आहे ? कशाची आहे ही जाहिरात ?
मायबोलीने स्पॉन्सर केलेली आहे की स्पॅम आहे ?
यावर हे एक चित्र दिसते.
जाहिरात दाराचा हेतु समजत नाही. नक्कीच चांगला नसावा.
''आमचे उत्पादन पर्यावरणपूरक आहे.''
''आम्ही बनविलेले उत्पादन संपूर्णतः नैसर्गिक आणि पर्यावरणास कोणताही धोका न पोहोचविणारे आहे.''
अशा कित्येक जाहिराती आपल्याला टीव्ही, वर्तमानपत्रे, सोशल मीडियावर दिसत असतात. एखादे उत्पादन पर्यावरणपूरक आहे हे 'दिसल्या'वर आजच्या सुशिक्षित, सधन ग्राहकाचा त्या उत्पादनामधील रस वाढतो ही बाब उत्पादन करणार्या कंपन्या व जाहिरातदार नेमकी जाणून आहेत. जागतिक तापमानवाढ, पर्यावरणाची हानी, प्रदूषण इत्यादींबद्दल वाढती सतर्कता जशी ह्याला कारण आहे तशीच 'ग्रीन' किंवा 'पर्यावरणपूरक' उत्पादने खरेदी करणे हे सामाजिक प्रतिष्ठेचे समजले जाण्याची मानसिकताही त्यामागे आहे.