पुण्यातील एका खासगी शाळेबाबतची बातमी भयंकर आहे. बातमी ज्या प्रमाणे विविध वाहीन्यांवरून समोर येतेय त्यावरून तरी प्रथमदर्शनी तुघलकी फर्मान काढून पालकांना आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरल्याचे दिसून येत आहे. या अटी भयानक आहेत. आणि जर पाळल्या नाहीत तर पोलीसी कारवाई करण्याची धमकी दिलेली आहे.
खालील लिंकवर आपण पाहू शकता.
https://www.facebook.com/abpmajha/videos/10160779103170271/
देशभरात मागच्या महिन्यात अफवेचे २५-२६ बळी गेलेत. कारण काय? तर मुलं पळवणारे संशयित म्हणून मारहाण झाली. कहर म्हणजे या मेलेल्यांपैकी एकही मुलं पळवणारा नव्हता. आसाम कि अरुणाचल मध्ये तर या अफवेबद्दल लोकांमध्ये जनजागृती कारण एक सरकारी अधिकारीच लोकांच्या मूर्खपणाला बळी पडला. परवा एकाला मारहाण करून पोलीस स्टेशन ला नेमल्यावर लक्षात आलं कि तो मुलगा त्याचाच होता. काल मालेगाव मध्ये अशीच दंगल झाली. पण या सगळ्या घटनेवर कळस केलाय परवाच्या धुळ्यातील घटनेने. अगदी मृतदेहांवरही लोक वर करत होते. रक्ताचा मांसाचा खच पडलेला होता. आणि यात त्यांना समाधान वाटत होत? कसलं होत हे समाधान ? कुणाला तरी मारल्याचं?
आजच्या आधुनिक काळात अन्न, वस्त्र, निवारा ह्या मुलभूत गरजांबरोबरच 'वीज' हीदेखील मुलभूत गरज झाली आहे. ती मिळवण्याचे सगळे मार्ग महावितरणच्या दाराशी जातात. मी एजंट टाळून स्वतःच्या हिमतीवर काम करू पाहात होते. पण महावितरणच्या ढिसाळ कामाने माझी कशी ससेहोलपट केली, त्याची ही कहाणी.
****************************************************************************************************************************************
हल्लीचीच गोष्ट . सकाळी आठ ची वेळ. न्यू जर्सीतले एक शांत सबर्ब. मिडलस्कूल च्या मुलांना शाळेत सोडून ड्रायव्हर रॉबर्ट टली ने डेपो मध्ये बस घेऊन जायच्या आधी नेहमीप्रमाणे बस चेक केली. कोणी काही विसरले का? एखादे मूल चुकून बस मध्येच झोपले तर नाही ना? सगळ्या सीट्स चेक करता करता एका सीट वर त्याला काहीतरी दिसले. चमकून त्याने ते नीट वाकून पाहिले. ही वस्तू टीनेजर्स कडे सापडणे अगदीच अशक्य होते असे नव्हे पण या शांत गावातल्या, रेप्युटेड स्कूल च्या बस मध्ये नक्कीच अपेक्षित नव्हते. रॉबर्ट ने वेळ न दवडता पोलिसांना आणि त्याच्या सुपरवायजर्स ना कळवण्याचा निर्णय घेतला. पोलिस ५ मिनिटात आलेच.
कोरा सातबारा
शासन करू लागले सातबारा कोरा।
सर्वच म्हणू लागले आमचाच करा।
शेतकरी म्हणतात आम्ही कर्जबाजारी।
नोकरदार म्हणतात आम्ही तुमचेच शेजारी।
बिल्डर म्हणतात आमच्या कडेही पहा जरा।
कामगार म्हणतात हा तर आमचाच हक्क खरा।
महिला म्हणतात पन्नास टक्क्याचाही विचार करा।
बागायतदार म्हणतात बागा गेल्या राहिली दारे।
आमचाही का नाही करत कोरा सातबारा गडे।
युवा म्हणते शिक्षण घेऊन झालो कर्जबाजारी।
नाही मिळाली नोकरी करा आता सातबाऱ्याची होळी।
डॉक्टरही चिंतेत कोरा करण्यासाठी सातबारा।
घातलेले पैसे काढू कसे हीच त्यांची चिंता।
फार पुर्वी इथे एक खडाजंगी झाली होती. इन्डियन एम्बसी/कॉन्स्युलेट च्या कारभारातला सावळा गोंधळ आणि त्यामुळे अमेरिकेत राहणार्यांनां भोगाव्या लागणार्या यातना किंवा गैरसोयी. बहुतेक तेव्हा वादात भारत द्वेष्टे असंभा* आणि (भारत)देशभक्त असंभा असे दोन गट होते. आठवतं का कोणाला?
सध्या तरी माझा सपोर्ट भारत द्वेष्ट्या म्हणून हिणवले गेलेल्या असंभांनां.
- ओसीआय , सीकेजीएस् , भारत सरकारच्या प्रोसेसीस् नी ग्रस्त एक नागरीक!
* - अमेरिकेत राहणारे संपन्न भारत वांशिक
क्रमशः
आजकाल बर्याच ठिकाणी वाहतुक पोलिस चौकांऐवजी आडवळणावर आणि तेही 'घोळक्याने' टपून असल्यासारखे दिसतात तेंव्हा प्रश्न पडतो कि ह्यांना वाहतूक नियंत्रणाऐवजी 'दुसर्याच' जबाबदार्या दिल्यात कि काय?
सूचना- या घटनेत कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.
रविवार, दि. १९ नोव्हेंबर, २०१७. रात्री झोपताना जुना मोबाईल
स्वीच ऑफ करून चार्जिंगला ठेवला, ही तशी नेहमीची सवय. आमच्या इथल्या लाईटवर माझा विश्वास नाही म्हणून. तेव्हा नवीन मोबाईलची बॅटरी ९०% चार्ज होती, म्हणून तो तसाच ठेवला.
अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष डानल्ड टृंप यांच्या कामगिरीवर चर्चा करण्यासाठी हा धागा. राष्ट्राध्यक्षाच्या निर्णयाचा परिणाम तळागाळातल्या माणसांपासुन "टू बिग टु फेल" संस्थांवर होत असल्याने इथे अगदि एलिमेंटरी शाळेच्या बाकापासुन ते इमिग्रेशनच्या डाका पर्यंत आणि झालंच तर रशियन कॉल पासुन मेक्सिकन वॉल पर्यंत चर्चा करायला हरकत नाहि.