शासन(सरकार)

तडका - आजचा सवाल

Submitted by vishal maske on 8 June, 2016 - 21:38

हमरी-तुमरीच्या भाषा हल्ली
पक्षा-पक्षांतुन फिरू लागल्या
अन् ऐतिहासिक आरोप टिका
प्रसिध्दी माध्यम ठरू लागल्या

अहो हि वारंवारच धुसफूसणारी
टक्कर कमळ बाणाची आहे
पण निजामांच्या बापाच्या राज्यात
भागीदारी नक्की कुणाची आहे,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - राजकीय समीक्षण

Submitted by vishal maske on 7 June, 2016 - 23:28

राजकीय समीक्षण

राजकीय चढाओढ सदा
ओढातानीने चालत असते
कधी बाह्य तर कधी कधी
अंतर्दोषात कलत असते

मात्र हे अंतर्गत मतभेद
विरोधकांना पुरक असतात
राजकारणातील द्वेश हे
विकासाचे मारक असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

उत्सव दोन वर्षांचा

Submitted by घायल on 3 June, 2016 - 11:18

एकदा आठवडी बाजारात एक मनुष्य घोडा विकत घ्या, घोडा असे ओरडत होता. त्याच्या समोर काही ग्राहकही दिसत होते आणि घासाघीस करत होते. लोक त्या दृश्याकडे पाहून हसत होते. काही तसेच पुढे जात तर काही तिथे रेंगाळत.यातल्या काहींना शांत बसून गंमत पहायची होती तर काही मात्र न राहवून विचारत होते कि

"अहो घोडा कुठेय इथे ? "
त्यावर त्या विक्रेत्याने अतिशय तुच्छ कटाक्ष टाकत सोबतच्या चतुष्पाद प्राण्याकडे अंगुलीनिर्देश केला. त्याबरोबर प्रश्नकर्ता खो खो हसू लागला. विक्रेत्याबरोबरच आधीपासून असलेले ग्राहक आणि इतर लोक चिडून त्याच्याकडे पाहू लागले .

शब्दखुणा: 

तडका - विरोधी डोळे

Submitted by vishal maske on 3 June, 2016 - 10:37

विरोधी डोळे

यांनी म्हणायचं आहे आहे
त्यांनी म्हणायचं नाही नाही
आहे की नाही पाहता पाहता
ऊत्सुकतेची होते लाही लाही

जेव्हा जेव्हा आरोप टिकांचे
येऊ लागतात बारूदी गोळे
तेव्हा तेव्हा ऊताविळ होऊन
तराटले जातात विरोधी डोळे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - जाहिर सत्य

Submitted by vishal maske on 2 June, 2016 - 01:44

जाहिर सत्य

लोकपाल आणि काळा पैसा
आंदोलनात खुप-खुप गाजले
यातुन किरण बेदी राज्यपाल
रामदेव बाबा महा ऊद्योगपती
केजरीवाल मुख्यमंत्रीपदी सजले

पण एवढे सारे घडून देखील
लोकपाल आणि काळा पैसा
जणू देशामध्ये दबाडले गेलेय
लोकांना भावनिक करून करून
भावनेच्या भरात लुबाडले गेलेय

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

Dermatoglyphics Multiple Intelligence Test करावी का?

Submitted by मी अमि on 30 May, 2016 - 00:40

आमच्या एका परिचीतांनी त्यांच्या मुलांची वरील टेस्ट करून घेतली. या टेस्ट मध्ये त्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे घेऊन त्याचे विश्लेष्ण केले जाते आणि त्यावरुन त्या व्यक्ती साठी कोणते करीयरचे पर्याय योग्य असतील ते सुचवले जाते. तुमचे वेगवेगळे ईंटलिजन्स विश्लेषण करून रिपोर्ट तयार करतात म्हणजे https://en.wikipedia.org/wiki/Theory_of_multiple_intelligences इथे दिलेल्या ईंटलिजन्स चे विश्लेषण करतात. त्यांच्या मते बोटांच्या ठशावरून या ईंटलिजन्स मॅपिंग करता येते.

तडका - अधिकारी बांधवांनो

Submitted by vishal maske on 28 May, 2016 - 22:17

अधिकारी बांधवांनो

समाज आणि प्रशासनामध्ये
नक्कीच काही दुरावा आहे
याचा वेळोवेळी जाहिर होणारा
समाजात जिवंत पुरावा आहे

समाजातील अधिकार्यावर
जनतेचे सदैव लक्ष असतात
समाजही त्यांनाच ग्रेट मानतो
जे सदैव कर्तव्य दक्ष असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - राजकीय समीक्षण

Submitted by vishal maske on 23 May, 2016 - 21:08

राजकीय समीक्षण

टिका करणे,आरोप करणे
हा राजकारणाचा भाग आहे
कुणाच्या निशाणी सिंह तर
कुणाच्या निशाणी वाघ आहे

पण विकास सोडून भरकटने
हा समाजव्यवस्थेला डाग आहे
राजकीय समीक्षण करण्या
जनतेला अजुनही जाग आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - क्लिन चीट

Submitted by vishal maske on 22 May, 2016 - 22:12

क्लिन चीट

आरोप अंगावर येताच
पाठराखण हजर असते
जहरी जहरी आरोपांना
क्लिनचीटचे गाजर असते

क्लिनचीटचे महत्वही
हमखास कळू लागेल
हवी त्याला क्लिन चीट
सहजतेने मिळू लागेल

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - निकाल

Submitted by vishal maske on 19 May, 2016 - 10:43

निकाल

ज्याचे कार्य चांगले
त्याला मिळते संधी
निवडणूकच सांगते
लोकशाहीची धुंदी

कुणाला झिंगतो
कुणाला झोंबतो
जनतेच्या भावना
निकालच सांगतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - शासन(सरकार)