आरक्षण : गरज आणि सद्यस्थिती
आरक्षणामुळे अनेक मागास जाती मुख्य प्रवाहात आल्या. शिक्षण आणि नोकरीच्या संधी त्यांना निर्माण झाल्या . काही मूठभर लोकांच्या हाती असलेली मक्तेदारी आरंक्षणामुळे मोडीत निघाली. परंतु अस असलं तरी आजही अनेक जाती या मुख्य प्रवाहात नाहीत. आणि त्यांतील बहुतेकांना आरक्षण आहे. आरक्षण असतानाही त्या जाती आज मागास कशा राहिल्या त्याला जबाबदार कोण..? यावर चर्चा व्हायला हवी. मग आरक्षण असूनही जर जातींचा आणि पर्यायाने समाजाचा विकास होणार नसेल तर आरक्षणाची गरज ती काय..?