रसत्यावरील त्या भारतीयांसाठी आधार ज्यांना समाजाने टाकुन दिले आहे.

Submitted by निलेश बच्छाव on 22 March, 2019 - 04:43
ठिकाण/पत्ता: 
उल्हासनगर-04

FB_IMG_1553152676057.jpg11 वर्षानंतरची ग्रेट भेट .
उल्हासनगर मध्ये स्टेशन परिसरात बेवारस पणे राहत असलेल्या आणि शारीरिक स्थिती ठिक नसलेल्या बबन कांबळेंची त्यांच्या कुटुंबीयांशी 11 वर्षानंतर भेट घडवुन दिली .
घटनाक्रम-1)3 मार्च ला उल्हासनगर स्टेशन परिसरातुन जाणीव वृद्धाश्रम मध्ये ठेवण्यात आले.
2)7 मार्च पर्यंत त्यांना साई रुग्णालय विठ्ठलवाडी येथे उपचारासाठी दाखल केले
3)21 मार्च ला पहाटे तीन वाजता आश्रम मधुन घेऊन त्यांच्या राहत्यागावी गाव-पालखेड,तालुका-दिंडोरी,जिल्हा-नाशिक येथे सकाळी 8 वाजता पोहचुन त्यांना त्यांच्या परिवाराशी मिळवुन दिले .
IMG-20190321-WA0012.jpgIMG-20190321-WA0012.jpg

माहितीचा स्रोत: 
रसत्यावरील बेवारस,अनाथ,मनोरुग्ण भारतीय नागरीकांना आधार आणि पुर्नवसन.
तारीख/वेळ: 
शुक्रवार, March 22, 2019 - 04:34 to रविवार, March 31, 2019 - 04:34
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त हॉटेल मध्ये ,पार्टी मध्ये जे जेवण शिल्लक राहते ते फेकण्या पेक्षा स्टेशन वर रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना वाटलं तरी कोण्ही उपाशी राहणार नाही .
मी हँगिंग गार्डन मध्ये १ व्यक्ती रोज बघायचो तो सकाळी सर्वांना फुकट नाष्टा, फळ,चहा द्यायचे आणि आग्रह करून करून उपकाराची भावना बिलकुल नसायची
आणि रोज आशि माणसं सुधा आहेत

आपण हा उपक्रम करतो .लोकांच्या कार्यक्रमात उरलेले जेवण आपण घेतो आणि रसत्यावरील लोकांना खाऊ घालतो .देण्याच्या पहिले आम्ही स्वत ते खाऊन बघतो .

निलेश खूप चांगले काम करतात...
शुभेच्छा...
कर्जतला हेच काम मॅगसेसे अवॉर्ड विजेते डॉ. वाटवानी करतात. त्यांची मदत घेऊ शकता.
https://www.google.com/amp/s/m.maharashtratimes.com/mumbai-news/meet-mag...
मायबोलीकर मानुषी यांचा अजून एक धागा डॉक्टर धामणे , नगर )
https://www.maayboli.com/node/57211