सिद्धि

बंदिश

Submitted by 'सिद्धि' on 12 October, 2019 - 02:50

" निघालास ? " ..... गेटच्या दिशेने चालत जाणार्‍या अविनाशला विभा विचारत होती.
" हो ! " .... त्याने मागे वळून न पाहताच उत्तर दिले.
ती पुन्हा... " का ? आणि मला न भेटताच ? "
" तो येतोय ना ! " परत त्याने मागे न पाहताच उत्तर दिले.
" जसा तू यायचास तो नसताना , तसाच तो येतोय पण तू असताना ! "... विभा हसत म्हणाली.
" विभा हे शक्य नाही. '
" अरे पण का ? "
" वेड्यासारखी वागू नकोस. दोन्ही समतुल्य नाती संभाळणे तुला जमेल का ? "
" म्हणुन तू जाणार आहेस का रे ? " ..... विभा काकुळतीला येऊन म्हणाली.

शब्दखुणा: 

थाइलंड - कोणी थाइलंड ला आहे का? किंवा काही माहिती आहे का ?

Submitted by 'सिद्धि' on 9 May, 2019 - 04:35

आम्ही ३ दिवसां पूर्वीच बँकॉक मध्ये आलो आहे. company कामानिमित्त एक महिना इथे आहे. बँकॉक पासून ट्याक्सी ने २ तासांच्या अंतरावर होटेल रिव्हर, ठिकाण नाखोनपातम असं काहीस pronunciation आहे.
Address च्या अधीक माहिती साठी होटेल booking जोडलय... please help .

IMG_20190509_140755.jpg
.
ईकडे Indian food जवळपास कुठे मिळेल का?
Veg किंवा non veg काही ही चालेल.
डाळ-भित,बिर्याणी, पुलाव, भाजी-पोळी काही चालेल. इथलं जेवण फार वेगळ आहे, चव सुद्धा विचित्र लागते.

कोकणचा रानमेवा- 'करवंदे'

Submitted by 'सिद्धि' on 17 April, 2019 - 05:50

करवंदे (डोंगराची काळीमैना) KARANDA-

आमच्या गावी एक म्हण आहे, ‘पाडव्याला पाड आणि अखितीला गोड’. "गेल्याच आठवड्यात गावी जाऊन आले, रस्त्याच्या दुतर्फा करवंदाच्या डहाळी च्या डहाळी भरुन आलेल्या पाहील्या. अश्या या रान मेव्यासाठी कोकण प्रसिद्ध आहेच. सर्वसाधारण रानमेवा म्हणजे करवंदे, जांभळे, आंबा, फणस, आवळा, रायआवळे, तोरणं, आमगुळे, आळू ही आहेत. हा रानमेवा आरोग्यरक्षणासाठी सर्वानी आवर्जून खावा. खर्च न करता ही अतीशय उपयुक्त असे हे करवंद मुबलक प्रमानात उपलब्ध असते. अश्या या बहुगुणी फळा बद्द्ल थोडी माहीती".

विषय: 
शब्दखुणा: 

क्षणचित्रे

Submitted by 'सिद्धि' on 30 March, 2019 - 06:05

म्हणतात ना 'फोटोग्राफी एक कला आहे' मि फक्त प्रयत्न करते ते कितपत गमलय माहित नाही.
फावल्या वेळेत माझा आवडता छंद म्हणजे छायाचित्र काढणे (photography).
पण यासाठी मला निसर्ग, पर्यटनस्थळे, धबधबे, बागबगिचे अगदि काहि-काहि लागत नाही,एकच गोष्ट लागणार 'कॅमेरा' बास्स्स photography के लिये और क्या चाहिये .
समोर काहिहि असो ते कॅमेरा मध्ये कैद करायचच.
तरिहि हि काहि क्षणचित्रे माझी आवडती वेळ संध्याकाळ ची.... मावळत्या दिनकरा ला समर्पित.

विषय: 
शब्दखुणा: 

श्रीखंड

Submitted by 'सिद्धि' on 27 March, 2019 - 13:51

घरगुती आणि ताजे श्रीखंड-

साहित्य:
ताजे दही - 1 किलो,
पिठी साखर -1 किलो
गोड कमी हवे असेल तर पाऊण किलो साखर ,
केशर ४ काडी,
वेलची पूड -अर्धा चमचा,
थोडी जायफळ पूड - अर्धा चमचा,
चारोळी १०-१२ दाणे,
ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे पण मी काजू, बदाम घेते ते ही पातळ काप करून.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - सिद्धि