कूटप्रश्न

ओळखलंत मला?

Submitted by अनन्त्_यात्री on 11 July, 2026 - 02:14

मला ओळखलंत?

आपलं पवित्र वगैरे कर्तव्य पार पाडून ज्याने टोणगा निवडून दिला होता त्यानं परवा गोठा बदलला बघा..
..तो कर्तव्यदक्ष मीच

रात्रीचा दिवस करून, मर मर अभ्यास करून परीक्षा देऊन सुस्कारा सोडताना ज्याने फेर परीक्षेची सुवार्ता ऐकली बघा...
...तो सहनशील मीच

परवाच्या पावसात मुंबई स्पिरीटचा उद्धार करत तुम्बईतून जाताना धरणीने मॅनहोलमधून ज्याला पोटात घेतले बघा..
...तो स्पिरिटेड मीच

समूळ काँक्रिटलेल्या झाडाने धाराशायी होत असताना जो मध्ये तडफडला बघा...
..तो वृक्ष-सोयरा मीच

एक साहित्यिक मराठी कोडे!

Submitted by चीकू on 11 June, 2026 - 09:53

मोरोपंतांनी त्यांच्या कर्णपर्व काव्यात भीम आणि दु:शासन यांच्या द्वंद्वयुद्धाच्या प्रसंगी वर्णन करताना खालील आर्या लिहिली आहे.

धावति अन्योन्यावरि ते दोघे आठवूनी अपकार
जाणो ते मदमत्त क्रोधोद्धत दंपतीच अपकार

याचा अर्थ पुढीलप्रमाणे- मदाने मातलेले आणि रागाने उद्धट झालेले हत्ती जसे एकमेकांवर धावून जातात, तसे ते दोघे (भीम आणि दुःशासन) परस्परांनी केलेले अपकार आठवून एकमेकांवर चढाईने धावून जाऊ लागले.

आता प्रश्न असा की वरील अर्थात हत्ती हा शब्द कसा येऊ शकतो ते तुम्हाला सांगता येईल का?

दोन मराठी कोडी - तळ्याकाठची फेरी आणि दगड

Submitted by चीकू on 10 June, 2026 - 13:46

दोन मराठी कोडी देत आहे.

१. तळ्याकाठची फेरी - राधा चढावर मिनिटाला ७० मीटर चालते, उताराला मिनिटाला १३० मीटर चालते आणि सपाटीवर मिनिटाला ९१ मीटर चालते. राधाच्या घराजवळ एक तळे आहे. त्या तळ्याच्या सभोवतालीच्या गोल रस्त्यामधे चढ, उतार, आणि सपाटी असे तिन्ही प्रकार आहेत. रोज सकाळी त्या रस्त्यावरून दिलेल्या गतीने राधा दोन फेर्‍या मारते. पण त्यापैकी एक फेरी मारून झाली की ती त्याच पावली परत फिरून उलटी दुसरी फेरी मारते. रस्त्याची एकूण लांबी ५४६० मीटर धरली तर दोन फेर्‍या मारायला राधाला एकूण किती वेळ लागतो?

प्रश्न

Submitted by अनन्त्_यात्री on 8 June, 2026 - 04:26

लिहिशील एखादी कविता? जी मुळांपासूनी मला-
-गदागदा हलवून विचारील प्रश्न जुना, विसरला

ज्या प्रश्नाचे उत्तर शोधित सैरभैर फिरलो
निरुत्तराच्या उंबरठ्यावर कितिदा अडखळलो

आठवून ते पुन्हा एकदा विकल, व्यथित झालो
शब्दांचे ओलांडून कुंपण मग इथवर आलो

अस्तित्वाची काच तडकते- त्यावरती पारा
अचपळ शब्दांचा, प्रतिबिंबी तोच प्रश्न बोचरा

ती स्त्री - भाग २ : तलाव आणि दुसरी जाणीव

Submitted by रांचो on 22 May, 2026 - 04:05

दोन · स्वित्झर्लंड

ती गणपतीपुळ्याची गोष्ट अद्वैतने कधीच कोणाला सांगितली नाही. सांगणार तरी कुणाला ... आणि नेमकं काय ... की समुद्रकिनाऱ्यावर त्याला एक अनोळखी स्त्री भेटली होती जिला त्याचं नाव माहीत होतं… की ती अचानक कुठूनतरी आली आणि क्षणात हवेत विरून गेली..?
तिच्या डोळ्यांत काहीतरी इतकं विचित्र होतं, की आजही ते आठवलं की अंगावर काटा यायचा…

शब्दखुणा: 

अधल्या मधल्या नोंदी-२

Submitted by शर्मिला. on 12 May, 2026 - 02:46

अधल्या मधल्या नोंदी-२
तिचा वेग..

तिने गाडी मुख्य रस्त्यावर घेतली,
तेव्हा रस्त्यावर नेहमीचीच वर्दळ होती....
तिचा वेग मर्यादितच होता.
नेहमी मर्यादित वेगानेच तर चालवायची ती गाडी....
वाहन चालवतांना, सगळी काळजी ती नेहमी घेतच होती...
तिचा वेग मर्यादित च होता, आपण सुरक्षित रहावं, आणी दुसऱ्यांनाही इजा होऊ नये म्हणून....

ती स्त्री - भाग १ : समुद्र आणि पहिली जाणीव

Submitted by रांचो on 11 May, 2026 - 08:32

एक · गणपतीपुळे

अद्वैत त्याच्या आई आणि बाबांबरोबर गणपतीपुळ्याला आला होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत बाबांनी "गणपतीपुळ्याला जाऊयात" म्हटलं तेंव्हा त्याला खूप आनंद झाला कारण त्याला आता पहिल्यांदा समुद्र पाहाता येणार होता! तिथे जाईपर्यंत रोज रात्री झोपताना त्याच्या डोळ्यांसमोर फक्त लाटाच येत होत्या.

शब्दखुणा: 

आदरणिय खामेनींजींचे महापरिनिर्वाण ?

Submitted by एक लेखक on 1 March, 2026 - 13:50

अयातुल्ला खामेनींचं वृत्त बड्या जागतिक वृत्तसंस्थांकडून आलेलं आहे. तसंच इराणच्या वृत्तसंस्थांनीही ते दिलं आहे.

मात्र सुरूवातीला इस्त्राएलच्या दाव्यानंतर इराणच्या प्रधानमंत्र्यांनी ते जिवंत असल्याची पहिली प्रतिक्रिया दिली. त्यानंतर काही वेळाने दुसर्‍या नेत्याने ते मृत झाल्याची बातमी स्विकारली. पण त्यांच्या पार्थिवाचे चित्रण कुठेही दिसलेले नाही. अंत्यसंस्कारांचा पुरावा नाही.
३६ वर्षे एखाद्या देशावर राज्य करणारा नेता जर मारला गेला तर गोंधळाची स्थिती निर्माण होते. त्याचा फायदा घेऊन अमेरिकेसारखे देश तिथे आपला बाहुला बसवतात.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कूटप्रश्न