महाराष्ट्र

शिक्षक म्हणून सोसताना

Submitted by Pradipbhau on 21 February, 2018 - 01:38

शिक्षक म्हणून सोसतानाNBT-image.jpg
मी आहे समाज शिक्षक
मला आहे राष्ट्र शिल्पकार
मी पाळतो आदर्श तत्वे
मी स्वछता अभियान घटक
मी कुटुंब नियोजन घटक
निवडणूक कामात सतत मग्न
मी आहे मुलाचा आचारी वाढपी
मी ठेवतो शासनाच्या सर्व नोंदी
चोवीस तास मी आहे सेवेकरी
मी करतो मतदारांची नोंदणी
संचालक घेतात दरवर्षी खंडणी
प्रशिक्षणाची कटकट जन्मोजन्मी
ऑनलाईन माहितीची नवीन खेळी
बदलती धोरण अन गावचं राजकारण
पेन्शन बंद  धोरण अन बायकोची कटकट

विषय: 
शब्दखुणा: 

अति लोभाचे फळ

Submitted by Pradipbhau on 20 February, 2018 - 08:25

अति लोभाचे फळ
राघव नावाचा एक गरीब कोळी गावापासून काही अंतरावर असलेल्या नदीकाठी रहात होता. त्याचे घर अगदी साधे होते. नदीत मासे पकडायचे व ते गावात नेऊन विकायचे हा त्याचा उद्योग होता. या व्यवसायावर तो स्वतःची व पत्नीची उपजीविका करीत असे. त्याची पत्नी धूर्त होती. तिला गरिबीत राहणे पसंत नव्हते. तिच्या अपेक्षा खूप मोठ्या होत्या.

शब्दखुणा: 

कळी आणि भुंगा

Submitted by अभिगंधशाली on 17 February, 2018 - 10:07

एक होती रमणीय बाग. रंगीबेरंगी सुगंधित फुलांनी भरलेल्या त्या बागेत एक सुंदर कोमल कळी वाऱ्यवर आनंदाने झुलत होती. काहीवेळाने तिथे एक भुंगा आला. रंगाने काळा पण सप्तरंगी पारदर्शक पंखांचा. त्याने साऱ्या बागेत फेरफटका मारला.

त्याची नजर त्या कोमल कळीवर गेली अन् त्याला सगळ्याचा विसर पडला. तिच्या सौंदर्याची त्याला भुरळच पडली. तो आपोआप त्या कळी भोवती गुंजरव करु लागला. ती कळी अल्लड कळीही त्याला न्याहाळू लागली. त्याचा पुरुषी रांगडेपणा तिला मोहिनी घालत होता. तिच्या तनामनातून काहीतरी उमलत होते .

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

कथा - उंटांची खोड मोडली

Submitted by अभिगंधशाली on 17 February, 2018 - 07:43

एकदा वाळवंटातील सोन्या उंट फिरत फिरत आनंदवनात आला.

त्याला सगळ्या गोष्टींना नाव ठेवायची वाईट खोड होती.

त्याने या आधी जंगल, प्राणी, पक्षी काहीसुध्दा बघितले नव्हते.

सिंह महाराजांनी त्याचे स्वागत केले आणि आनंदवन बघण्यासाठी बरोबर वाघ्या कुत्रा पाठवला.

खर तर इतकी झाडे, गार हवा बघून त्याला खूप छान वाटतं होते पण कशाला चांगल न म्हणण्याची खोड त्याला शांत बसू देईना.

फिरता फिरता सोन्याला रानगाय दिसली. तिला बघून सोन्या मोठ्याने हसत म्हणाला," तू कोण आहेस? , कोणी का असेना पण किती जाडी आहेस. चालताना पोट बघ कसं हलत आहे."

गाय त्याला काही न म्हणता निघून गेली.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

पर्यटनाचा आनंद अवर्णनीय

Submitted by Pradipbhau on 16 February, 2018 - 07:05
तारीख/वेळ: 
16 February, 2018 - 06:54
ठिकाण/पत्ता: 
विटा

आम्ही तीन दिवस कर्नाटकातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी ट्रिप आयोजित केली होती. पहिल्या दिवशी बनाळी, विजापूर, कुडाळ संगम, अलमट्टी धरण, होस्पेट या ठिकाणांना भेटी दिल्या. दुसऱ्या दिवशी बदामी, ऐहोळे, हंपी, ही ठिकाणे पहिली. तिसऱ्या दिवशी हुबळी,बेळगाव पाहिले. एक तर रस्ते चांगले, हायवे प्रवास त्यामुळे एकही क्षण कंटाळवाणा झाला नाही. खासगी वाहनाने आम्ही हा प्रवास केला. जेवणाचे थोडेफार हाल झाले मात्र प्रेक्षणीय स्थळे पाहताना त्याची जाणीव देखील झाली नाही.
------------------ ------------------------- ----- --------- --- ----- --------

माहितीचा स्रोत: 
प्रांत/गाव: 

आवडलेली वाक्ये आणि कविता

Submitted by वृन्दा१ on 12 February, 2018 - 10:59

खूपदा आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अचानक वाचनातून मिळतात. पुस्तके आपल्याला फक्त शिकवत नाहीत. ती आपल्याला धीर देतात, दुःखात आपलं सांत्वन करतात. पुस्तके किंवा इतर वाचन आपल्याला काय काय देतात हे सांगणे खरेच अवघड आहे.आपल्याला आवडलेली वाक्ये किंवा शेर,कविता आपण शेयर करू या का? मलाही त्यातून खूप काही मिळेल.धन्यवाद.

विषय: 
प्रांत/गाव: 

मराठी शुभेच्छापत्र स्पर्धा: रौप्यमहोत्सवी वर्ष

Submitted by अश्विनी कंठी on 5 December, 2017 - 23:10

मराठी भाषेमधून ग्रीटिंग मिळू लागायला यावर्षी २५ वर्ष पूर्ण होत आहेत. आज महाराष्ट्रात मराठी ग्रीटिंग कार्ड्स सर्वत्र मिळतात. इंटरनेटवरदेखील मराठी ग्रीटींग्स अगदी सहज उपलब्ध आहेत. परंतु मला आठवते आहे की एक काळ असा होता, जेव्हा मराठी ग्रीटींग फक्त दिवाळीचे असायचे आणि आतला मजकूर आणि चित्र ही ठराविक असायचे.

प्रांत/गाव: 

भ्रांत

Submitted by Shivkamal on 13 November, 2017 - 01:45

धुवांधार पावसात
गाव दडला घरात
पावसाचा मोर नाचे
थुई थुई अंगणात
पीक आलंय दाण्यात
पाणी साचलं शेतात
धड धड काळजात
उरलं नशीब हातात
धार आलीया पात्याला
(विळा)परि लागेना थोटाला
लागे आस त्या भोळ्याला
गाडी चवड दाण्याची
कधी लागेल ओट्याला

विषय: 
प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - महाराष्ट्र