सुरजच्या अज्याची येंगेजमेंट

Submitted by मंगेश सराफ on 24 April, 2019 - 05:08

सूरजच्या अज्याची येंगेजमेंट
मंगेश, अमोल,अमरीश,सूरज, पराग व अजय हा आमचा मित्र परिवार... प्रत्येकाची वेगळीच एक गोष्ट.. अजयच खूप दिवसानी जुळलेलं लग्न, सूरज व अजयची जवळची मैत्री.. त्यातही सूरज PhD झाल्यामुळे त्याच पण लग्न अजूनही न झालेलं... अमरीश ने नुकतीच घेतलेली कार... परागची मीटिंग नेमकी अजयच्या engagement च्याच दिवशी... अमोल व मंगेश यांचं तऱ्हेवाईक वागणं..... अशा सर्व गोष्टीतून व प्रसंगातून जनमलेली ही कविता...

सूरजच्या अज्याची येंगेजमेंट

खुप दिवसांनी जुयल
अज्या मेघेच लग्न
सुरजच मात्र आमच्या
स्वप्न झालं भग्न

येंगेजमेंटच्या दिवशी
सोबत जाणार होतो सर्व
अंबरीश ची होती कार
त्याचा आम्हाले गर्व

कार द्याले स्पेशल
गंप्या बाभुळगावून आला
फियचडी(phd) वाला सूरज
आमचा ड्रायव्हर मंग झाला

"ह्यो"वाल्या परागन
वेयेवर केलता घोय
सगळे झाले तयार तरी
याची झाली नव्हती आंघोय

कसेबसे सगडे जमले
बसले कारच्या आत
स्टेरिंग होत गाडीच
फियचडी च्या हातात

हळू हळू आमची गाडी
पोहचली गावा जवय
ड्रायव्हर होता फियचडी
पण रस्ता नव्हता सरय

ड्रायव्हर सोबत होता ( fm) अमरीश
तीन शायने होते मागं
चौघाच्या शहाणपणात
फियचडीले सुचत नव्हता मार्ग

बोलता बोलता मधोमंदी
मोठा ढेकुल आला
गाडीच्या पार्श्वभागाले
थो चाटून मंग गेला

अचानक तवा तिथं
आवाज मोठ्ठा झाला
सगड्याईच्या चेहऱ्याचा
पार रंगच उडून गेल

रागान मंग अमरीश
सूरज कड पाये
मागचे तीन शायने
फक्त मजा घेत जाये

येंगेजमेंटले तिकड
झाला होता उशीर
अजयले बी आमच्या
नव्हता जरा धीर

फियचडीले त्यानं
कॉल केलते चार
तेच्यापशीच सांगितले होते
कारण येंगेजमेंट चे हार

अज्याची तर आमाले
येत होती लय कीव
आम्हाले पायताच तेच्या
आला जिवात जीव

पोहचलो बा एकदाचे
आम्ही अज्या पाशी
नेहमी सारखा मंग्या होता
सकायपासून उपाशी

झोकानस मंग्यान घेतल
किचन कड पाहून
पण चिवड्याच्या प्लेटा त
कव्हाच गेलत्या येऊन

भाऊजी तर आमचा
उगीच भाव खाये
म्हताऱ्या कुताऱ्या वाणी
निस्ता कोणट्यात बसून राये

फियचडी चे तर निस्ते
फोटू साठी चोचले
शंभरकत त्यानं
निरे शेल्फिच घेऊन घेतले

परागले त होती
वापस जाचीच घाई
येंगेजमेंट च्या गडबडीत
तिकड ट्रेन सुटून जाईन

येंगेजमेंट चा कार्यक्रम मंग
एकच नंबर झाला
सोबतच जेवणाचा
मेनू पंगतीत आला

पहिल्याच पंगतीत बसलो सगडे
घेतल दाब्बून जेवून
चार-चार गिलास त
मठठाच घेतला पिऊन

वापस जाच्या आधी
गुरुप फोटो घेतला आमी
२५ हजार वाला अमरीशचा
मोबाईल आला कामी

सुरू झाला मंग आमचा
परतीचा चा परवास
20मे ले हाये लग्न
पुन्हा भेटाची हाय आस....

कवी- मंगेश सराफ

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users