शेतकर्यांचा आदिम सण : बैलपोळा
शेतकऱ्याचा रानसखा बैल
शेतकऱ्याचा जिवाभावाचा काळया मातीतला सवंगडी म्हणजे जित्राब . शेतकऱ्याची खरी रानातली सुखदुःखे ज्याला समजतात असा 'काळी 'तला सोबती म्हणजे बैल. सनातन काळापासुन शेतीतली नांगरणी , वखरणी, पेरणी, मळणी इत्यादी सारी कामे बैलाच्याच मदतीने केली जातात.
बैल हा श्रमसंस्कृतीचा कणा आणि समृद्धीचे लक्षण मानल्या जातो. तो खर्या अर्थाने सृजनाचा मानस्तंभ व शेतीमातीतल्या हिरव्या जगाचा निर्माता आहे.