महाराष्ट्र

कोकणातील दशावतर

Submitted by Ratnakaryenji on 7 January, 2021 - 22:56

मे महिन्यात आरवलीला येनजी परिवार च्या घरामागे जंगलात एक छोटीशी टेकडी आहे. तिकडे फार पुर्वी आमच्या आजोबांनी नाथपंथीय पुरुषाचे परमनाथ देवालयाची स्थापना केली त्याची सालाबादी वर्धापनदिनाचा निमित्ताने आम्ही समस्त येनजी मुंबईकर मे महिन्यात पहिल्या आठवड्यात तिकडे आरवलीला जातो. मे महिन्यात आम्ही गेलो की वर्धापनदिनाचा आधि एक दिवस व नंतरचे दोन दिवस मला तिकडे लहान झाल्यासारखे वाटते. Summer vacation म्हणजे काय ते तिकडे दोन तीन दिवसात कळते. करवंदे , जांभळे , काजुची रसदार बोंडे, रसाळ फणस , नारळाची शहाळे व आंबे तर भरपुर खायला मजा असते. इकडची मुले आई वडिलांनी सांगितलेल्या कामात पुर्ण व्यस्त असतात. उदा.

विषय: 
प्रांत/गाव: 

आईसाठी काही

Submitted by Mangesh Pandav on 16 August, 2020 - 11:34

आज लिहावं म्हणतोय तिच्याविषयी काही,
नवलच ये कारण असं वाटलं न्हवतं याच्या आधी काही,
लिहिण्याआधी वाटलं होतं किती लिहिल आणि किती नाही,
लिहिताना मात्र प्रश्न पडला काय लिहु आणि काय नाही,
किती राबते ती आमच्यासाठी हे लिहू की
किती जिव आहे तिचा आमच्यावर हे लिहू,
तिची प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी हे लिहू की
तिच अस्तित्त्वच हरवलीये ती आमच्यात हे लिहू,
छोट्या छोट्या गोष्टीत तिचं सुख मानन लिहू
की संकटांना सामोर जाताना तिचं खंबीर होन लिहू,
आज लिहावं म्हणतोय तिच्याविषयी काही,
'आई'च लिहू शकलो फक्त.. पुढे पेन उचललाच नाही..

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

जबरदस्त Smile

Submitted by Santosh zond on 26 July, 2020 - 13:00

तुम्ही या जगात काही पण करू शकता बस तुम्हाला त्या गोष्टी बद्दल विचार करता आला पाहिजे आणि ती गोष्ट रोज जगता आली पाहिजे,
त्या दिवसा साठी जगा ज्या दिवशी तुमचे सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर जगातली सर्वात जबरदस्त Smile असेल
मेहनत केल्यावर जी Smile येती ना त्यापूढे तर पूर्ण जगाची सुंदरता पण कमी पडते बर का !

शब्दखुणा: 

फोटो...

Submitted by पूर्वी on 1 July, 2020 - 14:35

फोटो....
ईयत्ता पहिली...
पाच वर्ष वय होते माझे.
कन्यापाठ शाळेचा गाणे, नृत्यचा कार्यक्रम राममंदिरात ठेवला होता.
मला" नेसते, नेसते पैठण चोळी ग आज होळी ग "या गाण्यावर नृत्य करायचे होते
वेणी घालण्यासाठी केस सोडले पण मला वेणी तर घालता येईना. त्याकाळी मोकळे केस म्हणजे विचीत्र, अशोभनीय मानले जायचे. माझे केसही फार मोठे होते. त्याची आमच्या वर्गाच्या बाईंनी अंबाड्यासारखी गssच्च गाठ बांधली. खूप खूप गच्च आणि लगेच मी ष्टेजवर गेले.
केसांमुळे डोक्यात होणाऱ्या वेदना विसरण्याचा, चेहर्यावर येऊ न देण्याचा प्रयत्न करत मी ते गाणे-नृत्य पुर्ण केले.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

थांबशील का माझ्यासाठी

Submitted by Amol shivaji Rasal on 29 June, 2020 - 01:12

उशीर झाला आहे फार पण थांबशील का माझ्यासाठी
पाऊलवाटा रेंघाळशील का प्रतीक्षेत तू माझ्यासाठी..?

कितीतरी तुडवलो गेलो भावनेंच्या त्या ओझ्याखाली
हात धरुनी उठवशील अन कडकशील का माझ्यासाठी..

रेल्वे सारखा धावत आहे मज माहीत नाही ब्रेक जरी
लाल ध्वजाचे रूप घेऊनी फडकशील का माझ्यासाठी..?

खट्याळ हसतेस किती बिलगतेस झाले नयन हे फितुर जरी
स्वच्छ पांढरे ह्रदय घेऊनी धडकशील का माझ्यासाठी..?

पहाटेच्या त्या स्वप्नामध्ये मृत्यूचे तांडव बघितले
मृत्यूयात्रेत येतांना रडशील का तू माझ्यासाठी ?

कविता: लॉकडाउन मध्ये भांड्यांचे मनोगत

Submitted by रजनी भागवत on 30 May, 2020 - 17:12

जेवणानंतर अक्षयपत्रात(बेसिन)जमलेल्या भांडयानी केला एकच गलका.....
थोडीशी थकून मी म्हणाले घेऊ द्या मला जरासा डुलका.

माझे म्हणणे ऐकून त्यांना आले खदखदून हसू
भांडी म्हणाली जा ग बाई जा तुझ्या कामाचा पाढा आमच्यापुढं नको वाचूस.

म्हातारीच्या गोष्टीप्रमाणे मी मात्र पुटपुटले ,डुलका घेते, फ्रेश होतें, नंतर चहाची भांडी वाढवून तुम्हा सगळ्यांचा समाचार घेते.

ताट -वाटी, कप-बशी आणि इतर पात्रांनी केली कुजबुज,जावू द्या रे तिला आपण करू आपले हितगुज.

एरव्ही एवढ्या संख्येने आपण तरी केव्हा भेटणार
कप-बशी,ताट-वाटी,चमचेच काय ते नळाखाली विहार करणार.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

कविता -आयुष्याचा ताळेबंद

Submitted by रजनी भागवत on 30 May, 2020 - 15:45

असेच एकदा बसल्या बसल्या
विचार आला मनी
मनुष्यजन्माच्या प्रवासाची करू
गोळाबेरीज या क्षणी..

बेरीज ,वजाबाकी,गुणाकार नी भागाकार
याचा ताळेबंद बसता बसेना
आणि आयुष्याचे गणित माझ्या
काहीकेल्या सुटेना...

बेरीज म्हणजे अधिक
तर वजा म्हणजे उणे
अधिक क्षणां पेक्षा जास्त
उण्यानेच भरले माझे रकाने......

सुखाचा गुणाकार जमेना
आणि दुःखाचा भागाकार येईना
आणखी काय सांगू मैत्रिणींनो
आयुष्याचे गणित माझे
मला काही उमजेना
मला काही उमजेना........

रजनी भागवत

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

गाऊलीच्या पावलांत सांज भरा आली..

Submitted by संजय कुळकर्णी on 25 May, 2020 - 02:44

बी. रघुनाथ यांची आणखी एक काव्यरचना मला खुप आवडते.. ज्याला सुप्रसिद्ध भावगीत गायक कै. श्री गजानन राव वाटवे यांनी गायले व चालरचना दिली होती. व माझे भाग्य असे की त्यावेळी त्यांच्या सोबत रहात होतो . त्या वेळी वाटवेआण्णा बरोबर पुणे येथील नवी पेठ फाटक बागेतील "त्रिदल" सोसायटीत राहत होते

विषय: 
प्रांत/गाव: 

मी यात राहतो

Submitted by मयुर j on 19 May, 2020 - 05:03

येतय यश अवश्य हस, फसू नको
येतय अपयश अवश्य रड, कोसळू नको
येतोय अडथळा अवश्य भिड , माघार नको
दमलास बिट्या विसावा घे, थांबू नको.
यशात मानकरी हजार.. येऊ दे
अपयशात एकटा उभा राहा..कोणी नसुदे
पाठीवरच्या घावाची किंमत कसली
छातीवरच्या वणांचा गर्व असुदे ...
मयुर

Pages

Subscribe to RSS - महाराष्ट्र