प्रवाह
महानदाचा प्रतिकार
उभा प्रबळ साक्षात्कार
शून्य शक्त बाहू ठरती
प्रवाह अंतिम सत्य त्रिवार
ऐक मृतकांचा हुंकार
आयुष्य क्षणांचा व्यवहार
विलगणे मिसळणे अविभाज्य
प्रवाह अंतिम सत्य त्रिवार
विरक्त नावाडीच हुशार
ओघ न्हेतो प्रपंचापार
अस्तित्वाचे गूढ उमलती
प्रवाह अंतिम सत्य त्रिवार